Reading Time: 2 minutes
इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी याची स्थापना 1987 रोजी कंपनी कायद्याअंतर्गत झाली. ही कंपनी अक्षय ऊर्जा आणि ऊर्जा संवर्धन प्रकल्पांशी निगडित आहे. तसेच अश्या प्रकल्पांना प्रोत्साहन देणं, यासंबंधी कामाचा विकास करणं आणि त्यांना आर्थिक सहाय्य करणं हे काम इरेडा तर्फे केले जातात.
1. कंपनीचे मुख्य उद्दिष्टे :
- नवीन आणि नूतनीकरणीय स्त्रोतांच्या मदतीने वीज किंवा ऊर्जा निर्माण करण्याऱ्या प्रकल्पांना आर्थिक मदत करणं.
- ऊर्जा वाचवण्यासाठी कार्यरत असलेल्या विशिष्ट प्रकल्पांना आणि योजनांना आर्थिक मदत करणं.
- ऊर्जा क्षेत्रात ‘इरेडा’चा हिस्सा वाढविण्यासाठी प्रयत्न करणं यासाठी कंपनीच्या सुविधा, प्रक्रिया, पद्धती यामधे आवश्यक असल्यास वेळोवेळी सुधारणा करून कामाचा दर्जा कायम ठेवणं.
2. कंपनीला मिळालेला “नवरत्न दर्जा ” :
- 29 एप्रिल 2023 रोजी शेअर बाजारात एनएसई आणि बीएसई मधे इरेडाचे कामकाज सुरू झाले तेव्हा शेअर प्राइस 50 /- वर लिस्ट झाला होता, जेव्हा आयपीओची इश्यू प्राइस 32/- होती.
- कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना चांगला नफा मिळवून दिला आहे .
- लिस्ट झाल्यापासून गुंतवणूकदारांना अविश्वसनीय असा 800% परतावा या कंपनीने दिला आहे.
- सार्वजनिक उपक्रम विभागाने इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड अर्थात (IREDA) ला ‘नवरत्न दर्जा’ प्रदान केला आहे.
- भारताने वर्ष 1997 पासून मोठ्या आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांना नवरत्नांच्या श्रेणीत आणले आहे.
- याचा अर्थ असा की, नवरत्न दर्जा मिळालेल्या कंपन्यांमध्ये जागतिक बाजारपेठेत इतर कंपन्यासोबत स्पर्धा करण्याची क्षमता असते अश्या कंपनी समावेश नवरत्नांच्या श्रेणीत असतो.
- सरकरचा यामागचा उद्देश काय असू शकतो ? तर देशातील कंपन्यांना बाजारपेठेत जागतिक दर्जा मिळावा आणि यामुळे कंपनीची पर्यायाने देशाची प्रगती व्हावी या उद्देशाने हा दर्जा दिला जातो.
हे वाचा : ऊर्जा कंपन्या आणि भविष्यातील गुंतवणूक
3. उज्ज्वल भविष्याची सुरुवात :
- नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात ऊर्जा क्षेत्रासाठी 19,100 कोटी रुपयांची तरतूद केली.
- यात नवीन ऊर्जा क्षेत्र आणि नवीकरणीय ऊर्जा क्षेत्र यांचा समावेश आहे. 2023-2024 च्या अर्थसंकल्पाच्या सुधारित अंदाजापेक्षा (7,848 कोटी ) जवळपास 79% वाढ पाहायला मिळाली.
- भारतानं 2030 पर्यंत उर्जा निर्मितीमध्ये मोठा बदल करण्याचं ठरवलं आहे. तो बदल म्हणजे थर्मल पॉवरवरील म्हणजे कोळश्यातून होणारी वीज निर्मिती कमी करणं.
- इरेडा कंपनीमधे सरकारचा जवळजवळ 75% हिस्सा आहे.
- जुलैमधे मिळालेल्या माहितीनुसार, नेपाळमध्ये असणाऱ्या एक जलविद्युत प्रकल्पात इरेडा 290 कोटी रुपये गुंतवणार आहे.
4. इरेडा जून तिमाही रिजल्ट :
- इरेडाचा जून तिमाहीचा निव्वळ नफा 30% वाढला आहे. हा नफा मागच्या वर्षीच्या 294 कोटी रुपयांच्या तुलनेत 383 कोटी इतका नोंदवला गेला आहे.
- सध्याच्या नोंदीनुसार (09/08/2024)इरेडाच्या शेअरचे मूल्य Rs. 243 आहे. तर या शेअरचा सर्वात उच्चांक विक्रम हा 310 रुपयांचा आहे.
- सलग 6 दिवसांच्या घसरणीनंतर उलट दिशेने चाल सुरू झाली आहे जे , इरेडाच्या शेअरला मजबूती देत आहे आणि गुंतवणूकदारांना सकारात्मक होण्यासाठी मदत करत आहे.
- IREDA चे शेअर्स उच्चांकावरून 25% घसरला आहे, मात्र तरीही 2024 मध्ये आतापर्यंत स्टॉक 137% वाढला आहे.
माहितीपर : लक्षवेधी शेअर ओएनजीसी
5. इरेडा शेअरच्या ( सद्यस्थितीनुसार )मूल्याबद्दल ब्रोकरेजेसने दिलेली मतं :
- फिलिप कॅपिटल या ब्रोकरेजने इरेडाला सेल रेटिंग दिले आहे आणि लक्ष्य Rs.130 च्या आसपास दिले आहे.
- तर आयसीआयसीआय डायरेक्टनुसार, (या ब्रोकरेजने) इरेडाला खरेदीचे रेटिंग दिले आहे आणि लक्ष्य Rs.330 दिले आहे. सोबतच आर्थिक वर्ष 2025 आणि 2026 च्या तुलनेत IREDA ची मालमत्ता अंतर्गत व्यवस्थापन (AUM) 30% च्या चक्रवाढ वार्षिक वाढ दराने (CAGR) वाढेल अशी अपेक्षा आहे.
- वर दिलेली माहिती ही ब्रोकरेजनी इरेडाबद्दल दिलेली मतं आहे, वेबसाइट किंवा तिच्या व्यवस्थापनाचे नाहीत.
- गुंतवणूक करताना आर्थिक तज्ञ किंवा आर्थिक सल्लागार/जाणकार व्यक्तीचा सल्ला घेऊनच खरेदी करावी.
#इरेडा
#ऊर्जा क्षेत्र आणि नवीकरणीय ऊर्जा क्षेत्र
#इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी
#IREDA
#नवरत्न दर्जा
#उर्जा निर्मिती
Share this article on :