Reading Time: 2 minutes

अचानक आपण बँकेत भरणा करत असलेली नोट खोटी निघाली हा अनुभव अनेकांना येत असतो. दररोज अनेक लोक खोट्या चलनाच्या नोटांमध्ये फसले जातात. आपल्याकडे असणारी ५०० ची नोट नवी आहे का जुनी हे सामान्य माणसाला लवकर कळत नाही. पण ही खोटी नोट कशी ओळखायची यासाठी खाली मुद्दे दिलेले आहेत. 

बाजारात खोट्या नोटा उपलब्ध असतात. ५०० च्या खोट्या नोटा कशा ओळखायचा यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काही मुद्दे जाहीर केले आहेत. ते पुढीलप्रमाणे आहेत. 

खोट्या नोटा ओळखायचे मुद्दे : 

  1. जर एखाद्या व्यक्तीने ५०० रुपयांची नोट प्रकाशात धरली तर त्याला विशेष ठिकाणी ५०० लिहिलेले दिसते. 
  2. ५०० ची नोट ४५ डिग्री कोनात डोळ्यासमोर धरली तर ५०० नोटेवर विशेष ठिकाणी लिहिलेले दिसून येते. 
  3. देवनागरीत एकाच ठिकाणी ५०० असे लिहिलेले दिसून येते. 
  4. ५०० च्या नोटेवर india  असे लिहिलेले दिसून येते. 
  5. नोट थोडीशी वाकवली की मध्यभागी असणाऱ्या सुरक्षा धाग्याचा हिरवा रंग इंडोगोमध्ये बदलताना दिसून येईल. 
  6. महात्मा गांधींचे नोटेवरील स्थान उजवीकडे मध्यभागी हलवण्यात आल्याचे दिसून येईल. 
  7. गव्हर्नरची स्वाक्षरी, हमी कलम, वचन खंड आणि आरबीआय चिन्ह उजवीकडे हलवण्यात आल्याचे दिसते. 
  8. महात्मा गांधींचा फोटो आणि इलेक्ट्रोटाइप वॉटरमार्क नोटेवर पारदर्शी स्वरूपात दिसून येते. 
  9. नोटेच्या वरच्या डाव्या आणि खालच्या उजव्या बाजूला छापलेले अंक डावीकडून उजवीकडे वाढत जाताना दिसतात. 
  10. नोटेवर लिहिलेले ५०० हे हिरव्या रंगापासून निळा रंग होत जाते. 
  11. नोटेच्या उजव्या बाजूला अशोक स्तंभ आहे. 
  12. नोट छापलेले वर्षही त्यावर लिहिलेले असते. 
  13. स्वच्छ भारतचे चिन्ह नोटेवर छापण्यात आलेले असते. 
  14. भाषा फलक हा बरोबर नोटेच्या मध्यभागी असतो. 
  15. लाल किल्यासोबत भारतीय झेंड्याचे चित्र नोटेवर दिसते. 
  16. देवनागरी भाषेत ५०० असे प्रिंट केलेले असते.

नक्की वाचा : नोटबंदीचे महत्व अधोरेखित करणारे करसंकलनाचे आकडे 

जे दृष्टीहीन लोक ५०० च्या नोटेचा वापर करतात, त्यांच्यासाठी आरबीआयने काळजी घेतली आहे. महात्मा गांधींचे पोट्रेट, अशोक चिन्ह आणि ओळख चिन्ह यांच्यासोबत : 

  1. नोटेच्या उजव्या बाजूला ५०० रुपये असलेले वर्तुळ. 
  2. नोटेवर उजवीकडे आणि डावीकडे ५ ब्लीड रेषा केलेल्या असतात. 
  3. महात्मा गांधींच्या पोट्रेटची छपाई हात फिरवला तर जाणवते. 

फसवणूक टाळण्यासाठी बघा – Rs500 Currency Note

निष्कर्ष : आपण बाजारातून ५०० च्या नोटा घेत असताना खबरदारी बाळगणे गरजेचे आहे. कधीही नोट घेतल्यानंतर वरील मुद्दे तपासून पाहावेत. त्या नोटेत खोट आढळली किंवा नोट नकली निघाली तर बँकेतून तिची तपासणी करून घ्यावी आणि संबंधित अधिकाऱ्याकडे त्यासंबंधित तक्रार दाखल करावी. 

नक्की वाचा : रिझर्व्ह बँकेने जाहीर केले १०० रुपयाच्या नोटेचे नवे रूप 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.