आयटीआर भरताना कलम ८०सीची रु. १.५ लाख मर्यादा संपली तर काय कराल?

Reading Time: 2 minutes

इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजेच आयटीआर भरताना कलम ८०सी अंतर्गत जर तुम्ही करबचत करत असाल आणि समजा तुमची १.५ लाख रुपयांची मर्यादा संपली तर काय कराल?

आटीआर भरताना कलम ८०सी अंतर्गत कर बचतीचे अनेक पर्याय निवडले जातात. कलम ८०सी अंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंत रक्कम वाचवता येते. परंतु करबचतीसाठी कलम ८०सी बरोबरच आयकर कायद्यामध्ये इतरही चांगले पर्याय उपलब्ध आहेत ज्याच्या मदतीने तुम्ही पैसे वाचवू शकता. कलम ८०सी प्रमाणे अजून कोणते पर्याय आहेत याबद्दल आपण माहिती घेऊया. 

१. कलम ८० डी – आरोग्य विमा प्रीमियम – 

 • सेक्शन 80 सी प्रमाणेच कलम ८०डी या पर्यायाचा वापर अनेकजण जास्त प्रमाणात करतात
 • तुम्ही तुमच्यासाठी, तुमच्या परिवारासाठी किंवा तुमच्या पालकांसाठी आरोग्य विमा घेता, यामधून तुम्ही २५,००० रुपयांपर्यंत वजावट घेऊ शकता. 
 • तुमच्या पालकांसाठी सुद्धा तुम्ही २५,०००पर्यंत डिडक्शन घेऊ शकता. 
 • जर तुमचे पालक हे ज्येष्ठ नागरिक असतील, तर तुम्ही ५०,००० पर्यंत डिडक्शन घेऊ शकता. कलम ८०डी च्या मदतीने ७५,००० एवढी रक्कम वाचवू शकता.

२. कलम ८०सी सी डी (१बी) – 

 • या कलमानुसार ५०,००० रुपयांपर्यंत अतिरिक्त कपात करण्याची परवानगी आहे. त्यासाठी तुमच्याकडे एनपीएस (NPS) खाते असायला हवे किंवा तुम्ही ते खाते उघडू शकता. 
 • या कलमाअंतर्गत तुम्ही ५०,००० रुपये एवढे डिडक्शन घेऊ शकता.

३. कलम ८०जी जी – 

 • जे करदाते नोकरी करतात त्यांना HRA मिळतो, ते त्याचा फायदा नक्की करून घेतात, परंतु ज्या पगारदार व्यक्तींना HRA मिळत नाही ते  आयकर कायदा कलम ८०जीजी च्या मदतीने आपला कर वाचवू शकतात. 
 • ज्या करदात्यांना HRA मिळत नाही व ते भाड्याने राहतात अशा लोकांना या कलमांतर्गत लाभ मिळू शकतो. 
 • या अंतर्गत वार्षिक ६०,००० रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.

४. कलम १०(१३ए) – 

 • जर तुम्ही करदाते असाल व तुमचे निवासस्थान हे तुमच्या पालकांच्या नावावर असेल, तर तुम्ही तुमच्या पालकांना घरभाडे देऊन या कलमाअंतर्गत लाभ घेऊ शकतात. 
 • त्यासाठी तुम्हाला तुमच्या पालकांसोबत रीतसर करार करावा लागतो व दरमहा भाडेपावतीही घ्यावी लागते. 
 • तुमच्या पालकांना मात्र या उत्पन्न रकमेवर आयकर भरावा लागेल. यामुळे पालकांचा टॅक्स स्लॅब बघूनच त्यांना भाडे द्यायचे की नाही ते ठरवा.  

हे नक्की वाचा: आयकर वाचविण्यासाठी ‘गिफ्ट डीड’ हा चांगला पर्याय आहे का?  

५. कलम ८०डी डी बी- 

 • या कलमाअंतर्गत ज्या व्यक्तींना गंभीर आजार आहे आणि त्याच्या उपचारासाठी ते पैसे खर्च करत आहेत, तर त्यांना १,००,००० रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. 
 • परंतु हा खर्च फक्त ज्येष्ठ नागरिकांवरच झालेला असला पाहिजे किंवा  करदाता हा स्वतः ज्येष्ठ नागरिक असला पाहिजे.

६. कलम ८०इ – 

 • या कलमाअंतर्गत जर तुम्ही उच्च शिक्षणासाठी कोणतेही कर्ज घेतले असेल, तर त्यावर भरल्या जाणाऱ्या व्याजावरील करावर तुम्हाला लाभ मिळू शकतो.

विशेष लेख: मृत व्यक्तीचे आयकर विवरणपत्र भरावे लागते का? 

अशा प्रकारे या आयकर कायद्यातील तरतुदींचा वापर करून तुम्ही आयकर रिटर्न भरताना तुमचे पैसे नक्कीच वाचवू शकता. तुम्हाला आयटीआर वेळेत भरण्यासाठी शुभेच्छा!

For suggestions queries – Contact us: info@arthasakshar.com 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

web search: आयटीआर कलम ८०सी माहिती 

Leave a Reply

Your email address will not be published.