Scam 1992 - हर्षद मेहता
Reading Time: 6 minutes

‘Scam 1992 – द हर्षद मेहता स्टोरी’

हर्षद मेहता हे नाव 80/90 च्या दशकात जन्मलेल्या भारतातल्या पिढीसाठी अनोळखी नाही. आत्ताच्या तरुण पिढीला हे नाव माहिती असायचं तसं काही खास कारण नव्हतं, पण हे नाव पुन्हा एकदा प्रकाशझोतात येण्याचं मुख्य कारण म्हणजे ‘Scam 1992 – द हर्षद मेहता स्टोरी’ ही वेबसिरीज. कित्येक कुटुंबाच्या वाताहतीचे कारण ठरलेला, भारताच्या आत्तापर्यतच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा करणारा, हर्षद मेहता याने भारतातील आर्थिक जगतातील गुन्हेगारीचा पाया रचला, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 

हे नक्की वाचा: शेअर बाजारातील प्राणी

1992 Scam या वेबसिरीजमध्ये हर्षद मेहताचा शेअर बाजारातील संपूर्ण प्रवास दाखविण्यात आला आहे. Sony liv या ओटीपी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या या वेबसिरीजचे एकूण 10 भाग आहेत. शेअर बाजारामधील आजवरच्या सर्वात मोठ्या घोटाळ्यावर वेबसिरीज बनवताना ती कुठेही रटाळ होणार नाही याची पुरेपूर काळजी दिग्दर्शकाने घेतली आहे.

Scam 1992 – द हर्षद मेहता स्टोरी: पटकथा

  • वेबसिरीजची पटकथा अतिशय रंजकपणे लिहिलेली असल्यामुळे शेअर बाजारात अजिबात रस नसणाऱ्यांनाही ही वेबसिरीज पुन्हा पुन्हा बघवीशी वाटेल.  
  • शेअर बाजाराबद्दल ‘शून्य’  माहिती ते शेअर बाजारातील  ‘बिग बुल’ म्हणून नाव कमावणाऱ्या हर्षद मेहाताचा हा प्रवास दाखवणे ही गोष्ट सोपी नक्कीच नव्हती. दिग्दर्शक हंसल मेहता यांनी हे आव्हान लीलया पेललं आहे.
  • वेबसिरीजची कथा जरी सत्यघटना असली, तरी पटकथा लिहिताना काही मोजक्या ठिकाणी ‘सिनेमॅटिक लिबर्टी’चा फायदा घेतला आहे. अर्थात हे करताना मूळ कथानकाला जराही धक्का लागणार नाही याची पुरेपूर काळजी दिग्दर्शकाने घेतली आहे.
  • शांतीलाल मेहता या अपयशी कापड व्यावसायिकाच्या कुटुंबात जन्माला आलेल्या हर्षदला क्रिकेटमध्ये प्रचंड रुची होती, पण शिक्षणात मात्र अजिबात रस नव्हता.
  • बी.कॉम. झाल्यानंतर पुढे शिकण्यापेक्षा वेगवेगळे व्यवसाय करून नशीब आजमायचा तो प्रयत्न करतो पण त्यामध्ये त्याला फारसे यश मिळत नाही. 
  • चाळीतलाच एक मुलगा शेअर बाजारात रग्गड पैसे कमावतो हे लक्षात आल्यावर हर्षदच्या मनात शेअर बाजाराबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण होते आणि अगदी पाचवी/ सहावी मुलं जी नोकरी सहज करू शकतील अशी जॉबरची नोकरी तो पत्करतो. कशासाठी, तर फक्त शेअर बाजार शिकण्यासाठी. 
  • जॉबरच्या नोकरीच्या पहिल्याच दिवशी त्यांची ओळख होते भूषण भटशी. भूषण भट हर्षदला शेअर बाजाराविषयी आणि बाजारातल्या प्रसिद्ध व्यक्तींविषयी संपूर्ण माहिती देतो. 
  • शेअर बाजाराच्या वातावरणात हर्षदच्या महत्त्वाकांक्षी स्वप्नांना नवे पंख लाभतात.
  • जॉबरची नोकरीतून बऱ्यापैकी उत्पन्न मिळत असतानाही, एका वळणावर हर्षद जॉबरची नोकरी सोडून स्वतःचे ट्रेडिंग अकाउंट सुरू करतो आणि मग सुरू होतो एका नवा प्रवास ! 

रिस्क है तो इश्क हैं

  • या वेबसिरीजमधल्या दोन गोष्टींनी प्रेक्षक अधिक भारावून जातात, त्या म्हणजे ऑन स्क्रीन हर्षद मेहता – प्रतीक गांधी आणि त्याचे डायलॉग्ज.
  • हुशारी आणि अभ्यासच्या जोरावर हर्षद शेअर बाजारात बिनधास्तपणे जोखीम स्वीकारत असतो. त्यात त्याला यशही मिळत असतं.  तो चाळीतून नव्या घरात रहायला जातो.
  • अशातच पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या वधामुळे शेअर बाजार गडगडतो आणि हर्षदचे पंख छाटले जातात.
  • हर्षद बरोबर बाजारात अनेकांना नुकसान सहन करावे लागते. पण हार मानेल तो हर्षद कसला. बाजारात झालेले नुकसान सहन करून तो पुन्हा एकदा फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतो. 

Scam 1992 – द हर्षद मेहता स्टोरी: सेकंड इनिंग

  • हर्षदला सुरुवातीपासून साथ देणारा त्याचा भाऊ अश्विन मेहता त्याच्यामागे नेहमी सावलीसारखा उभा असतो. 
  • दोघे मिळून Grow more नावाची फर्म सुरू करतात आणि काही दिवसातच ‘Grow More Research and Asset Management‘ ही बाजारातली नामांकित कंपनी बनते.  
  • जेव्हा तुम्हाला यश मिळतं तेव्हा तुम्हाला यशाबरोबरच हितशत्रू नावाची भेट मिळते. 
  • हर्षदच्या यशामुळे आणि त्याच्या व्यवसायतील खेळींमुळे बाजारातील प्रस्थापितांबरोबरच  त्याला इतर व्यावसायिक शत्रूही निर्माण होतात. मात्र या सगळ्यांवर मात करून यशाचे एक एक शिखर पादाक्रांत करत राहतो.  

Scam 1992: शेअर बाजार – एक गहरा कुवा

  • “शेअर बाजार एक गहरा कुवा है, जो दुनिया के हर एक इन्सान की पैसे की प्यास बुझा सकता हैं, और मैं इस कुवे में डुबकी लगाना चाहता हूं!”
  • हर्षद मेहता या नावाला इतकं महत्व प्राप्त होतं की केवळ शेअर बाजारच नाही तर सर्वसामान्य माणसांच्या मनात हर्षद ‘हिरो’ ठरतो. लोक त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू लागतात. हर्षदचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कित्येक लोक शेअर बाजारात आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न करतात.
  • ‘मनी मार्केट’मध्ये भरपूर पैसा मिळतो हे लक्षात आल्यावर ‘सबसे बडी जोखीम जोखीम ना लेने में हैं’ म्हणत हर्षद तिथेही शिरकाव करतो आणि त्याच्या यशाच्या कशा रुंदावत जातात सोबतच शत्रूंची संख्याही.  
  • हर्षदला लोक बाजारातील अमिताभ बच्चन म्हणत असत. राजकारण्यांपासून ते सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसांपर्यंत सर्वांच्या मनावर राज्य करणारा हर्षद सन 1991 मध्ये भारतातील सर्वात जास्त अग्रीम करदाता (Advance tax payer) होता, हे सत्य फार कमी लोकांना माहिती असेल.

बिग बुलला उतरती कळा:

  • हर्षदने त्याच्या कारकिर्दीत अनेकवेळा बेकायदेशीर मार्ग अवलंबले. अतिमहत्वाकांक्षी आणि बिनधास्त स्वभावामुळे त्याने ‘मनी मार्केट’च्या व्यवहारांमध्ये वाट्टेल तसा पैसा फिरवला, खेळवला आणि वापरलाही.
  • हितशत्रू त्याची नौका बुडण्याची वाटच बघत असतात. पण हर्षदच्या हुषारीमुळे आणि लोकप्रियतेमुळे त्यांना काहीच करता येत नाही. अखेर त्यांची ही इच्छा पूर्ण होते ती प्रामाणिक आणि तडफदार पत्रकार सुचेता दलाल यांच्या जागरूकतेमुळे. 
  • स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 500 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याची टीप मिळाल्यावर ‘सुचेता दलाल’ या प्रकरणांचा छडा लावायचा प्रयत्न करतात आणि  हळूहळू मनी मार्केटमध्ये होत असलेले गैरव्यवहार उघडकीस येतात.
  • आरबीआय व सेबीला याविषयी अगोदरपासूनच कुणकुण लागलेली असूनही त्यावेळी असलेल्या मर्यादित अधिकारांमुळे त्यांना फार काही करता येत नव्हते. पण मनी मार्केट मधल्या गैरव्यवहारांच्या आकड्यांमुळे मीडिया हात धुवून त्यांच्या मागे लागते आणि अखेर स्टेट बँकेतील रु. 500 कोटींच्या घोटाळ्याची केस सीबीआय कडे सोपवण्यात येते.  
  • 1992 साली हर्षदविरुद्ध  ईडी, इन्कम टॅक्स, क्रिमिनल, असे विविध 600 पेक्षा जास्त आरोप ठेवले जातात. यानंतर हर्षदवर शेअर बाजारात कायमची बंदी घालण्यात येते.
  • हर्षदच्या अटकेनंतर शेअर बाजार कोसळतो आणि अनेक लोक रस्त्यावर येतात, तर कित्येक कुटुंब उद्धवस्त होतात.
  • राम जेठमलानींसारख्या नामांकित वकिलांच्या मदतीने हर्षद काही केसेस मधून निर्दोष मुक्त होतो. 
  • शेअर बाजारात बंदी घातल्यामुळे हर्षदसाठी उत्पन्नाचं एक मुख्य दार बंद होतं.  पण स्वस्थ बसेल तो हर्षद कसला?  तो हार मानत नाही आणि शेअर बाजाराची माहिती देण्यासाठी वर्तमानपत्रात लेख लिहायला सुरुवात करतो. टीव्ही चॅनेलवर त्याचे इंटरव्ह्यूही सुरू होतात.
  • नशिबाचे फासे पुन्हा उलटे पडतात आणि त्याला पुन्हा अटक होते. त्यानंतर तुरुंगातच त्याला हृदयविकाराचा झटका येतो.
  • एकूणच या प्रकरणात अनेक नामांकित राजकारण्यांची नावे समोर आलेली होती. त्यामुळे हर्षद खरोखरच स्कॅमर होता की त्याला मोहरा बनविण्यात आलं, याचा निर्णय प्रेक्षकांनीच घ्यायचा आहे.

टॉप रेटिंग वेबसिरीज

  • शेअर बाजाराबद्दल ‘शून्य’  माहिती ते शेअर बाजारातील  ‘बिग बुल’ म्हणून नाव कमावणाऱ्या हर्षद मेहाताचा हा प्रवास दाखवणे ही गोष्ट सोपी नक्कीच नव्हती. दिग्दर्शकाने हे आव्हान लीलया पेललं आहे.
  • प्रत्येक भाग बघताना पुढच्या भागाची उत्सुकता वाटत राहते. दहाव्या भागात जेव्हा वेबसिरीज संपते तेव्हा एक दर्जेदार कलाकृती बघण्याचा आनंद प्रेक्षकांना मिळतो.
  • शेअर बाजारातील तांत्रिक आणि अंतर्गत गोष्टींची माहिती,  जवळपास 30/ 35 वर्षांपूर्वीचा शेअर बाजार या गोष्टी बघणं एक नवा अनुभव आहे. 
  • Imdb वर 9.5 रेटिंग मिळविणारी ‘Scam 1992 – द हर्षद मेहता स्टोरी’ ही वेबसिरीज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्याचे मुख्य कारण म्हणजे ही वेबसिरीज तुम्ही संपूर्ण कुटुंबासोबत बघू शकता.
  • सास-बहू टाईप डेली सोपला कंटाळलेले प्रेक्षक वेबसिरीजकडे वळू लागले आहेत. त्यांच्यासाठी अशा वेबसिरीज म्हणजे मनोरंजनाची पर्वणीच आहे.
  • सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कुठलीही अश्लील दृश्य, हिंसा, शिवराळ संवाद यांचा वापर न करताही उत्कृष्ट कंटेंट आणि कलाकारांच्या सरस अभिनयावर वेबसिरीज लोकांच्या पसंतीस उतरू शकते, हे या वेबसिरीजने दाखवून दिलं आहे.
  • प्रतीक गांधी या कलाकाराने इतका उत्तम अभिनय केला आहे की त्याने हर्षद मेहताला लोकांच्या नजरेत ‘हिरो’ बनवला आहे. प्रतिकासारखे ‘अंडररेटेड’ कलाकार बॉलिवूडमधल्या ‘खानावळी’ व्यतिरिक्त आणि त्यांच्यापेक्षाही सरस कलाकार भारतात आहेत, याची प्रेक्षकांना जाणीव करून देतात.
  • शेअर बाजारातील घोटाळ्यासारख्या रुक्ष विषयावर आधारित असूनही वेबसिरीज तितकीच भावनिक आणि रंजक झली आहे. यामधले अनेक प्रसंग सुंदर जमून आले आहेत. हर्षदचं ‘लाला’ म्हणून हाक मारणं, ‘कोला पार्टी’ ‘सुचेता दलाल आणि देबाशिष यांची हलकी-फुलकी प्रेमकहाणी’, असे अनेक प्रसंग मस्त जमून आले आहेत
  • हर्षदला गैरमार्गाने जाताना वारंवार थांबवण्याचा प्रयत्न करणारा, परंतु त्याच्या प्रत्येक निर्णयात त्याला सावलीसारखी साथ देणारा त्याचा भाऊ अश्विन मेहता व हर्षदची केमिस्ट्रीही सुंदर.
  • हर्षदच्या वडिलांचा मृत्यू, त्याच्या आवडत्या गाडीचा लिलाव, अटक झाल्यानंतर हवालदिल झालेला हर्षद आणि शेवटच्या भागात दाखवलेला मृत्यूचा प्रसंग पाहून डोळे पाणावतात. 
  • वेबसिरीज मध्ये ‘निगेटिव्ह’ म्हणण्यासारख्या गोष्टी जवळपास नाहीतच. अगदीच चंद्राला डाग लावायचा तर, ‘सुचेता दलाल‘यांचं व्यक्तिमत्व प्रेक्षकांच्या मनाला भिडत नाही. आर्थिक जगतातले कित्येक घोटाळे उघडकीस आणणाऱ्या पद्मश्री विजेत्या पत्रकार सुचेता दलाल यांच्या व्यक्तिमत्वाला न्याय देण्यात ही वेबसिरीज काहीशी कमी पडली आहे. 
  • वेबसिरीजच्या शेवटी व्यक्तिरेखांची खरी नावे व चेहरे थोडक्यात ‘रिअल वर्सेस रील’ दाखवायला हवे होते. पण काळजी करू नका ही कमी अनेक यु ट्युबर्सनी भरून काढली आहे.

जर तुम्हाला शेअर बाजारात रस असेल, तर तुम्ही ही वेबसिरीज नक्कीच बघणार आणि नसेल, तर एक चांगली कलाकृती म्हणून ही वेबसिरीज नक्की बघा. आखीर ‘रिस्क है तो इश्क है!’

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web search: Scam 1992 in Marathi, Scam 1992 Marathi Mahiti, Harshad Mehta Marathi, Harshad Mehta in Marathi, Harshad Mehta Marathi Mahiti, Scam 1992 web series review in Marathi, Scam 1992 Web series detail Review in Marathi

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…