कलम २४F नुसार आयकर कायदा २०१७-१८ या आर्थिक वर्षापासून जास्त कडक करण्यात आला आणि मूल्यांकन वर्ष २०१८-१९ पासून तो जास्त प्रभावीपणे अंमलात आला. आपले उत्पन्न जर करपात्र मर्यादित रकमेपेक्षा कमी असेल तर आपण वेळेत उत्पन्न कर भरून उशीराची फी भरणे टाळू शकतो.
मागिल आर्थिक वर्षांचे आय.टी.आर.(ITR) भरू शकतो का?
३१ ऑगस्ट ही तुमची इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजेच आयटीआर भरण्याची शेवटची तारीख होती. पण तरीही आपण रिटर्न भरला नसेल, तर दंड टाळण्यासाठी आपण ३१ डिसेंबर पूर्वी भरणे आवश्यक आहे.
- अर्थसंकल्प २०१७ मध्ये नमूद असलेल्या कलम २३४एफ नुसार उशीरा आयटीआर भरणा-यांसाठी कायदा तयार करण्यात आला आणि २०१७-१८ या आर्थिक वर्ष किंवा २०१८-१९ या मूल्यांकन वर्षापासून लागू करण्यात आला. आपण ३१ डिसेंबर रोजी किंवा त्यानंतर आयटीआर दाखल केल्यास ५००० रूपये दंड म्हणून भरावे लागतील.
- ३१ डिसेंबर २०१९ नंतर आयटीआर दाखल केल्यास १०००० रूपये दंड म्हणून भरावे लागतील. उशीरा भरण्याची मुदत ही संबंधित मूल्यांकन वर्षापर्यंतच म्हणजेच १ जानेवारी २०२० ते ३१ मार्च २०२० पर्यंत असेल.
- बहुतेक सर्व इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याच्या फाईल्स मूल्यांकन वर्षातच दाखल केल्या जातात. आर्थिक वर्ष २०१८-२९ साठी २०१९-२० हे मूल्यांकन वर्ष आहे.
- उशीरा कर भरल्यास आकारली जाणारी फी किंवा दंड
- आर्थिक वर्ष २०१७-१८ पासून करदात्यांना कर परतावा भरण्यास प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने उशीराची फी किंवा दंड चालू केला आहे. ३१ डिसेंबर पूर्वी भरल्यास ५००० रूपये दंड आहे व १ जाने ते ३१ मार्च पर्यंत भरल्यास १०००० रूपये दंड आकारला जाईल.
आयटीआर दाखल करण्याची
अंतिम मुदत |
दंडाची रक्कम |
दि. ३१/०८/२०१९ ते ३१/१२/२०१९ | रू. ५००० |
दि. ०१/०१/२०२० ते ३१/०३/२०२० | रू. १०००० |
- आता जर आपले एकूण उत्पन्न करपात्र मर्यादेपेक्षा कमी असेल तर, उशीरा आयटीआर दाखल करणे आवश्यक नाही. ज्यांचे उत्पन्न ५ लाखांपेक्षा जास्त नसेल, त्यांना जास्तीत जास्त १००० रूपये दंड म्हणून भरावे लागतील.
आयकर रिटर्न वेळेत दाखल करण्याचे ९ फायदे
आयटीआर भरण्याची मुदत संपून गेल्यास काय करावे?
- भारतामध्ये आयटीआर भरण्याची ३१ ऑगस्ट २०१९ ही शेवटची तारीख होती. बहुतेक करदाते ज्यांचे करपात्र उत्पन्न मूलभूत सूट मर्यादेपेक्षा जास्त आहे किंवा भारतीय रहिवाशी असुनही विदेशात काही मालमत्ता आहे किंवा एखाद्या छोट्या फर्म किंवा कंपनीचे मालक आहेत, कर व्यवहार तपासणीशी संबंधित आहेत अशा लोकांसाठी ३१ ऑक्टोबर २०१९ पर्यंत कर भरण्याची मुदत आहे.
- या विशेष उपाययोजनेनंतरही करदाता अंतिम मुदतीपर्यंत भरण्यास असमर्थ असेल किंवा आयटीआरची रक्कम भरूनही त्यात काही चूक झाली असेल, तर काळजीचं काही कारण नाही करदात्यांना लेट फी किंवा दंड भरून अजुन दुरुस्ती करता येऊ शकते.
- दिलेल्ल्या मुदतीमध्ये आयटीआर भरणे शक्य झाले नाही तर, विलंब कर परतावा अंतर्गत तुम्ही आयटीआर भरण्यासाठी अर्ज दाखल करू शकता.
- चालू आर्थिक वर्षाच्या समाप्तीपासून एक वर्षापूर्वी किंवा काही कार्यवाही होण्यापूर्वी आपल्याला फाईल दाखल करता येते.
- थोडक्यात सांगायचं तर, आर्थिक वर्ष २०१८-१९ साठी (१ एप्रिल २०१८- ते ३१ मार्च २०१९) आयटीआर ३१ मार्च २०२० पर्यंत भरता येतो. कर अधिकारी आपल्या मूल्यांकनाची प्रक्रिया तोपर्यंत पूर्ण करत नाहीत. म्हणून लवकरात लवकर आयटीआर भरणे योग्य आहे. अर्थात कोणतीही गोष्ट सहज मिळत नसते, कर भरण्याची प्रक्रिया ही अशीच आहे. मुदतीनंतर रिटर्न भरल्यास होणाऱ्या परिणामांची कल्पना करदात्यांना असणे गरजेचे आहे.
- मुदतीत कर भरला नाही तर, झालेलं नुकसान पुढील आर्थिक वर्षाच्या व्यवहारात घेता येणार नाही. आयकर कायद्यानुसार आयटीआर दाखल न केल्यास नुकसानीची रक्कम (carry forward of losses) पुढे घेता येणार नाही. हो पण काही स्थावर मालमत्तेमधून तोटा झाल्यास, हे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.
पगारदारांनो आयकर विवरणपत्र भरताना ही काळजी घ्या
अतिरिक्त व्याज
- करदात्यांना कर भरला नाही तर त्यांना कराच्या थकबाकीवर महिनाभरात १℅ जास्तीच व्याज भरावे लागेल. एका महिन्याचे काही दिवस गेले असले, तरी संपूर्ण महिन्याचे व्याज भरावे लागते.
सुधारित आयटीआर
- सुधारित आयटीआर म्हणजे काही ठिकाणी मुदतीच्या आत कर भरला जाऊ शकतो किंवा उत्पन्न मोजण्यात काही फरक आढळल्यास, करदात्याची माहिती चुकल्यास किंवा माहिती उपलब्ध नसणे अशी परिस्थिती येऊ शकतो. या ठिकाणी सुधारित कर परतावा भरून चुका सुधारता येतात.
- ज्यांनी आयटीआर भरला आहे ते सुद्धा बदल हवा असल्यास सुधारित आयटीआर दाखल करू शकतात.
- आयटीआर प्रमाणेच सुधारित आयटीआर दिलेल्या मुदतीत भरता येतो. म्हणजे आर्थिक वर्ष संपल्यानंतर, पुढील एक वर्ष संपण्यापूर्वी. आपली मूल्यांकनाची प्रकिया कर अधिकारी तोपर्यंत पूर्ण करत नाहीत. आर्थिक वर्ष २०१८-१९ चा सुधारित कर परतावा ३१ मार्च २०२० पर्यंत दाखल करता येतो.
- आयटीआर सुधारित करण्यासाठी काही मर्यादा नाहीत. आपल्या आयटीआर मध्ये चुका किंवा त्रुटी आढळल्यास, आपण सुधारित आयटीआर भरू शकतो. या प्रकियेमध्ये सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
- आपली वैयक्तिक माहिती योग्य आणि कायदेशीर लोकांना चुकीचे द्यावी. विलंब आयटीआर आणि सुधारित आयटीआर भरण्याची प्रक्रिया जवळपास सारखीच आहे.
बँक व्यवहार, परदेशी सहली आणि वीज बिल ठरवणार तुमचा ‘आयटीआर’
अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा-
https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en
Disclaimer: आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/