Parkinson law पार्किन्सनचा सिद्धांत
Reading Time: 3 minutes

Parkinson law: पार्किन्सनचा सिद्धांत

सन १९५५ साली, प्रसिद्ध इतिहासकार आणि लेखक ‘सिरील नॉर्थकोट पार्किन्सन यांनी, “काम पूर्ण होण्यासाठी आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ दिला तर काम वाढतं, कामाची चालढकल होते” सिद्धांत जगासमोर मांडला (Parkinson law). याचा प्रमुख फायदा उत्पादन क्षेत्रात असणाऱ्यांना झाला. कारण वेळेत काम पूर्ण झालं नाही, तर आपली उत्पादकता कमी होते व याचा परिणाम गुणवत्तेवर होऊ शकतो. पुढे अनेक अर्थतज्ञांसाठी सुद्धा हा सिद्धांत मोलाचा ठरला. 

तुम्ही नेहेमी कामाची डेडलाईन चुकवता? मग हे वाचा

काय आहे पार्किन्सनचा सिद्धांत (Parkinson law)

  • पार्किन्सनच्या ब्रिटिश प्रशासनात काम केल्याचा अनुभवामुळे तो नोकरी आणि धंदा दोन्हींमध्ये असलेला फरक ओळखू शकत होता. 
  • स्वाभाविकपणे सकाळपासून संध्याकाळपर्यंत काहीतरी काम म्हणजे नोकरी पत्करणे हे नवीन नसतं, पण त्या पलिकडे एखादा धंदा सुरू करून स्वत:ला आजमावून पाहणं तसं कठीणंच! मग अशा ठिकाणी, रेटून काम करण्यापेक्षा काही स्मार्ट पद्धतींनी काम केलं अधिक लवकर होऊ शकतं,असं लक्षात आलं. मग त्या स्मार्ट पद्धती कोणत्या व कशा निवडायचा हे ज्याचं त्यानीच ठरवावं. 
  • थोडक्यात पार्किन्सनचा सिद्धांत असं सांगतो की, कामाचं स्वरूप लक्षात घेऊन त्यासाठी लागणारा वेळ ठरवला पाहिजे. ‘काम पूर्ण होण्यासाठी जास्त वेळ दिला गेला तर कामाची चालढकल होते ‘ 
  • निरीक्षणात्मक सांगायचं झालं तर, पार्किन्सनच्या म्हणण्यानुसार ,काम किती अवघड किंवा सोपं आहे यानुसार वेळ देण्यात यावा दोन दिवसाच्या कामाला आठवडाभराचा वेळ मिळाला तर आपण मानसिकदृष्ट्या ते काम लवकर पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न करीत नाहीत. 

या ५ सवयी असतात यशाच्या मार्गातले सर्वात मोठे अडथळे

  • मानवी स्वभावानुसार ते काम पुढे ढकललं जातं व अधिकच लांबणीवर पडतं. 
  • उदाहरणार्थ, म्हणजे रोजचा स्वयंपाक पूर्ण करून ऑफिस गाठायचं असेल, तर तासाभरात आपला स्वयपाक होऊ ही शकतो पण तेच जर ऑफिस नसेल किंवा सुट्टीचा दिवस असेल तर १० वाजता होणा-या स्वयंपाकाला दुपारचे २ ही वाजतात मग स्वयंपाक पूर्ण करणं ही तेवढ्या वेळेपुरतं कंटाळवाणं वाटतं 
  • काही कर्मचारी, हार्ड वर्कला पर्याय शोधायचा प्रयत्न करतात. पण संस्थेला जास्तीत जास्त केलेल्या कामाची आणि कष्ट करणा-या लोकांचीच गरज असते, स्मार्ट किंवा जलद गतीने काम संपवणं म्हणजे पळवाट नसून, ते काम अधिक चांगल्या आणि उत्कृष्ट पद्धतीने कसं केलं जाऊ शकतं याचं अचूक नियोजन. 
  • काही ठिकाणी वेळेनुसार चालण्यापेक्षा वेळेच्याही पुढे धावून म्हणजे त्या कामाला वाहून नेण्याची गरज असते. अशा परिस्थितीत किती वेळेत किती आणि कसं काम संपवायचं याचं ठाम नियोजन असायला हवं, कामाची यादीच तयार असायला हवी. 
  • माणसाच्या अंत:प्रेरणेपासून एखाद्या कामाची सुरूवात झाली, तर परिस्थितीच ते काम पार पाडण्यासाठी मदत करते. अर्थात पहिल्याच प्रयत्नात प्रत्येकजण तसंच काम करेल अशी अपेक्षा ठेवण चुकीचंच, पण काही गोष्टींच्या मदतीने हे साध्य होऊ शकतं. 
  • उदा. संगणकावर काम चालू असल्यास वेळ मर्यादा ठरविण्यासाठी ‘डिजीटल टाईमर’ वापरले जाऊ शकते.  तंत्रज्ञानाच्या मदतीने गोष्टी सुलभ झाल्या आहेत.
  • प्रथमत: कामाचं स्वरूप लक्षात घ्यायला हवं.आपल्याकडे कामासाठी लागणारा मुबलक वेळ असेल तर, काम पुढे ढकलणं, मध्येच ते काम स्थगित करणं आणि मग ऐनवेळी डेडलाइनसाठी शेवटचे काही दिवस रातोरात मेहनत करणं असंही होतं. 
  • याचं एक उदाहरण म्हणजे आपल्याला माहित असणारा इंजिनिअरिंगचा विद्यार्थी. परिक्षा तोंडावर आली की रात्रीतून कसा अभ्यास होऊ शकतो हे फक्त तेच जाणतात. आणि हो त्यांना या गोष्टीचा अभिमान असतो, ही गोष्ट वेगळी. 
  • विशिष्ट वेळी व ठराविक कालावधीसाठी येणारा मानसिक तणाव टाळण्यासाठी पार्किन्सनच्या सिद्धांताप्रमाणे नियोजन करा. तसे केल्यास, या गोष्टी सहज आणि यशस्वीपणे होऊ शकतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे गैरवाजवी डेडलाइन्स पूर्ण करण्यासाठी पार्किन्सनच्या सिद्धांताचा वापर करू नये. 
  • पुढे ‘जोश कौफमन’ यांनी पार्किन्सनच्या सिद्धांताचं वर्णन केलं ते असं, “वेळेनुसार काम पूर्ण करण्यात यावं. डेडलाइन उद्याची असेल, तर उद्यापर्यंतच ते काम करण्यात यावं, कामाचं स्वरूप, महत्त्व आणि डेडलाइननुसार नियोजन असावं. थोडक्यात सांगायचं तर प्रत्येक कामासाठी वेळ हा लागतोच, एका दिवसात किंवा आठवड्यातही सगळीच काम पूर्ण होऊ शकत नाहीत. 
  • छोटीशी कामे जसं की फोन कॉल्स, काही मिंटींग्स या अल्पशा अवधीतही संपू शकतात त्यासाठी दिवसभराचा वेळ देणं योग्य नसतं. कामाप्रती असलेला दृष्टीकोन, सकारात्मकता, त्यामागची प्रेरणा आणि उत्साह ते काम किती वेळात होऊ शकतं ठरवतो. 

कसे कराल कामाच्या वेळेचे नियोजन? वाचा हे ६ नियम

  • आता आपण आपल्या दैनंदिन जीवनात पार्किन्सनचा सिद्धांत कसा वापरु शकतो याची काही उदाहरणे –
    • कॉलेजमध्ये प्रत्येक सेमिस्टरला परिक्षा घेण्यात येते, पण तरीही तुम्ही शेवटच्या काही ७२तासात ते काम करायला घेतात आणि पहाटे ५ ला पूर्ण होतं. 
    • काम पूर्ण करण्यासाठी आठवड्याचा वेळ असूनही शुक्रवारी संध्याकाळी ४.३० पर्यंत पूर्ण व्हावं यासाठी ओढाताण केली जाते. 
    • कुठे पिकनिक किंवा एखाद्या लग्नाला जायचं हे माहित असूनही त्याआधी ४-५ आठवडे तुम्ही खाण्यापिण्याच्या विशिष्ट पथ्याचा आग्रह धरता. 

सारांश असा की, असलेल्या वेळेनुसार कामाची व्याप्ती ठरविण्यात यावी, कधी कधी काही गोष्टी परिस्थितीवर सोडून द्याव्या लागतात, अशा ठिकाणी अती मानसिक तणाव घेणं उपयोगाचं नसतं. काम किती अवघड आहे, डेडलाइन्स कधीची आहे त्यानुसार योग्य नियोजन केल्यास सहज आणि सुलभरीत्या आपण यशस्वी होऊ शकतो. 

कशी तयार कराल प्राधान्य यादी (To do list)?

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बी.ए. नंतरचे सर्वोत्तम करिअर पर्याय

Reading Time: 4 minutes बी.ए. नंतरचे करिअर पर्याय  ग्रॅज्युएशननंतर करिअरचे कोणकोणते पर्याय उपलब्ध असतात याबद्दलची माहिती…

बी.कॉम. नंतरचे १० करिअर पर्याय

Reading Time: 5 minutes बी.कॉम. नंतरचे करिअर… ग्रॅज्युएट झाल्यावर चांगल्या करिअरसाठी पुढचे शिक्षण घेणे आवश्यक असते. ग्रॅज्युएशन…

वाचनाचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Reading Time: 2 minutes वाचायचे कशासाठी? त्यातही नेमके काय वाचायचे, त्याचा फायदा काय? असे प्रश्न तुम्हालाही पडतात का? वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी काय करावे? ज्ञान मिळवण्याशिवाय वाचनाचा काय फायदा असतो? अशा सगळ्या प्रश्नांची उकल आपण या लेखात करूया.

सहलीचे नियोजन करताना लक्षात ठेवा या ७ महत्वाच्या गोष्टी

Reading Time: 3 minutes सहल म्हटलं की आठवते ती शाळेची बस, ते मित्र-मैत्रिणी आणि शाळेचे हवेहवेसे वाटणारे दिवस! या कल्पना त्याकाळीही खूप आनंददायी वाटायच्या. हल्ली मात्र सहलीच्या कल्पना बदलल्या आहेत. हल्ली ट्रीपसाठी बाहेर पडायचं म्हणजे व्यवस्थित नियोजन करणे आवश्यक आहे. आपल्या सहलीची ठिकाणे, सोबतीला लागणारे साहित्य, खाण्याचे पदार्थ वगैरे वगैरे. योग्य नियोजन नसेल, तर अचानक येणा-़या अडचणींमुळे सहलीचा आनंद घेता येत नाही. सहलीच्या नियोजनासाठी काही महत्त्वाच्या टिप्स –