Reading Time: 3 minutes

गेल्या आर्थिक वर्षात (सन 2022-2023) शेअरबाजार हा एका विशिष्ट रेंज मधेच राहिला वेगवेगळ्या कारणाने बाजारात तीव्र चढउतार झाले. अनेकदा बाजार आता वाढणारच नाही या निष्कर्षाप्रत सर्वजण आले असता तो वाढायला लागला आणि सातत्याने तेजी दाखवत असताना किरकोळ कारणाने पडला. या काळातील मुंबई शेअरबाजाराच्या निर्देशांकाने 0.7% इतकी मामुली वाढ दर्शविली. बाजार वरखाली होत असताना तो एका मर्यादेतच राहिला. सुदैवाने आता परिस्थिती बदलली असून एकंदर तेजीची चिन्हे दिसत आहेत.

        सोन्याचांदीमध्ये अल्पकाळात भरघोस वाढ झाली. खनिज तेलाचे भावही खूप झटकन वाढले. अलीकडे ते वाजवी पातळीवर आले आहेत, डॉलर मजबूत झाला. बाजार जरा गती घेऊ लागला तेवढ्यात अडाणी उद्योग समूहाच्या संदर्भात हिडंनबर्ग रिपोर्टने घात केला आणि मोठा ब्रेक लागला. असं काहींना काही होत राहणारच त्यामुळेच बाजारात जी खळबळ माजते त्यामुळे बाजारात येण्याची अनेकांना प्रेरणा मिळते. लोकांनीही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे भांडवल बाजारात सहभाग घ्यावा असे सरकारचे धोरण आहे, यासाठी गुंतवणूकदारांना प्रोत्साहन दिले जाते. यापूर्वी अनेक कारणाने बाजारावरील लोकांच्या विश्वासाला तडा गेला. तसे होऊ नये यादृष्टीने सेबी दक्षता घेते,उशिरा का होईना त्यावर काहीतरी उपाययोजना केली जाते. (असे असले तरी ठराविक कालावधीने काहींना काही घोटाळे कधीतरी उघडकीस येत असतात)

हेही वाचा: म्युच्युअल फंडातून उत्कृष्ट परताव्यासाठी ‘ही’ काळजी घ्या !

म्युच्युअल फंड व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे म्हणून त्यांच्या सर्व योजनांचे 5 प्रमुख आणि 36 उपप्रकारात त्यानंतर त्यात अजून काही योजनांची भर टाकून 39 उपप्रकारात विभागणी करण्यात आली. यामुळे गुंतवणूकदारास आपल्या जोखीम स्विकारण्याच्या क्षमतेनुसार निश्चित पर्याय निवडणे सोपे झाले. मोठ्या, मध्यम आणि छोट्या कंपन्या नेमक्या कुणाला म्हणावे याचे निकष ठरवल्याने त्याबद्दल निश्चित सांगता येऊ लागले. म्युच्युअल फंडाच्या व्यवस्थापकाचे मुख्य काम म्हणजे गुंतवणूकदारांना उत्तम परतावा मिळवून देणे. हा परतावा बाजार परताव्याहून अधिक असावा अशी साहजिकच अपेक्षा पण परिस्थिती अशी की बाजाराचा उतारा गेल्या तीन वर्षांतील सर्वात किमान म्हणजे 1% हून कमी, अशा परिस्थितीत फंड व्यवस्थापकाच्या कौशल्याचा कस लागतो. या पार्श्वभूमीवर बिझिनेस स्टँडर्ड या वृत्तपत्रातील ‘मल्टिकॅप फंडाचा परतावा फिक्स डिपॉझिटहून अधिक’ या शिर्षकाची बातमी लक्षवेधी वाटली. खर तर अशी तुलना होऊ शकत नाही कारण मुदत ठेवी बँकेत असतील तर म्युच्युअल फंड योजनेपेक्षा 5 लाख रुपयांच्या मर्यादेत सुरक्षित आहेत तर थेट शेअर बाजारात गुंतवणूक करण्यातील जोखमीपेक्षा म्युच्युअल फंड योजनेत जोखीम विभागली जाते. असे असलं तरी या दोन्ही गोष्टी पूर्णपणे भिन्न आहेत.

       सर्वसाधारणपणे गुंतवणूक सल्लागार आपल्या ग्राहकांना त्यांची जोखीम क्षमता जाणून घेऊन लार्ज कॅप, ब्लू चिप फंड अशा कमी धोकादायक फंड योजनांत तर धाडसी लोकांना स्मॉल कॅप फंडात गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात. अधिक परतावा आणि कमी धोका अशा व्यक्तींना फ्लेक्सजी कॅप फंडात गुंतवणूक करायला ढोबळमानाने सांगतात. आज ज्याला मल्टिकॅप समजलं जातं त्यास पूर्वी फ्लेक्सजीकॅप म्हणत असत. सध्या मल्टी कॅप आणि फ्लेक्सजी कॅप यात असलेला प्रमुख फरक म्हणजे  मल्टिकॅप फंडात मिड कॅप आणि लार्ज कॅप प्रत्येकी किमान 25% असतात. तर फ्लेक्सजी कॅप मध्ये हेच प्रमाण बाजाराच्या दिशेनुसार कितीही कमी अधिक असू शकते. त्यामुळेच मार्केट व्होलाटाईल असताना फ्लेकजी कॅप फंडातून अधिक परतावा मिळणे अपेक्षित आहे. अशीच अपेक्षित पूर्तता काही  फंडांकडून झाली. बहुतेक मल्टी कॅप फंडानी वरील कालावधीत दोन अंकी परतावा दिला.

विविध प्रकारातील योजनांचे मागील वर्षातील परातव्यासह प्रगती पुस्तक असे- (संदर्भ अँफी संकेतस्थळ येथे दिनांक 9 मे रोजी उपलब्ध असलेली माहिती)

*मल्टिकॅप फंड – प्रमुख योजनांपैकी सर्वाधिक वार्षिक परतावा 23.96% तर सर्वात कमी परतावा 8.78% हे उल्लेखनीय यासाठी की याच काळासाठी ठेवलेल्या मुदत ठेवींचा परतावा 6 ते 7.5% होता. म्हणजेच या योजनांच्या परताव्याने निर्देशांक बीएसई 500 आणि मुदत ठेव याहून अधिक परतावा दिला.

यातील बीएसई 500 निर्देशांकाने 11.88% वाढ वाढ दाखवली आहे. तेव्हा या प्रकारातील अधिक परतावा देणाऱ्या योजना कोणत्या, तेही आपण जाणून घेऊच!

*11 करबचत योजना (ईलएसएस) वार्षिक परतावा 14%

*10 मिडकॅप योजना वार्षिक परतावा 12%

*12 फेक्सजीकॅप योजना वार्षिक परतावा 10%

या सर्व योजनांनी सेन्सेक्स निफ्टी या लोकप्रिय निर्देशांकांवर मात केली आहे.

उत्तम परतावा देणाऱ्या  काही मिडकॅप योजना

★एचडीएफसी मिडकॅप फंड

वार्षिक परतावा 23.96%

★निप्पोन इंडिया मल्टिकॅप फंड

वार्षिक परतावा 22.74 %

★कोटक मिडकॅप फंड

वार्षिक परतावा 18.95%

★बंधन मिडकॅप फंड

वार्षिक परतावा 23.96%

★आयटीआय मिडकॅप फंड

वार्षिक परतावा 16.87%

★इन्वेस्को इंडिया मिडकॅप फंड

वार्षिक परतावा 15.40%

★आयसीआयसीआय प्रुडेंशियल मिडकॅप फंड

वार्षिक परतावा 14.44%

★अक्सिस मिडकॅप फंड

वार्षिक परतावा 23.96%

★आदित्य बिर्ला सनलाईफ मिडकॅप फंड

वार्षिक परतावा 23.96%

★क्वान्ट ऍक्टिव्ह फंड

वार्षिक परतावा 11.35%

सर्व योजनांचा –

योजना आधार निर्देशांक निफ्टी 500

प्रमाण 50:25:25

निर्देशांक परतावा 11.88%

मिळालेला परतावा थेट योजनांचा (डायरेक्ट प्लॅन) आहे सर्वसाधारण योजनांच्या बाबतीत तो त्याहून 1 ते 2% कमी आहे.

    ही माहिती केवळ अभ्यासासाठी असून ती कोणत्याही योजनांची शिफारस नाही. शेअर्सवर आधारित म्युच्युअल फंडाच्या योजना अधिक धोकादायक मानल्या जातात. गेल्यावर्षी उत्तम परतावा मिळाला म्हणजे याही वर्षी तो तसाच मिळेल किंवा भविष्यात मिळत राहील याची कोणतीही हमी नाही तेव्हा कोणतीही गुंतवणूक करताना आपल्या गुंतवणूक सल्लागाराची मदत घ्यावी, योजनेतील जोखीम समजून घ्यावी आणि स्वतःच्या जबाबदारीवर योग्य निर्णय घ्यावा.

©उदय पिंगळे

(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारी मंडळाचे सदस्य असून लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक समजावीत)

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना म्हणजे काय?

Reading Time: 2 minutes Phule Yojna –  महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही केंद्र सरकारची…

ESIC- सरकारची ‘इएसआयसी योजना’ तुम्हाला माहिती आहे का?

Reading Time: 3 minutes ESIC- इएसआयसी  योजना  एका मध्यमवर्गीय एकत्र कुटुंबातली हुशार मुलगी कार्तिकी. शिष्यवृत्तीतून शिक्षण…

केवायसी म्हणजे काय? ती ऑनलाईन कशी करावी?

Reading Time: 2 minutes बँकेत खाते उघडायला गेले की केवायसी केलेली आहे का? हा प्रश्न पहिल्यांदा…