Reading Time: < 1 minute

सध्या ऑनलाईन बँकिंगचा वापर झपाट्याने वाढला आहे. बँकेकडूनही ऑनलाईन व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध ऑफर्स व सुविधा ग्राहकांना दिल्या जात आहेत. आता यामध्ये भर पडली आहे एका नवीन नियमाची!

नवीन नियमाप्रमाणे आता एनईएफटी (NEFT) सुविधा आता २४× ७ तास वापरता येणार आहे. यामुळे दिवसभरात केव्हाही एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करता येतील. 

  • आरबीआयच्या आदेशानुसार या सुविधेचा लाभ १६ डिसेंम्बर २०१९ म्हणजेच सोमवारपासून घेता येणार आहे.

  • एनईएफटी आणि आरटीजीएस या दोन्ही यंत्रणांवर आरबीआयचं नियंत्रण असतं. तसंच, बँकिंग अधिक सुलभ करता यावं यासाठी आरबीआयकडून नवनवीन नियम लागू करण्यात येतात.

  • आरबीआयकडून यासंदर्भातील नवा नियम ४ डिसेंबर रोजी जारी करण्यात आला होता.

  • ऑक्टोबर २०१८ ते सप्टेंबर २०१९ या कालावधीमध्ये नॉन कॅश रिटेल पेमेंटमध्ये डिजिटल पेमेंटने जवळपास ९६% व्यवहार झाले आहेत. तर, ‘एनईएफटी’च्या माध्यमातून रु. २५२ कोटी आणि यूपीआय पेमेंट यंत्रणांच्या माध्यमातून रु. ८७४ कोटींचे व्यवहार झाले आहेत.  

  • पूर्वी एनईएफटी सुविधेचा लाभ सकाळी ८ ते संध्याकाळी ६.३० या वेळातच घेता येत होता. मात्र आता नव्या नियमानुसार २४ तासात कधीही ‘एनईएफटी’द्वारे व्यवहार करता येतील.  

  • सध्या एनईएफटी व्यवहारांवर शुल्क आकारण्यात येत असले, तरी जानेवारी २०२० पासून एनईएफटी व्यवहारांवर कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. 

  • पूर्वी बँकेच्या कामाच्या वेळेनंतर एनईएफटी व्यवहार झाल्यास, सदर व्यवहार दुसऱ्या दिवशी पूर्ण होत असत. मात्र, आजपासून कधीही ट्रान्सक्शन केलं, तरी ते त्वरित पूर्ण होईल.  

लवकरच बँकांची एटीएम कार्डसंदर्भातील  नियम बदलण्यात येणार आहेत. यासंदर्भात नवीन नियमावली ३१ डिसेंबरला जारी करण्यात येईल. एटीएमचा गैरवापर आणि सायबर गुन्हेगारी  यांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर हे बदल करण्यात येणार आहेत.

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/  

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.