Reading Time: 3 minutes

बचत हा आपल्या आर्थिक नियोजनातील एक महत्त्वाचा घटक आहे. चांगल्या गुंतवणूक पर्यायांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आपल्याला बचत ही अधिक उपयुक्त ठरते. आपल्याकडे गुंतवणुकीचे अनेक चांगले पर्याय उपलब्ध आहेत.  त्यातीलच राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (National Savings Certificate) ही एक निश्चित उत्पन्न देणारी, सुरक्षित व ‘जोखीममुक्त’ योजना आहे. 

लोकांमध्ये बचत आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारच्या ‘पोस्ट ऑफिस बचत’ योजनेंतर्गत ही योजना चालवली जाते. या सुरक्षित व कमी जोखमीच्या योजनेबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा. 

राष्ट्रीय प्रमाणपत्र (NSC) म्हणजे नक्की काय ? 

 • राष्ट्रीय प्रमाणपत्र योजना ही स्वातंत्र्यानंतर सुरू करण्यात आली होती. सरकारने या योजनेद्वारे जनतेकडून पैसा उभा करून देशाच्या विकासासाठी वापरण्याचा निर्णय घेतला.
 • अधिकाधिक गुंतवणुकीला संपूर्ण देशाच्या प्रगतीकडे वळवण्याचा या योजनेमागील सरकारचा उद्देश आहे. 
 • नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) हा एक कर बचत गुंतवणूक पर्याय आहे जो लहान किंवा मध्यम बचतींना प्रोत्साहन देण्यासाठी उपयुक्त आहे. 
 • या योजनेला भारत सरकारचा पाठिंबा असल्याने, कमी जोखीम व सुरक्षित गुंतवणूक पर्याय मानला जातो. 
 • राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) ही एक कर-बचत गुंतवणूक आहे जी भारतीय रहिवासी कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये मिळवू शकते. 
 • ही योजना फक्त भारतीय नागरिकांना लागू आहे आणि अनिवासी भारतीय (NRI) आणि HUF साठी ही योजना लागू नाही. 
 • आयकर लाभ, कमीत कमी गुंतवणुकीची आवश्यकता आणि कमी जोखीम यामुळे राष्ट्रीय पेन्शन योजनेस लोक अधिक प्राधान्य  आहेत. 

 

Top 5 Investment Options – नियमित व सुरक्षित मासिक उत्पन्नासाठी ५ गुंतवणूक योजना  

 

राष्ट्रीय प्रमाणपत्र (NSC) योजनेची वैशिष्ट्ये – (Benefits of NSC) 

 • राष्ट्रiय प्रमाणपत्र योजना ही भारत सरकारची योजना असल्याने यामध्ये गुंतवणूक करणे अधिक जोखीममुक्त आहे.
 • राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे सर्व पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध आहेत व त्यामुळे हे सहज खरेदी करता येतात. यांच्या खरेदीवर कोणतीही मर्यादा नाही. एखादी व्यक्ती कितीही एनएससी खरेदी करू शकते. मात्र, गुंतवणूक करण्यासाठी किमान रक्कम रु.१००० भरावी लागते.
 • आयकर कायदा १९६१ च्या कलम ८० सी अंतर्गत, एनएससी मध्ये गुंतवलेल्या मुद्दलावर १.५ लाख पर्यंत करसवलत मिळते.
 • राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे १०० रुपये, ५०० रुपये, रु.१०००, रु.५००० आणि रु. १०,००० मूल्यांमध्ये जारी केली जातात. तसेच, अल्पवयीन व्यक्तीच्या नावावर देखील प्रमाणपत्रे खरेदी केले जाऊ शकतात.
 • तुम्ही सर्व प्रमुख बँका आणि वित्तीय संस्थांमध्ये कर्जासाठी NSC गहाण ठेवू शकता. यामध्ये गुंतवणूकदार स्वत: त्याच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला नॉमिनेट करू शकतात.
 • NSC एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये किंवा व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे सहजपणे हस्तांतरित केले जाऊ शकते.
 • NSC चा मॅच्युरिटी कालावधी ५ वर्षे आहे. मात्र, गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाल्यास या मुदतीपूर्वी त्याचा वारसदार गुंतवणूक काढू शकतो.

नाकी वाचा – नामांकानाचे महत्त्व !

NSC योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी अटी – (Terms & conditions)

 • सर्व भारतीय नागरिक या योजनेत गुंतवणूक करू शकतात. पहिल्या ४ वर्षांसाठी NSC मधून मिळालेले वार्षिक व्याज पुन्हा गुंतवले जाते. मात्र, ५ व्या वर्षीचे व्याज पुन्हा गुंतवले जाऊ शकत नाही.
 • प्रौढ व्यक्ती वैयक्तिकरित्या किंवा संयुक्तपणे, १० वर्षांपेक्षा जास्त वयाचे अल्पवयीन किंवा अल्पवयीनांच्या वतीने पालक या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतात.
 • कोणताही अनिवासी भारतीय (एनआरआय) नवीन एनएससी खरेदी करू शकत नाही. मात्र, एनआरआय होण्यापूर्वी त्यांच्याकडे एनएससी असल्यास ते परिपक्व होईपर्यंत ते कायम ठेवू शकतात.
 • ट्रस्ट आणि हिंदू अविभक्त कुटुंबे गुंतवणूक करू शकत नाहीत.
 • हिंदू अविभक्त कुटुंबप्रमुख फक्त स्वतःच्या नावाने एनएससीमध्ये गुंतवणूक करू शकतात.

 

नक्की वाचा  – गुंतवणूक का महत्त्वाची आहे आणि गुंतवणूक कोठे करावी

 

 

NSC योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे –

 • NSC अर्ज 
 • मूळ ओळख पुरावा (पासपोर्ट, परमनंट अकाउंट नंबर (पॅन), व्होटर आयडी, ड्रायव्हिंग लायसन्स)
 • मूळ पत्ता पुरावा (पासपोर्ट, युटिलिटी बिले, बँक स्टेटमेंट ई.)

NSC कसे खरेदी करावे – 

राष्ट्रीय प्रमाणपत्र तीन प्रकारे खरेदी करता येते.

 • एकट्याचे प्रमाणपत्र –

या अंतर्गत एखादी व्यक्ती स्वतःसाठी किंवा अल्पवयीन व्यक्तीच्या वतीने पालक म्हणून राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र खरेदी करू शकते.

 • संयुक्त धारक प्रमाणपत्र –

यामध्ये दोन गुंतवणूकदार मिळून राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे खरेदी करतात व मुदत संपल्यानंतर दोघांना समान रक्कम दिली जाते.

 • संयुक्त ‘बी’ प्रमाणपत्र –

हे प्रमाणपत्र देखील दोन लोकांनी मिळून विकत घेतले जाते. मात्र, यामध्ये मॅच्युरिटी रक्कम फक्त एकालाच दिली जाते.

 

हेही वाचा – New Financial year – नवीन आर्थिक वर्षात झालेले आहेत ‘हे’ बदल 

 

NSC योजनेतील कर सूट –

 • NSC मधील गुंतवणुकीवर आयकर कायदा, १९६१ च्या कलम ८० सी अंतर्गत १.५ लाख रुपयांपर्यंतची कर सूट मिळते.
 • गुंतवणुकीवरील व्याजावर चार वर्ष कर आकारला जात नाही.
 • मात्र पाचव्या वर्षी मिळालेल्या व्याजावर कर आकारला जातो.
 • NSC वर टी़डीएस कापला जात नाही.

NSC विरुद्ध इतर गुंतवणूक पर्याय – (NSC vs Other Investment options)

 • राष्ट्रीय प्रमाणपत्र योजना (NSC) ही आयकर कायदा १९६१ च्या ८० सी अंतर्गत कर कपात असलेल्या कर बचत योजनांपैकी एक आहे. 
 • इतर अनेक योजना देखील उपलब्ध आहेत. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), टॅक्स सेव्हर मुदत ठेव, ELSS फंड आणि राष्ट्रीय पेन्शन योजना या योजना आहेत.

 

खालील तक्त्यामध्ये NSC विरुद्ध इतर कर लाभ योजनांची तुलना दिली आहे.

टॅक्स सेव्हर गुंतवणूक पर्याय  लॉक-इन कालावधी जोखीम व्याज दर 
भविष्य निर्वाह निधी (PPF) १५ वर्षे  कमी ७.१०%
ELSS फंड्स 3 वर्षे बाजाराशी संबंधित जोखीम बाजारावर अवलंबून 
टॅक्स सेव्हर मुदत ठेव ५ वर्षे कमी ५% ते ७%
राष्ट्रीय पेन्शन योजना ६० वर्षे वयापर्यंत  बाजाराशी संबंधित जोखीम ८% ते १०% 

(बाजारावर अवलंबून )

राष्ट्रीय प्रमाणपत्र योजना (NSC) ५ वर्षे  कमी ६.८%

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…