परदेशातील उत्पन्नावरील दुहेरी कर आकारणी कशी टाळाल?

Reading Time: 2 minutes

एखाद्या देशातील रहिवासी व्यक्ती जर दुसऱ्या देशातून उत्पन्न  मिळवत असेल तर त्या व्यक्तीला मिळणाऱ्या उत्पन्नावर दोन्ही देशातून कर आकारणी होऊ शकते. साहजिकच या दुहेरी कर आकारणीमुळे करदात्यावर अन्याय होऊन त्याचं नुकसान होतं. यालाच परकीय कर क्रेडिट (Foreign Tax Credit) असे म्हणतात. परकीय कर क्रेडिट हे जागतिक उत्पनाशी निगडित आहे.

दोन्ही देशांच्या करप्रणालीनुसार दुहेरी कर भरायला लागून करदात्याचे नुकसान होऊ नये या कारणास्तव आयकर कायदा १९६१, कलम  ९० व कलम ९१ मध्ये परकीय कर क्रेडिटसाठी संदर्भात तरतूद करण्यात आली आहे.

 • कलम ९० मध्ये डबल टॅक्सेशन व्हॉइडन्स ग्रीमेंटची (DTAA) तरतूद करण्यात आली आहे. या तरतुदीनुसार ज्या देशासोबत भारताने डीटीएए केले आहे त्या देशातून मिळणाऱ्या उत्पन्नसाठी परकीय कर क्रेडिटचा दावा करता येतो.

 • तर कलम ९१ मध्ये डीटीएए केलेले नसलेल्या देशांमधून मिळणाऱ्या उत्पन्नासाठी परकीय कर क्रेडिटचा दावा करता येतो.

 • या कलमांमधील तरतुदींचा लाभ घेणारी व्यक्ती भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे. तसेच त्याने भारताबाहेर इतर देशात कर भरलेला असेल तर या भरलेल्या करासाठी ती व्यक्ती परकीय कर क्रेडिटचा दावा करू शकते.


नियम १२८:

परकीय कर क्रेडिटच्या दाव्यासंदर्भातील गोंधळ टाळण्यासाठी व नियम अधिक स्पष्ट होण्यासाठी १ एप्रिल २०१७ पासून नियम १२८ नुसार अधिसूचित करण्यात आलेल्या काही महत्वाच्या गोष्टी –

 • परकीय कर क्रेडिटचा दावा फक्त ज्या वर्षांसाठी कर आकारण्यात आला असेल अथवा निर्धारित करण्यात आला असेल त्याच वर्षांसाठी करता येईल.

 • परकीय कर क्रेडिटचा दावा  फक्त भारतातील कर कायद्यानुसार भरलेल्या  कर, सरचार्ज आणि सेस याकरिताच करण्यात येतो. व्याज (interest ), शुल्क (fee ), अथवा दंडाकरिता क्रेडिटचा (penalty) करिता  ही सुविधा उपलब्ध नाही.

 • विवादित परकीय करासाठी परकीय कर क्रेडिटचा दावा करता येत नाही.

 • कलम ११५ जेबी अंतर्गत भरलेल्या करासाठीही परकीय कर क्रेडिटचा दावा करता येतो.

 • परकीय कर क्रेडिटचा दावा करताना एखाद्या देशापासून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या प्रत्येक स्रोतासाठी स्वतंत्ररित्या दावा करावा लागेल

 • परकीय कर क्रेडिटची रक्कम ही भारतीय करा कायदयानुसार भरलेला कर व परदेशात भरलेला कर यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.


नियम १२८ अंतर्गत परकीय कर क्रेडिटचा दावा करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे

नियम १२८ अंतर्गत परकीय कर क्रेडिटचा दावा करण्यासाठी करदात्याने रिटर्न भरण्यापूर्वी  खालील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.

 • परकीय कर आकारणी स्टेटमेंट: करदात्याने भरण्यात आलेल्या अथवा कापून घेतलेल्या परकीय कराचे स्टेटमेंट फ़ॉर्ममध्ये नमूद करावे.

 • उत्पन्नाचे स्वरूप व भरलेल्या अथवा कापून घेतलेल्या कराचे सर्टिफिकेट अथवा स्टेटमेंट: हे सर्टिफिकेट अथवा स्टेटमेंट संबंधित देशातील कर अधिकारी (Tax Authority) अथवा   संबंधित कर कपात अधिकारी यांनी जारी केलेले असावे. तसेच त्यावर करदात्याची सही असणेही आवश्यक आहे.

 • कर भरल्याचा पुरावा:  करदात्याने कर भरल्याचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे.

 

फ़ॉर्म ६७

 • परकीय कर क्रेडीटचा दावा करताना फ़ॉर्म ६७ हा एक महत्वाचा दस्तावेज आहे. फ़ॉर्म ६७ हा रिटर्न भरण्याच्या तारखेच्या वेळी अथवा त्याअगोदर सादर करणे आवश्यक  आहे.

 

फ़ॉर्म ६७ कसा भरावा?

आयकर विभागाच्या वेबसाईट वर जाऊन इ-फायलिंग द्वारे हा फ़ॉर्म भरता येतो. यासाठी-

 • आयकर विभागाच्या वेबसाईटवॉर जाऊन लॉग इन करावे.

 • त्यानंतर इ फायलिंग हा पर्याय निवडून त्यामधील फ़ॉर्म ६७ चा पर्याय निवडावा.

 • हा फ़ॉर्म भारण्यासंबंधीच्या सर्व सूचना फ़ॉर्मवर लिहिलेल्या असतात. त्या व्यवस्थित वाचून संपूर्ण फ़ॉर्म योग्य पद्धतीने भरावा.

 • फ़ॉर्म भरून झाल्यावर डिजिटल सिग्नेचर(सही) अथवा इलेकट्रोनिक व्हेरिफिकेशन कोड (EVC) सबमिट करणे बंधनकारक आहे.

विविध आयकर नोटीस आणि  त्यांचे अर्थ,

आयकर खात्याचे हेल्पलाईन नंबर,

इन्कम टॅक्स रिटर्नच्या ई-व्हेरिफिकेशनच्या ५ सोप्या पद्धती,

ॲडव्हान्स टॅक्स- उपचारापेक्षा काळजी बरी

आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला info@arthasakshar.com वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर’ या नावाने सेव्ह करून  ह्या नंबरवर ‘Hi’ असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *