अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा असतात. परंतु अनेकदा दोन वेळची रोजीरोटी कमवून शिल्लक राहिलेली तुटपुंजी जमापुंजी घर घेण्यासाठी पुरेशी नसते. पण तरीही स्वतःचं घर हे स्वप्न माणसाला सतत साद घालत असतं.
प्रधानमंत्री आवास योजना (PMAY)
काही वेळा मात्र आपल्या स्वप्नपूर्तीचा मार्ग गवसतो आणि अचानकपणे घराचे स्वप्न साकार होते. केंद्र सरकारच्या “प्रधानमंत्री आवास योजना” या सर्वांसाठी हक्काचे घर हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आलेल्या योजनेने अनेकांचे स्वप्न साकार झाले आहे.
monycontrol.com च्या रिपोर्टनुसार, या योजनेचे उद्दिष्ट डेडलाईनच्या अगोदरच पूर्ण झालं असून या वर्षाच्या अखेरीस एक कोटी घरे मंजूर केली जातील आणि उर्वरित १२ लाख घरांचे उद्दिष्ट मार्च २०२० पर्यंत पूर्ण होईल.
क्रेडिट-लिंक्ड सबसिडी योजना (CLSS)
- १७ जून २०१५ रोजी जाहीर करण्यात आलेल्या ‘प्रधानमंत्री आवास योजना’ (PMAY) या योजनेत एकूण चार व्हर्टिकल आहेत. त्यातील सर्वात लोकप्रिय व्हर्टिकल म्हणजे “प्रधानमंत्री आवास योजना – क्रेडिट लिंक्ड सब्सिडी योजना (CLSS)”.
- या योजनेअंतर्गत गृहकर्ज व्याजाची रु. २,६७,२८० पर्यंत बचत होईल. तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे १८ लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असणारी व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते.
(अधिक माहितीसाठी वाचा – प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत वाचावा रु. २,६७,२८० रुपये)
- जर तुम्ही घर घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्हीही या योजनेचा लाभ घेऊ शकता. परंतु, फक्त ३१ मार्च २०२० पर्यंतच!
- सुरुवातीला ३१ मार्च २०१९ पर्यंत निश्चित करण्यात आलेल्या सीएलएसएस योजनेची मुदत नंतर ३१ मार्च २०२० पर्यंत वाढविण्यात आली आहे. आता ही अनुदान योजना संपण्यासाठी अवघ्या १८० दिवसांची मुदत शिल्लक आहे. त्यामुळे तुमचे घराचे स्वप्न साकार करण्यासाठी या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास ३१ मार्च २०२० पूर्वी घर खरेदीचा निर्णय घ्या.
घर पहावे बांधून, का भाड्याने घेऊन? – पहिली बाजू
नियम, अटी व पात्रता:
- लाभार्थी कुटुंबाचे स्वतःचे किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावाने घर नसावे.
- विवाहित जोडप्याच्या बाबतीत लाभार्थी व त्याचा जोडीदार किंवा दोघेही एकत्रित मालकी हक्कामध्ये एकाच अनुदानास पात्र ठरतील.
- लाभार्थी कुटुंबाने भारत सरकारच्या कोणत्याही गृहनिर्माण योजनेंतर्गत केंद्रीय सहाय्य किंवा पीएमएवाय मधील कोणत्याही योजनेअंतर्गत कोणताही लाभ घेतलेला नसावा.
लाभार्थी कोण होऊ शकतं?
- लाभार्थी कुटुंबात पती, पत्नी आणि अविवाहित मुले यांचा समावेश होतो.
- जर कुटुंबामध्ये सज्ञान कमावती व्यक्ती असेल, तर त्या व्यक्तीस स्वतंत्र लाभार्थी मानले जाईल. यामध्ये सदर व्यक्तीची वैवाहिक स्थिती कोणतीही असली, तरी त्याला स्वतंत्र लाभार्थी म्हणून या योजनेचा लाभ घेता येईल.
प्रधानमंत्री आवास योजना – क्रेडिट लिंक्ड सब्सिडी योजना (CLSS)
वैशिष्ट्ये व पात्रता | कमी उत्पन्न गट (LIG) | आर्थिकदृष्ट्या मागास गट (EWS) | CLSS – MIG 1 | CLSS – MIG 2 |
वार्षिक उत्पन्न | ३,००,००१ ते ६,००,००० | ३,००,००० पर्यंत | ६,००,००१ ते १२,००,००० | १२,००,००१ ते १८,००,००० |
निवासी क्षेत्र व कार्पेट क्षेत्र | ६० स्के.मी. | ३० स्के.मी. | १६० स्के.मी. | २०० स्के.मी. |
व्याजवरील सबसिडी | ६.५०% | ६.५०% | ४% | ३ % |
सबसिडीसठी कर्जमर्यादा | ६ लाख | ६ लाख | ९ लाख | १२ लाख |
कर्जाचा कालावधी | २० वर्षे वा कर्जाचा कालावधी यापैकी जे आधी असेल | २० वर्षे वा कर्जाचा कालावधी यापैकी जे आधी असेल | २० वर्षे वा कर्जाचा कालावधी यापैकी जे आधी असेल | २० वर्षे वा कर्जाचा कालावधी यापैकी जे आधी असेल |
किमान सबसिडी मर्यादा | २,६७,२८० | २,६७,२८० | २.३५ लाख | २.३० लाख |
जर, तुम्ही प्रथम गृह खरेदीदार असाल, तर सदर अनुदानाचा वापर केल्यास तुमचा ईएमआय कमी ठेवण्यास आणि एकूण व्याजाचा भार कमी करण्यास मदत होईल. योग्य निवासी प्रकल्प निवडून आर्थिक वर्षाच्या समाप्तीपूर्वी बँकेकडे या योजनेसाठी अर्ज करा आणि तुमच्या घराच्या स्वप्नपूर्तीचा प्रवास सुरु करा.
राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेतील (NPS) नवे बदल
अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा-
https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en
Disclaimer: आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/