Reading Time: 3 minutes

मान्सूनचे आगमन ही प्रचंड उकाड्यामुळे हैराण झालेल्या देशाच्या बहुतांश भागाला सुखावणारी बाब असली, तरी अतिपावसामुळे पूर आल्यास त्यामुळे प्रचंड हाहाक्कार उडतो. पुरामुळे घर आणि मालमत्तेचे अपरिमित नुकसान होते

  • केरळमध्ये नुकत्याच आलेल्या महाप्रलयामुळे झालेले अतिप्रचंड नुकसानचेन्नईमध्ये गेल्या वर्षी निर्माण झालेली गंभीर पूरपरिस्थिती आणि देशाच्या काही भागात सातत्याने येणाऱ्या पुरावरून आपल्याला याचे गांभीर्य कळून येईल
  • या सर्व प्रकारात शेकडो नागरिकांचा बळी गेला आणि काही लाख घरे उद्धवस्त झाली असंख्य वाहनांचे नुकसान झाले
  • अशा नैसर्गिक आपत्तीनंतर ज्यांनी विमा संरक्षण घेतलेले आहे, अशा व्यक्ति आणि ज्यांनी विमा संरक्षण घेतलेले नाही अशा व्यक्तींचे होणारे नुकसान यात प्रचंड तफावत दिसून येते
  • विम्यासारख्या अत्यावश्यक आर्थिक संसाधनाबाबत फारशी जागरूकता नसल्यानेच आपल्याकडे विमा उतरवण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.
  • चेन्नईमध्ये डिसेंबर २०१५मध्ये आलेल्या पुरामध्ये अतिप्रचंड नुकसान झाले होते. यातून झालेले नुकसान हे विमा संरक्षणापेक्षाही अधिक होते. त्यातही विमा संरक्षणामध्ये घरांच्या विम्याचे प्रमाण अगदीच नगण्य होते.
  •  यातूनच चेन्नई लगतच्या परिसरात घरांच्या विम्याबाबतची जागरूकता आणि हा विमा उतरवण्याचे प्रमाण किती कमी आहे, हे स्पष्ट होते. चेन्नईप्रमाणेच देशाच्या अन्य भागातही अशीच परिस्थिती आहे
  • देशाच्या कुठल्याही भागात नैसर्गिक आपत्ती आल्यास हेच चित्र दिसून येते. भारतात सर्वसाधारण विमा उतरवण्याचे प्रमाण . टक्के इतके अत्यल्प असताना, घरांचा विमा उतरवण्याचे प्रमाण आणखी कमी असणार, यात काही आश्चर्य वाटण्याजोगे नाही.
  • मालमत्तेला धोका पोहोचल्यास, त्यातून होणारे नुकसान हे अतिशय मोठे असतानाही आपण मालमत्तेचा विमा उतरवावा ही बाब वाहनांच्या विम्यामध्ये चांगली गुंतवणूक करणाऱ्या नागरिकांच्याही लक्षात येत नाही, ही बाब खरोखरच आश्चर्यजनक
  • आपल्या स्वप्नातले घर साकारण्यासाठी त्याचा मासिक हप्ता भरण्यातच बहुतांश भारतीयांच्या जीवनाचा मोठा काळ निघून जातो. तरीही त्यापैकी बहुतांश नागरिकांना आपल्या घराचा विमा उतरवावा, त्याच्या संरक्षणासाठी तरतूद करावी, असे वाटत नाही. पुरासारख्या संकटावेळी घराच्या सर्वसमावेशक (कॉम्प्रहेन्सिव्ह) विम्याद्वारे घरात पाणी शिरून घराच्या मालमत्तेच्या होणाऱ्या नुकसानाची भरपाई मिळू शकते

पूर अन्य नैसर्गिक आपत्तींपासून संरक्षण 

  • गेल्या काही वर्षात भारतात नैसर्गिक आपत्तींच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. त्यामुळेच घराचा विमा उतरवणे हे या नैसर्गिक आपत्तींमुळे होणारे संभाव्य नुकसान टाळण्याच्या दृष्टीने टाकलेले एक पाऊल आहे
  • त्यामुळे नैसर्गिक आपत्तीसारख्या कठीण काळातदेखील आपल्याला आर्थिक पाठबळ मिळून घर पुन्हा उभारता येईल, ही बाब आपल्याला नवी उभारी देऊन जाते.

चीजवस्तू,मौल्यवान वस्तू साधनांचे संरक्षण 

  • भारतीय अर्थव्यवस्था वेगाने विकसित होत असल्याने भारतीय नागरिकांची क्रयशक्ती वाढल्याचा परिणाम संपत्ती निर्मितीत वाढ होण्यातून दिसून येतो. त्यामुळेच महागड्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठीही मागणी वाढल्याचे दिसून येते
  • अनेकदा तर घरातील महागड्या वस्तूंमुळे या वस्तूंची किंमत घराच्या किमतीहून अधिक झाल्याचेही आमच्या पाहणीतून दिसून आले आहे. घरात इलेक्ट्रिकच्या वस्तू, घरगुती उपकरणे, मोबाइल, कम्प्यु्टर, टिव्ही सारखी उपकरणे, कलात्मक वस्तू, दागदागिने आदींचे नुकसान झाल्यास त्याचा मोठा फटका बसतो
  • त्याचबरोबर नैसर्गिक आपत्तीमुळे घराचा रंग, इलेक्ट्रिकल वायरिंगचेही मोठे नुकसान होते. त्यामुळे अशा संकटानंतर कदाचित पुन्हा शून्यातून तुम्हाला घर उभे करावे लागते. अशावेळी घराचा विमा तुमच्या मदतीला धावून येतो. घराच्या विम्यामध्ये घराच्या नुकसानाबरोबरच घरातील चीजवस्तू अन्य घटकांच्या नुकसानाच्या भरपाईचाही समावेश असतो
  • नैसर्गिक आपत्ती आणि अपघात अशा दोन्ही घटनांमुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई तुम्हाला या विम्याद्वारे मिळू शकते. नोकरीच्या शोधात गावाकडून शहराकडे होणारे स्थलांतर वाढल्याने भाड्याने घर घेऊन राहण्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे
  • घराचा विमा फक्त बड्या जमीनदारांसाठी, घरमालकांसाठीच नसून भाड्याच्या घरात राहणारे नागरिक देखील हा विमा उतरवून घरातील चीजवस्तू संभाव्य नुकसानापासून सुरक्षित करू शकतात.  

ॲड ऑन कव्हर 

  • घराच्या विम्यासोबत काही अतिरिक्त बाबींसाठीही संरक्षण कवच घेता येते. यामध्ये घराचे भाडे न मिळाल्याने होणारे नुकसान, तात्पुरत्या स्थलांतरासाठी येणारा खर्च, अन्य कोणाचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई, कुत्रा किंवा पाळीव प्राण्यांसंबंधित नुकसान, एटीएम कार्ड, पाकीट, किल्ली हरवल्यास तसेच कुलुप किंवा लॅच बदलावे लागल्यास होणारे नुकसान भरून काढण्यासाठी आदी बाबींचा समावेश असतो
  • घराची सुरक्षितता आणि मालमत्तेच्या संरक्षणासाठी नागरिक करत असलेल्या विविध उपाययोजनांपेक्षा घराच्या विम्याचा खर्च अधिक आहे, हा एक निव्वळ गैरसमज आहे. एक वर्षासाठी किंवा दीर्घकालीन विमा उतरवल्यास यासाठीचा हप्ता हा दिवसाला पाच रूपये  इतका कमी असू शकतो. काही विशिष्ट नियम व अटी पाळून फ्लॅट्स व अपार्टमेंटचाही विमा उतरवता येतो. 

आपल्या आयुष्यात घरासारख्या काही मोजक्या गोष्टींना प्रचंड महत्त्व असते. याच घराचा विमा उतरवल्यास घर आणि त्यातील चीजवस्तूंचे संरक्षण करता येते

त्यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे ओढावलेल्या संकटामुळे घराची पुनर्उभारणी करताना आपल्या आयुष्यभराच्या बचत गुंतवणुकीवर कोणताही ताण येत नाही. त्यामुळे पैशाचा योग्य वापर करा. संकटानंतर तुम्ही पूर्वी उभारलेल्या गोष्टीच्या पुनर्बांधणीसाठी पैसा खर्च करू नका. त्याची काळजी तुमची विमा कंपनी घेईल.

ससिकुमार आदिदामू

चीफ टेक्निकल ऑफिसर,

बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स

जीवन विमा आणि आरोग्य विम्यामधील मूलभूत फरक

जीवन विमा पॉलिसीचे प्रकार आणि करबचत

सर्वसाधारण विमायोजना विविध प्रकार

कोणता आयुर्विमा घ्यावा? सोचना क्या,जो भी होगा देखा जायेगा !!!

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Share this article on :
You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.