हीच ती वेळ, म्युच्युअल फंड गुंतवणुकीची

Reading Time: 2 minutes

निवडणुकांची रणधुमाळी संपली. सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या परीने मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी त्यांचे जाहीरनामे आणि वाचननामे सादर केले. हीच ती वेळ , महाजनादेश आणि परिवर्तन ह्या संज्ञा गेल्या महिनाभरात वारंवार ऐकू येत होत्या. सत्तेवर येणारे राजकीय पक्ष आपल्याला चांगल्या सोयी सुविधा देण्यासाठी प्रयत्न करतील, मात्र आपल्या मेहनतीच्या बचतीच्या योग्य गुंतवणुकीसाठी आपल्याला योग्य गुंतवणूक पर्याय स्वतःच निवडावे लागतील. निवडणुकीत वापरल्या गेलेल्या ह्या संज्ञांचा आपण आपल्या गुंतवणुकीशी मेळ साधू

गुंतवणुकीच्या खेळातले सात नियम

हीच ती वेळ

 • सर्व सामान्य मराठी गुंतवणूकदार नेहमीच अतिशय कमी जोखीम घेणारे असतात. पारंपरिक बँकेचे एफडी, पोस्टाच्या योजना किंवा सोने यामध्येच गुंतवणूक करतात. हे पर्याय जरी खूप आश्वस्त वाटत असले तरी या पर्यायातून मिळणार परतावा हा महागाई वर मात करत नाही आणि त्यामुळे दीर्घावधी मध्ये आपल्याला चक्रवाढ वाढीचा फायदा होत नाही
 • त्याचबरोबर येणाऱ्या वर्षात आपला भारत देश जगातील तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता होईल. पुढील काही वर्षात व्याज दर हे आणखी खाली खाली जातील
 • अशावेळी आपली काही गुंतवणूक ही म्युच्युअल फंडाकडे वळती केली पाहिजे. म्युच्युअल फंड आपल्याला तब्बल ३६ प्रकारच्या योजना देतात
 • आपल्या आर्थिक गरजांप्रमाणे आणि आपली जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार आपण योग्य म्युच्युअल फंडाची निवड केली पाहिजे. तज्ञ आर्थिक सल्लागार आपल्याला या कामी मदत करतात. म्हणूनच हीच ती वेळ की आपण पारंपरिक पर्यायांबरोबर म्युच्युअल फंडमध्येसुद्धा गुंतवणूक केली पाहिजे.

म्युच्युअल फंड गुंतवणुकीतील चुका कशा टाळाव्यात?

महाजनादेश: 

 • म्युच्युअल फंडाची गंगाजळी २०११ साली रु. लाख करोड होती , २०१५ साली ती वाढून साधारण रु. ११ लाख करोड इतकी झाली आणि आता सप्टेंबर २०१९ साली रु. २५ लाख करोड पार झाली.
 • गुंतवणूकदारांची संख्या पाहिल्यास २०१५ पासून आता पर्यंत साधारण पटीने गुंतवणूकदार वाढले. सध्या म्युच्युअल फंडाचे साधारण . करोड इतके गुंतवणूकदार आहेत
 • गेल्या वर्षात म्युच्युअल फंडाच्या गुंतवणूक मार्गदर्शक मोहिमेमुळे म्युच्युअल फंडाला खूप चांगला महाजनादेश मिळाला. काही संशोधन संस्थांचा अभ्यास असा आहे की २०२५ सालापर्यंत म्युच्युअल फंड क्षेत्राची मालमत्ता रु. १०० लाख करोडचा आकडा पार करेल १० करोड पेक्षा जास्त गुंतवणूकदार जोडले जातील
 • म्युच्युअल फंडाला मिळणाऱ्या महाजनादेशातून जोडल्या गेलेल्या गुंतवणूकदारांना दीर्घावधीमध्ये वेल्थ क्रिएशन साठी नक्कीच मदत होईल. आपण हि मागे राहता म्युच्युअल फंड योजनेचे गुंतवणूकदार व्हा

गुंतवणुकीसंदर्भात काही प्रश्न (FAQ) व त्याची उत्तरे

परिवर्तन 

 • आपण आपल्या पारंपरिक गुंतवणूक पर्यायांच्या विचारातून बाहेर पडून आपल्यात परिवर्तन आणले पाहिजे
 • म्युच्युअल फंड म्हणजे शेयर बाजार आणि शेयर बाजार म्हणजे जुगार ही विचारसरणी सोडून दिली पाहिजे. म्युच्युअल फंड म्हणजे आपल्या देशातील उत्तम कामगिरी करणाऱ्या कंपन्यांमध्ये कर्जरोखे किंवा समभाग गुंतवणूक
 • म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीतून आपण उत्तम कामगिरी करणाऱ्या कंपन्यांचे आपण आपल्या गुंतवणुकीतून भागीदार होऊ शकतो. आपल्या पुराणमतवादी विचारसरणीतील परिवर्तन आपल्याला आर्थिक प्रगतीची योग्य दिशा देईल.

इक्विटी मार्केट पडझड – हा काळही सरेल

चला तर आपले अमूल्य मत महागाई वर मात करणाऱ्या गुंतवणूक पर्यायाला देऊ. आपल्या आर्थिक उन्नतीसाठी आपण म्युच्युअल फंडाचा चांगला पर्याय निवडूया.  

म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठी हार्दिक शुभेच्छा!! 

धन्यवाद!

– निलेश तावडे

९३२४५४३८३२ 

nilesh0630@gmail.com 

(लेखक हे म्युच्युअल फंड क्षेत्रात २० वर्ष कार्यरत होते सध्या ते आर्थिक सल्लागार आहेत.)

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/  

Click to rate this post!
[Total: 1 Average: 4]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

माफ करा, आपण हे कॉपी करू शकत नाही.