Reading Time: 2 minutes
आयटीआर व्हेरिफिकेशन
सर्व करदात्यांना कर आपले आयकर विवरणपत्र म्हणजेच आयटीआर (ITR) विहित नमुन्यात ऑनलाईन भरून देणे आणि त्यानंतर आयटीआर व्हेरिफिकेशन (ITR verification) करणे आयकर कायद्यानुसार आवश्यक आहे.
आयटीआर व देयकर लवकरात लवकर भरणे अधिक फायद्याचे !
आयटीआर व्हेरिफिकेशन (ITR verification):
- अनेकदा मुळातून करकपात झाल्याने कापलेला अधिक कर परत मिळवण्यासाठी विवरणपत्र भरणे जरुरीचे असते.
- या ऑनलाईन प्रक्रियेतून फक्त अतिजेष्ठ नागरिकांना वगळले असून ते आपले विवरणपत्र कागदी स्वरूपात फॉर्म भरून देऊ शकतात.
- आयकर विवरणपत्र भरून झाले की यात दिलेल्या तपशिलाप्रमाणे आपले उत्पन्न असल्याचे मान्य असल्याचे सहमती पत्र फॉर्म 5 या प्रकारात द्यावे लागते.
- ते मान्य करून आपल्याकडे असलेली त्याची स्थळप्रत म्हणजे विवरणपत्र भरले आहे याचा पुरावा असतो.
- विवरणपत्र भरण्याची पूर्ण प्रक्रिया आयकर विभागाच्या बँगलोर येथे असलेल्या सेन्ट्रल प्रोसेसिंग युनिटच्या पोर्टलवर होते.
- आपले आयकर विवरणपत्र अपलोड केले की यातील तपशील सत्य असल्याचे पावतीच्या स्वरूपातील सहमतीपत्र आपोआप तयार होते.
- ते बरोबर आहे याची संमती (ITR verification) आपण ऑफलाईन अथवा ऑनलाईन पद्धतीने विवरणपत्र भरल्यापासून 120 दिवसात कधीही देऊ शकतो.
- ऑफलाईन पद्धतीने फार्म 5 चा प्रिंटआउट घेऊन त्यावर सही करून तो फॉर्म बँगलोर येथे साध्या पोस्टाने, रजिस्टरने अथवा स्पीड पोस्टने पाठवावा.
- तो मिळाल्याचा संदेश कारदात्याच्या मोबाईल आला की ही प्रक्रिया पूर्ण होईल.
- ऑनलाईन पद्धतीने आधार ओ टी पी, बँक खाते, डेबिट कार्ड, डी मॅट खाते या द्वारे आपली ओळख पटवून अथवा डिजिटल स्वाक्षरीने अशी संमती देता येईल व त्याची पोहोच आपल्याला लगेच मिळेल.
- विवरणपत्र अपलोड केल्यापासून 120 दिवसांच्या कालावधीत अशी संमती न दिल्यास आपण विवरणपत्र दिलेच नाही अथवा विवरणपत्र अस्तित्वात नाही असे समजले जाते. यामुळे करदात्याचे दोन तोटे होतात-
- त्याचा जास्त कापलेला कर परत मिळत नाही.
- मर्यादेहून अधिक उत्पन्न असताना विवरणपत्र न भरल्याने समजून त्याच्यावर आयकर विभागाकडून कायदेशीर कारवाई होऊन दंड, शिक्षा होऊ शकते.
इन्कम टॅक्स रिटर्नच्या ई-व्हेरिफिकेशनच्या ५ सोप्या पद्धती
- मागील अनेक वर्ष कित्येक करदात्यांनी विवरणपत्र भरले परंतू सहमती (न दिल्याने तांत्रिक दृष्टीने त्यावर कोणतीही प्रक्रिया होऊ शकत नाही.
- असे विवरणपत्र नव्याने पुन्हा भरण्याची मुदत संपून गेल्याने करदाते ते पुन्हा भरू शकत नाहीत.
- अनेक करदात्यांनी फॉर्म 5 वर सही न करता पाठवला असल्याने त्याची विनंती मान्य होणार नाही.
- यावर उपाय म्हणून केंद्रीय प्रत्यक्ष करनियंत्रण मंडळाने (CBDT), त्यांच्या 13 जुलै 2020 रोजी काढलेल्या 13/2020 या परिपत्रकाद्वारे मागील पाच वर्षांची म्हणजेच मूल्यांकन वर्ष सन 2015-2016 ते सन 2019-2020 ची सहमतीपत्रे देण्याची मुदत 30 सप्टेंबर 2020 पर्यंत वाढवली असून, आता करदाते त्यांना सोईच्या पद्धतीने वरील दोन्हीपैकी कोणत्याही पद्धतीने आपली मागील विवरणपत्रे योग्य असल्याची सहमती देऊ शकतात.
- करदात्यांना सहमती देण्याची ही अंतिम संधी असून ही सर्वं प्रकरणे 31 डिसेंबर 2020 पर्यंत निकाली काढली जातील.
- तेव्हा तांत्रिक दृष्टीने आपले मागील विवरणपत्र भरण्याचे राहून गेले असल्यास ते तपासून त्यास करदात्यांनी संमती द्यावी आणि या सवलतीचा फायदा करून घ्यावा. त्याचप्रमाणे भविष्यातील कायदेशीर कारवाईपासून दूर राहावे.
– उदय पिंगळे
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies
Web Search: ITR verification Marathi Mahiti, ITR verification in Marathi
Share this article on :