ITR verification : मागील 5 वर्षांचे ‘आयटीआर व्हेरिफिकेशन’ करण्याची संधी

Reading Time: 2 minutes

आयटीआर व्हेरिफिकेशन

सर्व करदात्यांना कर आपले आयकर विवरणपत्र म्हणजेच आयटीआर (ITR) विहित नमुन्यात ऑनलाईन भरून देणे आणि त्यानंतर आयटीआर व्हेरिफिकेशन (ITR verification) करणे आयकर कायद्यानुसार आवश्यक आहे.

आयटीआर व देयकर लवकरात लवकर भरणे अधिक फायद्याचे !

आयटीआर व्हेरिफिकेशन (ITR verification): 

 • अनेकदा मुळातून करकपात झाल्याने कापलेला अधिक कर परत मिळवण्यासाठी विवरणपत्र भरणे जरुरीचे असते. 
 • या ऑनलाईन प्रक्रियेतून फक्त अतिजेष्ठ नागरिकांना वगळले असून ते आपले विवरणपत्र कागदी स्वरूपात फॉर्म भरून देऊ शकतात. 
 • आयकर विवरणपत्र भरून झाले की यात दिलेल्या तपशिलाप्रमाणे आपले उत्पन्न असल्याचे मान्य असल्याचे सहमती पत्र फॉर्म 5 या प्रकारात द्यावे लागते. 
 • ते मान्य करून आपल्याकडे असलेली त्याची स्थळप्रत म्हणजे विवरणपत्र भरले आहे याचा पुरावा असतो.  
 • विवरणपत्र भरण्याची पूर्ण प्रक्रिया आयकर विभागाच्या बँगलोर येथे असलेल्या सेन्ट्रल प्रोसेसिंग युनिटच्या पोर्टलवर होते. 
 • आपले आयकर विवरणपत्र अपलोड केले की यातील तपशील सत्य असल्याचे पावतीच्या स्वरूपातील सहमतीपत्र आपोआप तयार होते. 
 • ते बरोबर आहे याची संमती (ITR verification) आपण ऑफलाईन अथवा ऑनलाईन पद्धतीने विवरणपत्र भरल्यापासून 120 दिवसात कधीही देऊ शकतो. 
 • ऑफलाईन पद्धतीने फार्म 5 चा प्रिंटआउट घेऊन त्यावर सही करून तो फॉर्म बँगलोर येथे साध्या पोस्टाने, रजिस्टरने अथवा स्पीड पोस्टने पाठवावा. 
 • तो मिळाल्याचा संदेश कारदात्याच्या मोबाईल आला की ही प्रक्रिया पूर्ण होईल. 
 • ऑनलाईन पद्धतीने आधार ओ टी पी, बँक खाते, डेबिट कार्ड, डी मॅट खाते या द्वारे आपली ओळख पटवून अथवा डिजिटल स्वाक्षरीने अशी संमती देता येईल व त्याची पोहोच आपल्याला लगेच मिळेल. 
 • विवरणपत्र अपलोड केल्यापासून 120 दिवसांच्या कालावधीत अशी संमती न दिल्यास आपण विवरणपत्र दिलेच नाही अथवा विवरणपत्र अस्तित्वात नाही असे समजले जाते. यामुळे करदात्याचे दोन तोटे होतात-
  • त्याचा जास्त कापलेला कर परत मिळत नाही.
  • मर्यादेहून अधिक उत्पन्न असताना विवरणपत्र न भरल्याने समजून त्याच्यावर आयकर विभागाकडून कायदेशीर कारवाई होऊन दंड, शिक्षा होऊ शकते.

इन्कम टॅक्स रिटर्नच्या ई-व्हेरिफिकेशनच्या ५ सोप्या पद्धती

 • मागील अनेक वर्ष कित्येक करदात्यांनी विवरणपत्र भरले परंतू सहमती (न दिल्याने तांत्रिक दृष्टीने त्यावर कोणतीही प्रक्रिया होऊ शकत नाही. 
 • असे विवरणपत्र नव्याने पुन्हा भरण्याची मुदत संपून गेल्याने करदाते ते पुन्हा भरू शकत नाहीत. 
 • अनेक करदात्यांनी फॉर्म 5 वर सही न करता पाठवला असल्याने त्याची विनंती मान्य होणार नाही. 
 • यावर उपाय म्हणून केंद्रीय प्रत्यक्ष करनियंत्रण मंडळाने (CBDT), त्यांच्या 13 जुलै 2020 रोजी काढलेल्या 13/2020 या परिपत्रकाद्वारे मागील पाच वर्षांची म्हणजेच मूल्यांकन वर्ष सन 2015-2016  ते सन 2019-2020 ची सहमतीपत्रे देण्याची मुदत 30 सप्टेंबर 2020 पर्यंत वाढवली असून, आता करदाते त्यांना सोईच्या पद्धतीने वरील दोन्हीपैकी कोणत्याही पद्धतीने आपली मागील विवरणपत्रे योग्य असल्याची सहमती देऊ शकतात. 
 • करदात्यांना सहमती देण्याची ही अंतिम संधी असून ही सर्वं प्रकरणे 31 डिसेंबर 2020 पर्यंत निकाली काढली जातील. 
 • तेव्हा तांत्रिक दृष्टीने आपले मागील विवरणपत्र भरण्याचे राहून गेले असल्यास ते तपासून त्यास करदात्यांनी संमती द्यावी आणि या सवलतीचा फायदा करून घ्यावा. त्याचप्रमाणे भविष्यातील कायदेशीर कारवाईपासून दूर राहावे.

आयकर: नवीन फॉर्म २६ / ए एस

उदय पिंगळे

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web Search: ITR verification  Marathi Mahiti, ITR verification  in Marathi

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

माफ करा, आपण हे कॉपी करू शकत नाही.