Reading Time: 2 minutes

शेअर बाजार – मंदीची कक्षा भेदून बाजाराचीही चांद्रयान मोहिम? या लेखानंतर ही उसळी टिकणार का? हा प्रश्न ‘ट्रेंडिंग’ होता.

आता जर मला ह्या प्रश्नाचे नक्की उत्तर माहित असते, तर मी कीबोर्डवर बडवून बोटे झीजवण्यापेक्षा नोटा मोजून ती झीजवणे पसंत नसते का केले?? तरीपण आपल्याला लोक विचारतायत म्हटल्यावर उत्तर ठोकायलाच हवे, ही नशा पण काही कमी नाही.

अर्थमंत्र्यांचा निर्णय: शेअर बाजाराने गाठला उच्चांक, सर्वसामान्यांचाही फायदा

 • करांच्या रचनेत बदल ही माझ्या मते बाजारावर तात्कालिक नव्हे, तर दीर्घकालीन परिणाम करणारी बाब आहे. 
 • हे मला सर्वप्रथम अनुभवास आले जेव्हा श्री चिदंबरम साहेबांनी जुलै १९९६ च्या बजेटमध्ये  MAT ची (१२%) तरतूद लागू केली. 
 • बाजारांतून ‘धडाSSSSम धुSSSम्म’ असे आवाज यायला लागले. मला आठवतंय, दुस-या दिवशीची ‘इकॉनॉमिक टाईम्स’ची हेडलाईन होती- ‘FM brought the markets on MAT’
 • माझे चार्टिग सॉफट्वेअर सांगते की- 
  • बजेटच्या दुस-याच दिवशी निफ्टी ११२५.६७ वरुन (होय, हा आकडा बरोबर आहे) तीन टक्क्यांनी कोसळला आणि मग ही घसरण पुढे चालू राहिली.
  • ८०२.२३ चा तळ (२८.७३% ची घट) गाठून पुन्हा ११२७.२५ ही पातळी गाठायला ०६ मार्च १९९७ म्हणजेच १५९ सत्रे लागली.
  • श्री चिदंबरम साहेबांचेच पुढचे, १९९७ सालचे बजेट हे ‘Dream Budget’ म्हणून गाजले. या बजेटमध्ये कंपनी आयकराचा दर ४० टक्क्यांवरुन ३५%, म्हणजे ५% नव्हे तर १२% (पुन्हा तेच आधीचे.. विनय पाठकचे त्रेराशिक) कमी केला आणि बाजार पुढच्या चार सत्रांतच १३.४% वधारला. हा तेजीचा ट्रेंडही नंतर टिकून राहिला.
  • आता यावरुन कोणी काय बोध घ्यायचा, ते आपले आपण ठरवा. 

शेअर बाजार जोखीम:  काही गैरसमज

 • जाता जाता, कोणत्याही विषयात आपल्याला येणारी राजकारणाची उबळ आवरता न येणा-या, अंबानी/अदानींना फायदा झाल्याची ओरड  करणा-या वर्गाकरिता.. त्यांनी लक्षात घ्यायला हवे की…
  • Reliance Ind. आणि अनेक कंपन्या पूर्वीच्या राजवटीत वर लिहिलेली MAT ची तरतूद अंमलात येईपर्यंत प्रचंड फायदे मिळवूनही एक पैसाही कर भरीत नसत/नगण्य कर भरीत. 
  • अगदी आजही ते MAT मुळे कमी दराने कर भरतात. सबब या करकपातीचा फायदा अशा कंपन्यांना झालेला नाही.

महत्वाची सुचना-  ही पोस्ट केवळ माहिती म्हणूनच दिली आहे, कोणत्याही खरेदी किंवा विक्रीची शिफारस म्हणून नाही.  

– प्रसाद भागवत  

  9850503503

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer: आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:  https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Share this article on :
You May Also Like

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

TDS: टीडीएस म्हणजे नक्की काय?

Reading Time: 2 minutes अनेक खर्च एखाद्या देशाच्या सरकारला देशासाठी करायचे असतात. त्यासाठी सरकारच्या तिजोरीत काही पैसे प्रत्यक्ष जमा व्हावे लागतात. त्यासाठी सरकार नागरिकांकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर (Direct-Indirect Taxes) गोळा करत असते. सरकारसाठी/ सरकारच्या अर्थ खात्यासाठी हे कर गोळा करण्याचे काम आयकर खाते (Income Tax Department) करते. टीडीएस (TDS) ही आयकर खात्याने यासाठीच सुरू केलेली एक प्रणाली आहे. हिच्यामुळे सरकारच्या तिजोरीत वेळच्या वेळी कर जमा होतो.  या प्रणालीमुळे प्रत्यक्ष कर गोळा करणे सरकारला सोपे जाते.

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…