शेअर बाजार सर्वोच्च पातळीच्या जवळ, पुढे काय?

Reading Time: 2 minutes

बरेच लोक बाजाराच्या चढाव आणि उतारावर लक्ष ठेवून असतात आणि त्यात प्रवेश करून त्यातून पैसे कमवावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. इथून पुढे माझ्या लेखात मी बाजाराची आगामी वाटचाल कशी असेल? यावर थोडाफार प्रकाश टाकणारा आहे.

 • बऱ्याच जणांचा असा गैरसमज असतो की, बाजार म्हणजे जुगार, त्याचा अंदाज बांधू शकत नाही. पण वाचकहो, माझं या विषयीच मत हे पूर्णतः वेगळे आहे आणि हे मत १२ वर्षाच्या अनुभवांवरून बनविले आहे.
 • आपण इथे आढावा घेण्यासाठी जी पद्धत वापरणार आहोत, त्याला Technical analysis किंवा तांत्रिक विश्लेषण असे म्हणतात. यामध्ये दररोज वर खाली होणाऱ्या किंमतीवरून चार्ट तयार होतात आणि गणितीय सूत्रे वापरून पुढील आराखडे बांधले जातात.
 • किमती किंवा बाजार वर खाली होताना ठराविक टप्पे पार करतच  हालचाली होतात. आजच्या लेखात आपण त्या सर्व गोष्टींचा आढावा घेणार आहोत.
 • आजच्या लेखामध्ये आपण मार्केटच्या दिशेचा आढावा घेणार आहोत. त्या अगोदर एक गोष्ट आपल्याला समजून घेणे आवश्यक आहे. ती म्हणजे, बाजाराचे ४ विभाग आहेत. चलन (Currency), वस्तु बाजार(Commodity) रोखे बाजार (Debt/bond market), शेअर बाजार.
 • या पैकी, चलन बाजार आणि वस्तू बाजाराचा परिणाम बाकी दोन बाजारांवर होत असतो. यापैकी आजच्या लेखात आपण चलन बाजार आणि शेअर बाजार या दोन्हीच्या असलेल्या संबंधाचा विचार करून बाजाराची दिशा काय असेल? याचा विचार करणार आहोत.
 • गेल्या आठवडयात राष्ट्रीय शेअर बाजारच्या (NSE) निर्देशांकाने (निफ्टी) ११६१० ही खालची पातळी गाठली होती तर १२०३९ हा उच्चांक गाठला होता.
 • गेल्या काही दिवसांच्या हालचालींचा विचार करता, इथून पुढे बाजार तेजीत जाईल अशी जास्त शक्यता आहे. सद्य परिस्थितीत तरी तेजीत असलेल्यांना धोका असण्याचे संकेत नाहीत.
 • पुढील आठवडा आणि येणाऱ्या काळासाठी बाजारात विक्रीचा जोर वाढला तर ११८०० ही पहिली पातळी महत्वाची ठरेल. जर बाजार या पातळीवर टिकून राहिला तर, अजून खाली जाण्याची चिन्हे नाहीत. समजा तो नाही टिकला आणि सलग २ दिवस ११८०० या पातळीच्या खाली गेला तर, विक्रीचा जोर वाढण्याची चिन्हे आहेत.
 • शेअर बाजारावर बाकी बाजारातील चढ उताराचा परिणाम होत असतो. उदा. चलन बाजारातील चढ-उतार, तसेच कच्च्या तेलाची किंमत वगैरे. या पैकी आपण इथे चलन बाजाराचा विचार करणार आहोत. सद्य स्थितीत रुपयामध्ये फार हालचाल दिसत नाही. तसे घडल्यास बाजार ११६०० ही खालची पातळी गाठू शकेल.
 • जर बाजार वरच्या दिशेने आगेकूच करत राहिला तर, १२००० ही पातळी बाजाराला पहिला अडसर ठरेल. सलग २ दिवस जर बाजार या पातळीच्यावर राहिला तर, तो पुढे १२२००-३०० ही पातळी गाठु शकतो.
 • डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत होण्यासाठी त्याला ६९ च्या वर जाणे आवश्यक आहे. तसे झाल्यास तो ६७ पर्यंत वर जाऊ शकेल. जर तो ७१.२५ च्या खाली गेला तर, तो अजून कमजोर होईल.
 • बाजारची सद्य परिस्थिती विचारात घेता, तेजीवाल्यांना धोका असण्याची चिन्हे सध्यातरी दिसत नाहीयेत.

– मंदार दात्ये          

9869042683

(सुचना :- वरील विश्लेषण हे केवळ लोकांच्या माहितीसाठी असून, त्याचा वापर प्रत्यक्ष पैसे गुंतविण्यासाठी करू नये. तसे करून नुकसान झाल्यास, त्याला सर्वस्वी गुंतवणूकदार जबाबदार असेल. )   

(लेखक गेली बारा वर्षे शेअर मार्केटमध्ये पूर्ण वेळ व्यावसायिक म्हणून काम करतात.)

अर्थसाक्षरद्वारे प्रकाशित होणाऱ्या पुस्तक प्रकाशनाच्या कामात आम्हाला आपलं मोलाचं सहकार्य आवश्यक आहे.  यासाठी फक्त खालील लिंकला क्लिक करून त्यावरील फॉर्म भरून आम्हाला लेखांच्या निवडीसाठी मदत करा.

                  लिंक : http://bit.ly/Question_Form

(अधिक माहितीसाठी आम्हाला info@arthasakshar.com वर संपर्क करा.)

शेअर्स खरेदीचं सूत्र,

 शेअर्सची पुनर्खरेदी (Shares buybacks) ,

शेअर्सची साधी बदलती सरासरी,

शेअरबाजार: कधीही धोका न पत्करणे हेच खरे धोकादायक

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]
माफ करा, आपण हे कॉपी करू शकत नाही.