Reading Time: 4 minutes

गेले काही दिवस भांडवल बाजारात अस्थिरता आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स हा निर्देशांक आपल्या ४२,२७४ वरून २५,६३९ तर, राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी हा निर्देशांक १२,४३० वरून ७,५११ पर्यंत तळ गाठून आला. जवळपास ४०% घट ही एकदम अत्यल्प कालावधीत झाली. यापूर्वीही अनेकदा ही वेळ आली आहे त्यातून बाजार सावरला आणि त्यांने पुन्हा उभारी घेतली. यातील सन २००८ मधील मंदीमध्ये निर्देशांकात ६०% घट झाली होती. देशी आणि परदेशी वित्तसंस्थाचा कल बाजारास हेलकावे देत असतो. त्यांना आपल्या गुंतवणुकीवर फक्त नफाच मिळवायचा असल्याने उपलब्ध सर्व मार्गांचा  वापर त्यांच्याकडून केला जातो. 

स्टॉक मार्केट २०२०च्या पहिल्या तिमाहीत ४% ची घसरण

  • बाजारात असलेले अन्य सामान्य गुंतवणूकदार, श्रीमंत गुंतवणूकदार, फक्त दैनंदिन व्यवहार करणारे विक्रेते, धाडसी गुंतवणूकदार अगदी जुगारी प्रवृत्तीचे लोक हे सुद्धा नफा मिळवणे या उद्देशाने गुंतवणूक करत असून या सर्वांचे स्वतःचे असे निश्चित असे ठोकताळे असतात. 
  • यातील जास्तीत जास्त लोकांचा एकत्रित कल कुठे असेल त्यावर बाजाराची दिशा ठरते. अनेक कारणांनी त्यात चढ उतार होत असले तरी अंतिमतः कंपनीच्या कामकाजावर कंपनीचा भाव त्याचबरोबर बाजार कुठेतरी स्थिर होतो. 
  • यापूर्वी झालेली घसरण आणि त्याची कारणे तात्कालिक होती उदा. सरकारी घोरणात झालेला आमूलाग्र बदल, बाजारात उघडकीस आलेले घोटाळे, सरकारमध्ये झालेला बदल, अमेरिकेतील मंदी ई. त्याचा परिमाण विरळ झाल्यावर फार कमी कालावधीत, साधारणपणे दीड दोन वर्षात बाजाराने  नवा उच्चांक प्रस्थापित केला. 
  • यावेळी घसरण तीव्र आणि सर्व जगावर याचा परिणाम होणार आहे पूर्ण व्यवहार ठप्प झाले असून या संकटातून बाहेर पडून सर्व काही सुरळीत होण्यास अधिक कालावधी लागण्याची शक्यता आहे. 
  • पुढे काय होईल याबाबत अनिश्चितता असल्याने सर्वच जण गोंधळून गेले असून, बाजाराने नक्की तळ गाठला आहे का? यासंबंधी तज्ज्ञ व्यक्तीमध्ये मतभेद आहेत. 
  • ज्यांना निश्चित उत्पन्न आहे म्हणजे कायम नोकरी आहे किंवा महागाईशी निगडित पेन्शन मिळते त्यांना वाटणाऱ्या काळजीहून ज्यांचे हातावरच पोट आहे आणि जे गुंतवणुकीचा विचारही करू शकत नाही असे लोक आणि ज्यांनी पूर्वी गुंतवणूक केली आहे आणि या गुंतवणुकीतून येणारे व्याज, डिव्हिडंड आणि थोडाफार भांडवली नफा  हेच ज्यांचे उत्पन्नाचे साधन आहे त्यांना वाटणारी चिंता अधिक आहे. 
  • १ एप्रिल २०२० पासून सर्व सरकारी योजनांवरील व्याजदर मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आले आहेत. सध्याच्या परिस्थितीत जे अत्यंत  गरीब आहेत त्यांना अन्न नक्की मिळेल यासंबंधीची काळजी सरकार घेत आहे ही आनंदाची गोष्ट आहे.

कोरोना – अस्थिर शेअर बाजारात आपली एस.आय.पी सशक्त कशी कराल?

गुंतवणूकदारांनी काय करावे

  • अशा परिस्थितीत सर्वच गुंतवणूकदारांनी आपले मनोबल वाढवण्याची आवश्यकता असून त्यातील जेष्ठ नागरिक काय करू शकतील आणि त्यांनी काय करू नये ते आपण पाहुयात. 
  • या वर्गातील लोकांनी गेले ६० ते ८० वर्ष अथवा त्याहून अधिक वर्ष अनेक संकटांशी सामना केला आहे. युद्धाच्या काळात, आणीबाणीत, दुष्काळातही त्यांच्यावर अशी वेळ आली नव्हती. 
  • कोविड १९ हे संकट याहून वेगळे आहे. बाहेर जायचं नाही टाईमपास व्यायाम म्हणूनही फिरायचं नाही हे नक्कीच त्यांना असह्य होत असणार. यापुढील दिवस चांगले जावेत एवढीच त्यांची इच्छा आहे. त्यात वाढती महागाई उत्पन्नात होणारी घट, गुंतवणुकीचे घटलेले मूल्य त्यातून अपेक्षित परतावा न मिळण्याची शक्यता यांनी त्यांना ग्रासले आहे. 
  • सुदैवाने त्यांच्या गरजा कमी आहेत. साधी राहणी, स्वच्छता, अनावश्यक खर्च टाळण्याची त्यांची वृत्ती त्यांची बलस्थाने आहेत. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर “ईपीएफ” संदर्भात मोठा निर्णय

मनावर ताण आणणाऱ्या विविध घटना. 

  • कोविड १९ संबंधित विविध बातम्या. वाढलेले रुग्ण, मृतांची संख्या.
  • विविध ठिकाणचे बाजार गडगडण्याच्या बातम्या.
  • व्याजदर शून्य होतील का? या विषयीची मते.
  • बाजारासंबंधी विविध तज्ञाची मते, अंदाज.
  • विविध अफवा.
  • तज्ज्ञ समजणाऱ्या व्यक्तींकडून मिळणारा थंड प्रतिसाद. त्यांना केलेले फोन कॉल न उचलले जाणे.
  • गुंतवणूक काढून घेण्याचे, न काढून घेण्याचे अनाहूत सल्ले

कोरोना व्हायरसचा कमोडिटीजच्या किंमतीवरही मोठा परिणाम

या सर्व गोष्टींनी मनावरील ताण वाढत असेल तरी लक्षात ठेवा, सर्व जगावर आलेलं हे संकट आहे फक्त आपल्यावर आलंय असं नाही. यासंबंधी सरकारी पातळीवर उपाययोजना चालू आहेत. याचे गांभीर्य ओळखून पावले उचलली जात आहेत, लोकसहभागही चांगला आहे. यामुळे मोठी आर्थिक हानी होणार असून उद्योगधंदे पुन्हा चालू होऊन सुरळीत होयला वेळ लागेल. यातून आपण नक्की बाहेर पडून पुन्हा चांगली वाटचाल करू हे नक्की! या साऱ्या परिस्थतीवर मात करण्यासाठी –

  • अफवांवर विश्वास ठेवू नका. आपल्या माहितीची सरकारी यंत्रणांच्या संकेतस्थळावर जाऊन खात्री  करून घ्या.
  • विविध चॅनलवरील चर्चात्मक कार्यक्रम पाहू नका. ते खूप तापदायक असतात. कार्टून पहा, हलके फुलके विनोदी कार्यक्रम पहा.
  • जुने चित्रपट, गाणी यांचे कार्यक्रम दाखवणारे चॅनेल पहा.
  • आपले जुने मित्र सहकारी यांना फोन करा त्यांच्याशी व्हाट्स अप वरून चॅट करा. आपल्या चर्चेत आर्थिक विषय कटाक्षाने टाळा.
  • गाण्याची आवड असेल तर कराओकेचा वापर करून गाणी म्हणा.
  • पुस्तके, वर्तमान पत्रे, मासिके वाचा आपल्या आठवणी लिहून काढा. यासाठी मोबाईलचा चांगला वापर होऊ शकतो.
  • नवीन गोष्टी भले त्या कितीही शुल्लख असोत त्या शिकण्यासाठी समाज माध्यमांचा चांगला उपयोग होऊ शकतो.
  • आपले चालणे विसरू नका, घरातल्या घरातही येरझारा घालता येतो.
  • चालू असलेली औषधे नियमितपणे घ्या.
  • घरातच राहून ज्या ज्या गोष्टीतून आनंद मिळेल  त्या सर्व करा.

प्रधानमंत्री वय वंदना योजना

  • गुंतवणुकीच्या बाबतीत ज्या योजनांची मुदतपूर्ती होत आहे. त्यातील रक्कम दर सहामाहीस ७.७५% दराने व्याज देणाऱ्या रिझर्व बँकेच्या कर्जरोख्यात गुंतवता येईल.
  • ₹१००० दर्शनी मूल्य असलेल्या या कर्ज रोख्यात किमान गुंतवणूक १० हजार असून कमाल मर्यादा नाही. निवडक सरकारी आणि खाजगी बँकांत हे रोखे उपलब्ध आहेत.

कोरोना, शेअर बाजार आणि एसडब्लूपी गुंतवणूक

इतर गुंतवणूक योजना 

  • पीपीएफ वरील करमुक्त व्याजदर ७.१% असून मासिक प्राप्ती योजनेवरील व्याजदर मासिक प्राप्ती योजनेतील व्याजदर ६.६% असून वरिष्ठ नागरिक बचत योजनेतील व्याजदर ७.४% आहेत. 
  • बँकेतील व्याजदर व पोस्टातील योजनांचे दर ६ ते ७.४% च्या दरम्यात आहेत. याहून अधिक व्याज मिळेल याची आशा सोडून द्या. हे सर्व व्याजदर १ एप्रिल २०२० पासून लागू असून यात दर तीन महिन्यांनी बदल होऊ शकतो. 
  • म्युच्युअल फंड व चांगले समभाग यातील आपली गुंतवणूक मोडू नका चालू असलेल्या एस आय पी बंद करू नका, असे करणे म्हणजे स्वतःहून आपल्या पायावर धोंडा मारून घेण्यासारखे आहे. जर आपल्याकडे चांगले समभाग असतील, तर आपल्याला त्यांचा डिव्हिडंड मिळेल. 
  • म्युच्युअल फंड योजना त्यांचे निव्वळ मालमत्ता मूल्य (NAV) कमी आली तरी अधून मधून डिव्हिडंड देतील. निव्वळ मालमत्ता मूल्य कमी होणे हे बाजारभावावर अवलंबून असून डिव्हिडंड हा योजनेच्या नफ्यातून दिला जातो. 
  • मार्केट पडत असताना फंड मॅनेजर तोटा होऊ नये याची पुरेशी काळजी घेऊन नफा मिळवत असतात. तेव्हा याविषयीची चर्चा, मित्र, गुंतवणूक सल्लागार यांच्याशी करू नका. 

कोरोना, कोसळणारा शेअर बाजार आणि सामान्य गुंतवणूकदार !

आपली स्थिती त्यामानाने खूप चांगली आहे. थोडक्यात आपल्या वयाचा विचार करता काही दिवस समाजापासून अंतर ठेवतानाच अर्थकारणापासूनही अंतर ठेवावे, ही सर्वाना विनंती. 

बाजार वरखाली जाताना ज्यांचा जीव अजिबात वरखाली होत नाही, ते त्यांचे वय कितीही असले तरी, याही परिस्थितीत गुंतवणूक संधी शोधतीलच, तेव्हा हा लेख त्यांच्यासाठी नाहीच!

– उदय पिंगळे

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer:आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/ 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…