Reading Time: 4 minutes

गेल्या आठवड्यात म्युच्युअल फंड्समधील गुंतवणुकदारांना मोठाच धक्का बसला. आपल्या गुंतवणुकीचे मुल्य फक्त एका दिवसांत (०४ जुन २०१९) जेव्हा १०.. २०.. ३०%  आणि (काही दुर्दैवी लोकांनी) ५०% पेक्षा अधिक गमावल्याचे अनेकांना आढळले.

आश्चर्याची बाब म्हणजे नुकसानीची ही त्सुनामी शेअर् बाजारांत थेट पैसे गुंतविणाऱ्या ‘ईक्विटी फंड्स’मध्ये नव्हती, तर एरवी सुरक्षित, बॅंकेच्या मुदतठेवी समकक्ष असल्याचे ‘भासवून विकल्या गेलेल्या ‘गैर ईक्विटी’ योजनांमधे होती.

एका दिवसात झालेल्या नुकसानीची टक्केवारी दाखवणारी खालील आकडेवारी हे चित्र किती विदारक आहे हे स्पष्ट करण्यास पुरेशी आहे.

        DHFL Pramerica Medium Term Fund (-53.0)

        Tata Corporate Bond Fund (-29.6)

        Baroda Treasury Advantage   (-17.2)

        BNP Paribas Medium Term Fun (-12.9)

        Tata Medium Term Fund  (-12.3)

        JM Equity Hybrid Fund   (-11.6)

       BNP Paribas Corporate Bond Fund  (-10.8)

       JM Low Duration Fund (-10.2)

तुम्हाला सांगतो, अगदी आपल्या शेअरबाजारातही एका दिवसात एवढी पडझड गेल्या अनेक वर्षांत झालेली नाही.

  • बाजाराला, बाजाराशी संबंधित ईक्विटी फंड्सना  सतत ‘धोकादायक’ असे लेबल लावून त्यापासुन फटकून रहाणाऱ्या आणि पैसे एफएमपी (FMP) वा बॉंड फंडस मधे ठेवले म्हणजे बघायला नको. असा झापडबंद विचार करणाऱ्या अनेक गुंतवणुकदारांना बसलेला हा पराकोटीचा धक्का पाहून ‘Their whole life…Sheep are Scared of the wolf… But in the end…It’s the Shepherd … Who eats them!!’  या सुवचनाची आठवण झाली.
  • हे महाभारत घडावयाचे कारण म्हणजे वरील योजनांच्या खात्यांत DHFL या कंपनीने अदा केलेले कर्जरोखे, बंधपत्रे (Bonds) विकत घेतली गेली होती.  
  • सदर गुंतवणुकीवरील व्याज ज्या दिवशी  देय असून योजनांना मिळावयास हवे होते, त्या दिवशी  DHFL कंपनी व्याजाची रक्कम चुकविण्यास असमर्थ ठरली.
  • एखाद्या योजनेतील बॉंडस वर एखाद्या कंपनीने वायद्यानुसार देय व्याज ठराविक दिवशी नाही दिले तर  सामान्यपणे त्या व्याजाचे नुकसान त्या योजनेने सोसावयास हवेच. पण या बाबतीत आपल्या सेबीचा नियम फार कठोर आहे..
  • अशावेळी ‘तात्काळ  प्रभावाने’ केवळ न मिळालेले व्याज नव्हे, तर मूळ गुंतवणुकीचे ७५% मूल्यही बुडितखाती दाखवावे लागते.
  • याचाच अर्थ हा की जर एखाद्या योजनेत खरेदी केलेला १०० रु. किमतीच्या बॉंडवरील देय सहामाही व्याज (समजा) ०५ रुपये वेळेवर मिळाले नाही, तर त्या ५ रु व्याजाबरोबरच मूळ गुंतवणुकीच्या ७५% म्हणून ७५ असे एकुण ८० रुपयांचे नुकसान त्या योजनेला तडकाफडकी त्याच दिवशी पुस्तकांत नोंदवावे लागते (हा  नियम भलेही कठोर आहे, परंतु ग्राहक हिताचा विचार करता तो योग्य ही आहे).
  • सहाजिकच योजनांकडे असलेल्या DHF च्या बॉंड्सच्या प्रमाणात त्यांना नुकसानाची किमान पुस्तकी नोंद (book entry) करावीच लागली आणि त्या प्रमाणात त्यांच्या NAVs नी गटांगळ्या खाल्या.  

अशावेळी, अशा योजनांमधील गुंतवणुकदारांनी काय करावे??

  • DHFL ही सर्वोच्च AAA गुणांकन असलेली कंपनी असल्याने सहाजिकच किमान १६० वेगवेगळ्या योजनांमध्ये या कंपनीचे बॉड्स आहेत. आता सर्वाधिक सुरक्षित (AAA) ते एकदम बुडितखाती (D) असा धक्कादायक प्रवास केवळ ४ दिवसांत झाल्याने ‘जब भी कोई बड़ा पेड़ गिरता है, तो धरती थोड़ी हिलती है’, या (कुप्रसिद्ध) उक्तिप्रमाणे अनेक योजनांना या प्रकाराचा फटका बसणार आणि बसला. आपण आपल्या पोर्ट फोलियोंतील योजनांवर याचा काय परिणाम झाला, हे अवश्य तपासावे
  • शांत अविचल राहावे. झाला प्रकार घडुन गेला आहे. आता विचार करुन फारसा उपयोग नाही  ‘आलिया भोगासी असावे सादर’ हे संतवचन आठवावे. मात्र इथून पुढे सजग रहावे, काळजी घ्यावी.
  • खात्रीने  सांगतो, अशा दुर्घटना नक्कीच टाळता येतात कारण एखाद्या कंपनीची एवढी दुरावस्था काही एक/दोन दिवसांत होत नाही. त्याचे पडसाद आधीही उमटतच असतात.अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करु नये. आपण पैसे गुंतविलेल्या योजनांचे केवळ नाव नव्हे तर त्यात अंतर्भुत असलेल्या गुंतवणुकीचे तपशीलही  नियमितपणे तपासावेत. 
  • अन्यथा, एकदा पैसे गुंतवून कार्यभाग उरकल्यानंतर सुचविलेल्या योजनांचा फोलिओही न बघितल्याचा निष्काळजीपणा दाखविणारा सल्लागार बदलणे गरजेचे आहे. कारण  “All the risks cannot be avoided but these can be minimized.”
  • आधी म्हटल्याप्रमाणे अशी बुडितखाती केलेली नोंद ही केवळ एक पुस्तकी नोंद (book entry)आहे. कंपनीने उशीरा का होईना पैसे दिल्यास अशी केलेली नोंद उलटलीही (Reverse) जाऊ शकेल. (फ्लॅश – आत्ताच DHFL ने व्याज अदा केल्याची माहिती समोर येते आहे). मात्र  येथे एका महत्वाच्या तरतुदीकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो,
    • असे संभाव्य नुकसान ज्या तातडीने नोंदविले जावे अशी सक्ती सेबीने केली आहे, ती तत्परता येथेच संपते.
    • सेबीच्या मार्गदर्शक तत्वांनुसार एखाद्या कंपनीने आधी चुकवलेली देणी उशीराने निभावली तरीही अशा कंपन्यांचे रेटींग किमान ९० दिवसांनीच सुधारता येईल. (Minimum curing period to ‘upgrade a rating’ from ‘Default to a higher grade’ is 90 days.)
    • सहाजिकच NAVचे असे झालेले नुकसान पुर्णतः भरुन यायला वेळ लागेल. (अपवाद सर्व पैसे  मुद्दलासकट परत मिळाल्यास) ही  ९० दिवस वाट पहाण्याची अट माझ्या मते अन्याय्य तरतूद आहे.
    • गंमत पाहा, बुडीत खाती जाण्याची शक्यता असलेल्या DHFL कंपनीच्या एखादं लाखभर कोटी रुपयांपैकी म्युच्युअल  फंड्सकडे आहेत फक्त ५,००० कोटी आणि विमा कंपन्या व पेन्शन फंड्स यांच्याकडे (नेहमीप्रमाणे एलआयसी येथेही ‘आघाडीवर’) म्युच्युअल फंड्सच्या सहापट ३०,००० कोटी.
    • परंतु विमा  कंपनीला दररोज NAV जाहिर करावी लागत नाही वा Mark-to-Market म्हणजेच  MTM) समायोजन (adjustments) करावे लागत. ‘दृष्टि आड सृष्टी’ म्हणतात ते उगीच नाही.
    • बॅंकानाही अशी संभाव्य  देणी ९० दिवसांपर्यंत कोणतीही कार्यवाही न करता तशीच नियमित पद्धतीने दाखवता येतात.
    • येथे मात्र न झालेले नुकसानही ताबडतोबीने नोंदवून घ्यायचे. नंतर, सुधारणा झालीच तरीही ९० दिवस वाट पहायची असा अव्यापारेषु व्यापार आहे. सबब, या बुडिताचे बुडबुडे सध्यातरी फक्त म्युच्युअल फंड गुंतवणुकदारांच्या (आणि त्यांच्या ‘सुज्ञ’ सलागारांच्या) बुडाशी आहेत.
    • थोडक्यात काय, झालेले पुर्ण नुकसान भरुन येईपर्यत (९० दिवस वगैरे) वाट पहावी का? हे म्हणजे ‘उडदामाजि काळे गोरे..’ या निवडीइतकेच अवघड आहे.
  • सर्व विश्वात, चराचरांत परमेश्वराएवढाच ‘धोकाही’ भरुन राहिला आहे’,  हे एव्हाना पटले असल्यास कोणत्याही आकस्मिक अज्ञात अनियंत्रित धोक्यापेक्षा ज्ञात नियंत्रित धोका पत्करलेला काय वाईट? या न्यायाने शेअर बाजारांत वा त्याच्याशी संबंधित योजनांत नियमितपणे व तेही दीर्घकालावधीकरिता पैसे अवश्य गुंतवावे.
  • जिज्ञासूंनी लक्षात घ्यावे की, बहुतेकदा अशा योजनांमधील व्यवहार हे ही तात्काळ प्रभावाने बंद होत असल्याने ‘पडलेल्या भावांत नव्याने खरेदी’ करण्याचा पर्याय येथे उपलब्ध नसतो
  • या ‘बॉंड्स डिफॉल्ट’ प्रकरणाच्या अनुषंगाने चर्चेत आलेल्या ‘Side Pocketing’ या संकल्पनेविषयी नंतर कधीतरी लिहितो..

डेट फंड (Debt  Funds) एकदम ‘सेफ’, एफएमपी (FMP) बॅकेतील गुंतवणुकीपेक्षा फायदेशीर अशा मिळालेल्या सल्ल्यांवर विश्वासून आता पस्तावलेल्यांकरिता जाता जाता एक शेर ..

धोखे की ख़ासियत यही है जनाब .

ये विश्वास के साथ मुफ़्त मिलता है !..

– प्रसाद भागवत

 9850503503

(श्री. प्रसाद भागवत शेअर बाजार तज्ज्ञ असून गेल्या २२ वर्षांपासून शेअरबाजार, म्युच्युअल फंड्स इ. विषयांवर लेख लिहितात.)

शेअर्स खरेदीचं सूत्र,

राष्ट्रीय शेअरबाजार: को लोकेशन घोटाळा,

भांडवल बाजारामध्ये गुंतवणूक करताय? मग आधी हे वाचा,

अर्थसाक्षरद्वारे प्रकाशित होणाऱ्या पुस्तक प्रकाशनाच्या कामात आम्हाला आपलं मोलाचं सहकार्य आवश्यक आहे.  यासाठी फक्त खालील लिंकला क्लिक करून त्यावरील फॉर्म भरून आम्हाला लेखांच्या निवडीसाठी मदत करा.

                  लिंक : http://bit.ly/Question_Form

(अधिक माहितीसाठी आम्हाला [email protected] वर संपर्क करा.)

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Share this article on :
You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutesMRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutesअसा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutesअस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…