Arthasakshar कर्ज जामीन जामीनदार guarantor
Reading Time: 3 minutes

कर्जासाठी जामीन राहताय? 

अनेकदा कर्ज प्रक्रियेसाठी जामीनदार (guarantor) आवश्यक असतो. कोणासाठीही जामीन राहताना त्यासंदर्भातील हक्क, कर्तव्य, जबाबदाऱ्या तसेच धोक्यांची माहिती घेणे आवश्यक आहे.

राजेश तसा मेहनती व प्रामाणिक मुलगा. राजेशचं गृहकर्ज काही कारणांमुळे मंजूर करणं कठीण होतं. पण यावर एक उपाय होता तो म्हणजे जर राजेशच्या कर्जासाठी जर कोणी जामीनदार (guarantor) मिळाला असता, तर मात्र त्याचे कर्ज मंजूर होणं सहज शक्य होतं. पण सगळ्यात मोठी अडचण म्हणजे राजेशसाठी जामीनदार रहायला तयार कोण होणार? अशा वेळी राजेशच्या बॅंकेतल्याच एका मित्राने त्याला जामीन राहायची तयारी दाखवली व त्याचे कर्ज मंजूर झाले. राजेशनेही आपल्याला मदत करणाऱ्या आपल्या मित्राला आपल्या कर्जामुळे कोणताही त्रास होणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली आणि मुदतीपूर्वीच सर्व कर्ज फेडून टाकले. पण प्रत्येक व्यक्ती म्हणजे “राजेश” असेलंच असं नाही. त्यामुळे कोणालाही जामीन राहताना, “जपून टाक पाऊल जरा….”  

ऋण व्याजदराने गृहकर्ज?

कर्ज प्रक्रिया जामीन /जामीनदार कधी? 

  • अनेकदा आर्थिक अडचणींच्या वेळी किंवा घर खरेदी, उच्चशिक्षण, शुभकार्य यासारख्या अनेक गोष्टींसाठी कर्ज घयायची वेळ येते. 
  • काही वेळा बँकेच्या नियमानुसार कर्जदार त्याला हव्या असणाऱ्या रकमेच्या कर्जासाठी अपात्र ठरत असल्यास अथवा काही वेळा बँकेच्या नियमांनुसार कर्जदाराला कर्ज घेताना जामीनदारांची आवश्यकता भासते. 
  • उदा. कर्जदाराची शैक्षणिक पार्श्वभूमी, सतत बदलल्या जाणाऱ्या नोकऱ्या किंवा सततची बदलीची नोकरी, कमी मासिक उत्पन्न, तारण ठेवण्यात आलेल्या मालमत्तेचे मूल्य कमी असणे यासारख्या अनेक कारणांमुळे कर्ज घेताना जमीनदाराची गरज भासते.

कर्जबाजारीपणाची १४ लक्षणे

 कोण राहू शकतं जामीनदार (guarantor)?

  • ज्या व्यक्तीची आर्थिक स्थिती व मासिक उत्पन्न उत्तम आहे अशी १८ वर्ष पूर्ण झालेली कोणतीही व्यक्ती जामीनदार राहू शकते.   
  • आई, वडील, भाऊ, बहीण किंवा एखादा जवळचा नातेवाईक किंवा मित्रमैत्रिणी यापैकी कोणतीही व्यक्ती जामीन राहू शकते. त्यामुळे कठीण वाटणारे कर्ज सहज मंजूर होते. 
  • जामीनदाराचा सिबिल स्कोअर चांगला असणे आवश्यक आहे. 
  • जामीनदाराचे मानसिक आरोग्य चांगले असावे. 

होम लोन टॉप-अप का वैयक्तिक कर्ज?

जामीनदार म्हणून राहताना कोणती काळजी घ्याल?

  • आपल्या जवळच्या व्यक्तीला मदत म्हणून तर कधी माणूसकीच्या नात्याने आपण एखाद्याला जामीनदार म्हणून राहतो. 
  • जेव्हा आपण जामीन राहतो तेव्हा ज्याच्यासाठी जामीन राहतो  त्याच्यावर अगदी डोळे झाकून विश्वास ठेवलेला असतो की काहीही झालं तरी हा कर्जाचे हप्ते वेळेत भरणारच. 
  • जोपर्यंत कर्जदार व्यक्ती कर्जाचे हप्ते नियमित फेडत असते तोपर्यंत कसलीही चिंता नसते. परंतु, कर्जदाराने एखादा हफ्ता जरी चुकवला तरी जामीनदाराला थेट बँकेची नोटीस येऊ शकते.
  • कर्जाच्या कर्जफेडीची जबाबदारी ही कर्जदाराइतकीच जामीनदाराचीही असते. त्यामुळे अप्रत्यक्षपणे जामीनदार हा सहकर्जदारच होत असतो. 
  • जामीनदार राहणे तशी जोखमीची गोष्ट आहे. कोणत्याही व्यक्तीला जामीन राहताना सर्वात प्रथम त्या व्यतीच्या विश्वासार्हतेच्या खात्री करा. चुकीच्या व्यक्तीवर टाकलेला विश्वास तुमचे बँक खाते रिकामे करून तुम्हाला आर्थिक संकटात टाकू शकते. 
  • कर्जदार व्यक्ती कर्ज नक्की कशासाठी घेतेय? त्याला खरंच कर्जाची गरज आहे का? कर्जदाराचे वय, उत्पन्न, जबाबदारी, त्याची कर्ज फेडण्याची क्षमता, त्याच्याकडील मालमत्ता यासंदर्भात संपूर्ण माहिती घ्या. ज्यांच्यावर सर्वात जास्त विश्वास असतो अशाच व्यक्ती अनेकदा फसवणूक करतात. 
  • कर्ज घेताना कर्जदाराने तारण म्हणून कोणती मालमत्ता ठेवली आहे का, ते तपासून पहा. अपुऱ्या तारण कर्जासाठी जामीन राहू नका.
  • कोणाच्याही सांगण्यावरून, मानसिक किंवा भावनिक दबाव, समाज यासारख्या कोणत्याही कारणांना बळी पडून इच्छा नसताना कोणालाही जामीन राहू नका. 

वैयक्तिक कर्ज घेताय? मग लक्षात ठेवा हे ११ नियम

कर्ज,जामीन, जामीनदार (guarantor) आणि सिबिल – 

  • सिबिल म्हणजे ‘क्रेडिट इन्फर्मेशन ब्युरो (इंडिया) लिमिटेड’. भारतातील सर्व छोट्या मोठ्या बँकांच्या थकीत कर्जदारांच्या यादी या संस्थेकडे  असते. 
  • त्यामुळे कर्ज बुडविणाऱ्यांची संपूर्ण माहिती इतर बँकांनाही मिळत असते. 
  • कर्जदाराला कर्ज देताना बँक सर्वात आधी त्याचा ‘सिबिल’ अहवाल तपासते आणि मगच कर्ज मंजूर करते.
  • जर तुम्ही जामीनदार असाल आणि ज्या व्यक्तीसाठी जामीन राहिले आहात त्या व्यक्तीने  कर्जाचे हफ्ते वेळेवर भरले नाहीत. तर, त्या व्यक्तीचे नाव थकीत कर्जदारांच्या यादीत जातेच, पण त्याच्यासोबत जामीनदार म्हणून तुमचेही नाव तेथे नमूद होते. 
  • कर्जदाराने कर्जाचे हफ्ते वेळच्या वेळी नाही भरले नाहीत, तर जामीनदारांच्या घरी कायदेशीर नोटीस तर जातेच शिवाय “सिबिल स्कोअर”वरही त्याचा परिणाम होतो.
  • अशा परिस्थितीत कर्जदाराबरोबर जामीनदाराचाही सिबिल स्कोअर कमी होतो. त्यामुळे जामीनदाराला गरज असताना, त्याने बँकेत कर्जासाठी अर्ज केल्यास निव्वळ या कारणास्तव त्याचे कर्ज नामंजूर होऊ शकते.
  • जामीनदार म्हणून सही करताना कर्जाची परतफेड, त्यासाठीची मुदत, हप्ता भरायचा राहिल्यास त्यावर आकारण्यात येणार दंड या साऱ्याची माहिती घ्या. संबंधित कर्जाचा विमा काढता येत असल्यास तो काढा. 
  • सर्वात महत्वाचे जामीनदार राहण्यापूर्वी तुमचा स्वतःचा क्रेडिट स्कोअर तपासा. 

सिबिल (CIBIL) – आर्थिक व्यवहारांचा विकिपीडिया

कोणालाही मदत करणे चूक नाही. उलट शक्य तितकी मदत आपण नेहमीच करावी. पण ती करताना स्वतःचे आर्थिक, मानसिक व सामाजिक स्वास्थ्यही जपावे. तुमच्यावर केवळ तुमचीच नाही, तर तुमच्या कुटुंबीयांची जबाबदारीही असते. त्यामुळे कोणत्याही चुकीच्या निर्याणयामुळे आपले व आपल्या कुटुंबाचे आर्थिक आरोग्य धोक्यात येणार नाही याची काळजी घ्या. 

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Web Search: Facts about Loan Guarantee and Guarantor in Marathi, Guarantor marathi mahiti, jamaindarachi jababdari Marathi, Rights and Duties of Guarantor in Marathi, karjasathi jamin rahave ka? 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes  सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

व्यवसाय कर्ज घेऊन आपण यशस्वी स्वप्ने कशी पूर्ण करू शकतो?

Reading Time: 3 minutesउद्योजकता हा भारताच्या आर्थिक विकासातील महत्वाचा घटक आहे. देशातील उद्योग धंदे वाढीस…

“आधी खरेदी मग पैसे द्या” पेक्षा क्रेडिट कार्ड पद्धत चांगली आहे का ?

Reading Time: 2 minutes“खरेदी करा आणि पैसे नंतर द्या” म्हणजेच Buy Now, Pay Later ही…

कर्ज घेताय? तुम्हाला कर्जामुळे निर्माण होणाऱ्या या 9 समस्या माहिती आहेत का?

Reading Time: 3 minutesथोडं कर्ज (Loan) घेतलं तर काही बिघडतं? लोक क्रेडिट कार्ड तसेच वैयक्तिक…