गृहकर्जाबद्दलचे गैरसमज
https://bit.ly/32XbDPF
Reading Time: 3 minutes

गृहकर्जाबद्दलचे गैरसमज

तुम्ही माहितीच्या युगात राहत आहात. त्यामुळे एखाद्या कर्जासंबंधित, विशेषतः गृहकर्जासंबंधी माहिती मिळवणं फार काही कठीण नाही. पण योग्य माहिती मिळवणं हे अजूनही एक आव्हान आहे. माहितीचा अतिरेक, अर्धवट सत्य, चुकीचे ग्रह किंवा चुकीचा अर्थ लावणे, इत्यादी.  अनेक कारणांमुळे गृहकर्जाबद्दलचे गैरसमज दूर होत नाहीत. असेच काही अतिप्रसिद्ध गैरसमज पुढीलप्रमाणे-

गृहकर्जाबद्दलचे ६ गैरसमज

१. कमी व्याजदर निवडणं उत्तम:

  • ‘कमी व्याजदरात गृहकर्ज’ अशा मोठ्या, भपकेबाज जाहिरातींना बळी पडू नका.
  • गृहकर्जावरील व्याजदर हे तुमच्या गृहकर्जाची खरी किंमत दाखवत नाहीत.
  • एपीआर (ऍन्युअल पर्सेंटेज रेट) तुमच्या लोनचे खरे मूल्य दर्शवतो. गृहकर्जाचे मुद्दल, व्याज, कालावधी, प्रक्रिया शुल्क (प्रोसेसिंग फी), फाइल चार्ज, स्टॅम्प ड्यूटी, तारण विमा (मॉर्गेज इन्शुरन्स) आणि ईएमआय यांचा यात समावेश होतो.

२. स्थिर व्याजदर संपूर्ण कालावधीसाठी एकच राहतात:

  • कर्ज घेणारेच नाही, तर अनेक अर्थतज्ञांनाही असंच वाटतं की गृहकर्जावर स्थिर दर आकारल्यावर संपूर्ण कालावधीसाठी एकच व्याजदर लागू होतो.
  • खरं सांगायचं तर, स्थिर व्याजदर हा एका ठरावीक कालावधीसाठीच (३ ते ५ वर्षं) स्थिर असतो. लोनच्या संपूर्ण कालावधीसाठी तो स्थिर असत नाही.

हे नक्की वाचा: Top- Up Home Loan: काय आहे गृहकर्ज टॉप अप? 

३. स्थिर व्याजदर हा अस्थिर व्याजदरापेक्षा उत्तम असतो (किंवा याउलट):

  • दोन्ही प्रकारात साधक आणि बाधक मुद्दे आहेत आणि कोणताच प्रकार दुसर्‍यापेक्षा उत्तम आहे असे म्हणता येणार नाही.
  • भविष्यात तुम्हाला पैसे मिळण्याबाबत शाश्‍वती हवी असेल तर तुम्ही स्थिर व्याजदराची निवड करू शकता आणि जर तुम्हाला व्याजदरातल्या चढउतारांचा फायदा करून घ्यायचा असेल, तर तुम्ही गृहकर्जसाठी अस्थिर व्याजदराचा पर्याय निवडू शकता.

४. व्याजदरात वाढ म्हणजे ईएमआयमध्ये फुगवटा / वाढलेला ईएमआयः

  • उत्तम व्यवहार चालू असलेल्या बँकांच्या बेस रेटच्या बाबतीत (बेस रेट म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने इतर बँकांना ठरवून दिलेले व्याजदर. या दरापेक्षा कमी व्याजदर बँका ठेवू शकत नाहीत) आणि परिणामत: गृहकर्जावरील व्याजदरांमध्ये होणार्‍या वाढीबाबतीत लोन घेणार्‍यांची तात्काळ प्रतिक्रिया म्हणजे ईएमआयमध्ये वाढ होण्याची चिंता.
  • हा तर सगळ्यांत मोठा गैरसमज आहे. विशेषतः व्याजदर सक्तीचे असतात तेव्हा. वास्तविकतः बहुतेक बँका शर्तींच्या अधीन राहूनच लोनचा कालवधी वाढवून देतात आणि ईएमआयची रक्कम तेवढीच ठेवतात. व्याजदराच्या चक्रात, लागू होणार्‍या व्याजदरातील बदलांबरोबरच कालवधीतही बदल होतो. 
  • तथापि, हा बदल करण्याचा निर्णय इतरही अनेक घटकांवर अवलंबून असतो. उदा.- लोन घेणार्‍याचं वय, मालमत्ता, त्याचं उत्पन्न इत्यादी. इतर कुठलाही पर्याय नसल्याने बदल फक्त कालावधीतच होतो आणि ईएमआयच्या रकमेत काहीच बदल होत नाही. जर एखाद्याला लोन फेडण्याचा कालावधी वाढवायचा नसेल तर तो तसं बँकेला कळवू शकतो.
  • इतर कुठलाही पर्याय नसल्याने बदल फक्त कालावधीतच होतो आणि ईएमआयच्या रकमेत काहीच बदल होत नाही. जर तुम्हाला लोन फेडण्याचा कालावधी वाढवायचा नसेल, तर बँकेला तसं कळवून तुम्ही ईएमआयची रक्कम वाढवून घेऊ शकता.

हे नक्की वाचा: गृहकर्ज परतफेडीचे विविध पर्याय 

५. कमीत कमी व्याजदर असलेले लोन हाच सर्वोत्तम व्यवहारः

  • काही वर्षांपूर्वी बँकेत काम करणार्‍या बहुतेक कर्मचार्‍यांनी असाच विचार केला असता की, लोनसंबंधी सल्ला देताना हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे; कारण त्या काळी बँका देऊ करत असलेल्या व्याजदरांत पुष्कळ तफावत होती. पण आज तशी परिस्थिती नाही. मार्केटच्या पद्धती पाहता बँकांमध्ये चढाओढ चालू असते आणि व्याजदरही साधारण सारखेच दिले जातात. त्यामुळे ग्राहकांना ह्या बाबतीत निर्णय घेणं थोडं कठीण जातं.
  • कमी व्याजदर म्हणजे कमी ईएमआय असाही एक अर्थ होऊ शकतो. पण त्यामुळे जर मंजूर झालेल्या लोनच्या रकमेतून व्यक्तीची गरजेची पूर्तता होत नसेल तर त्याचा मूळ हेतू साध्यच होत नाही. जर तुमची कर्जासाठीची पात्रता कर्ज देणार्‍याने घालून दिलेल्या मूल्यमापनाच्या प्रमाणांपेक्षा कमी ठरत असेल, तर कमी व्याजदर हे थोडं दिलासा देणारं ठरतं. आणि हेही खरं की, प्रत्येकाने ह्याची खात्री करून घ्यायला हवी की बँक आपल्याला उपलब्ध असलेल्या पर्यायांपैकी(डील्स) सर्वोत्कृष्ट डील देतेय.
  • कोणत्या प्रकारचं उत्पादन आणि त्याची वैशिष्ट्य हे तुमच्या आर्थिक गरजा आणि उद्दिष्ट ह्यांना जास्त अनुरूप आहेत हे समजून घेणं आणि मग खर्चाचा अंदाज बांधणं हा महत्त्वाचा भाग आहे. केवळ कमी व्याजदर पाहून अंतिम निर्णय घेणं योग्य नाही.

६. मोठ्या बँका कमी व्याजदर देऊ करतात :

  • मोठ्या बँका हाच तुम्हाला उत्कृष्ट गृहकर्ज मिळवून देणारा एकमात्र स्रोत आहे असे नाही.
  • एनबीएफसी आणि इतर लहान बँका तुम्हाला गृहकर्जसाठी स्वस्त व्याजदर देऊ शकतात.
  • कमी व्याजदराबरोबरच जर तुम्हाला जास्त रकमेचं गृहकर्ज हवं असेल, तर एनबीएफसी आणि लोन देणार्‍या इतर परवानाधारक संस्था ह्या मोठ्या बँकापेक्षा जास्त चांगला पर्याय आहेत.

महत्वाचा लेख: होम लोन टॉप-अप का वैयक्तिक कर्ज? 

हे होते गृहकर्जाबद्दलचे ६ महत्वाचे गैरसमज.  गृहकर्ज हा विषय एवढा मोठा आहे की याबद्दल प्रत्येक गोष्टीत वेगवेगळे गैरसमज निर्माण होऊ शकतात. त्यामुळे कोणतेही गैरसमज मनात ठेवून गृहकर्ज घेणं अथवा घ्यायचं टाळण्याआधी आपल्या शंकांचं निराकरण तज्ज्ञ व्यक्तीकडूनच करून घ्या. कारण अर्धवट माहिती नेहमीच अज्ञानापेक्षा घातक असते. 

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

व्यवसाय कर्ज घेऊन आपण यशस्वी स्वप्ने कशी पूर्ण करू शकतो?

Reading Time: 3 minutes उद्योजकता हा भारताच्या आर्थिक विकासातील महत्वाचा घटक आहे. देशातील उद्योग धंदे वाढीस…

“आधी खरेदी मग पैसे द्या” पेक्षा क्रेडिट कार्ड पद्धत चांगली आहे का ?

Reading Time: 2 minutes “खरेदी करा आणि पैसे नंतर द्या” म्हणजेच Buy Now, Pay Later ही…

कर्ज घेताय? तुम्हाला कर्जामुळे निर्माण होणाऱ्या या 9 समस्या माहिती आहेत का?

Reading Time: 3 minutes थोडं कर्ज (Loan) घेतलं तर काही बिघडतं? लोक क्रेडिट कार्ड तसेच वैयक्तिक…