गुंतवणूक संकल्प
२०२१ या नव्या वर्षात आपण पुन्हा नव्याने सुरवात करणार आहोत. तुम्ही नवीन कल्पनांच्या शोधात असाल, तर नवीन वर्षाकरिता पुढील गुंतवणूक संकल्प करा आणि आपल्या गुंतवणुकीचा श्रीगणेशा करा. २०२१ ची प्रत्येकजणच आशा, उत्सुकता आणि अपेक्षेने वाट पाहत आहे. लस तयार करणारे अनेकजण संशोधनाच्या शेवटच्या ट्प्यात असून, अखेरीस या नव्या वर्षात फेसमास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि मागील वर्षातील प्रचंड अस्वस्थता यांची बंधने झुगारुन देण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास, हे स्वातंत्र्याचे वर्ष असेल, जो आनंद, उत्साह आपण साजरा करायचो, तोच पुन्हा अनुभवता येईल.
हे नक्की वाचा: नवीन वर्षात कर्जमुक्त होण्याचे ५ सोपे मार्ग
२०२१ साठीचे ५ गुंतवणूक संकल्प –
१. मी गुंतवणूक सुरु करेन:
- आपल्याकडे इमर्जन्सी फंड का तयार हवा, याची उत्तम शिकवण २०२० या वर्षाने आपल्याला दिलीच आहे.
- कोणत्याही अनिश्चित संकटामध्ये यामुळे आपल्याला व कुटुंबाला आर्थिक संरक्षण मिळते. यासोबतच अधिकाधिक संपत्ती निर्माण करण्याकरिता स्रोतही तयार होतात.
- अशा परिस्थितीत गुंतवणुकीच्या संधीही येतात. सुयोग्य आर्थिक नियोजन असेल तर, आपण गुंतवणूक करू शकता.
- उदा. मार्चमधील निचांकानंतर आतापर्यंत बेंचमार्क निर्देशांकांनी लक्षणीय वृद्धी केली. या काळात आयटी आणि फार्मासारख्या अनेक क्षेत्रांतील शेअर्सनी अनेक पटींनी प्रगीत केली.
- तुम्ही जेवढी जास्त गुंतवणूक कराल, ती कायम ठेवाल, बाजारात संधी मिळताच, तुम्ही जमवलेली संपत्ती तेवढ्या जास्त प्रमाणात वाढेल.
२. माझे खर्च मी वेगळ्या प्रकारे करेन:
- तुम्ही गुंतवणूक सुरु करताय, याचा अर्थ आता खर्च कमी करावा लागणार, असा नव्हे.
- महान रोमन नाटककार प्लुटस यांच्या शब्दात सांगायचे झाल्यास, “जास्त पैसे कमावण्यासाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागतील.”
- याचा अर्थ असा होतो की, तुम्ही तुमचा खर्च अशा प्रकारे करा की, त्यातून तुमच्यासाठी नवी संपत्ती निर्माण होईल. म्हणजेच तुम्ही बर्गरला रामराम करून एसआयपी सुरु करू शकता किंवा शेअर्स खरेदी करू शकता.
- असे केल्याने तुमच्या आर्थिक आरोग्यासह शारीरिक आरोग्यही राखले जाईल.
विशेष लेख: जानेवारी 2021 पासून बदलणारे हे 9 नियम तुम्हाला माहिती आहेत का?
३. मी माझे आर्थिक ज्ञान वाढवेन:
- फार ज्ञान नसलेल्या गुंतवणूकदारांना थोडा नफा आणि भरपूर नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे ही चूक करू नका.
- तुम्ही जरी एखादा सल्लागार, इन्व्हेस्टमेंट वेबसाईट किंवा ॲपच्या शिफारशीनुसार, खरेदी करत असलात तरी, खरेदी करत असलेल्या गोष्टीतील सर्व धाग्या-दोऱ्यांबद्दल माहिती करून घ्या.
- योग्य माहितीमुळे तुमच्या परताव्याचे गणित बरोबर येईल. तसेच, तुम्ही त्वरीत व चांगले निर्णय नुकसान टाळू शकता.
४. माझ्या गुंतवणुकीत वैविध्य असेल:
- गुंतवणूक करत राहण्याची कल्पना सोपी असली तरी अनुभवी गुंतवणूकदार तुम्हाला तुमची सर्व गुंतवणूक एकाच ठिकाणी करण्याचा सल्ला कधीच देणार नाही.
- तुम्ही शेअर्समध्ये गुंतवणूक करत असाल तर (उच्च शक्यतेचे लार्ज-कॅप आणि स्मॉल कॅप कंपनींसह) विविध क्षेत्रांमध्ये करा.
- सोने किंवा चांदीचे थोडे प्रमाण घेऊनही याचे आणखी संतुलन साधता येईल.
- वैविध्य असलेला पोर्टफोलिओ थेट जोखीम कमी करतो व एकंदरीत धोक्याच्या शक्यता टाळता येतात.
५. मी कोडिंगबद्दल माहिती घेईन:
- तुम्हाला माहिती आहे का? आजच्या घडीला भारतातील एकूण ट्रेड्सपैकी एक तृतीयांश अल्गोरिदमिक ट्रेड्स आहेत. अल्गोरिदमिक ट्रेडिंगला अल्गो ट्रेडिंग असेही म्हणतात.
- सिक्युरिटीज ऑटोमेटिकली खरेदी अथवा विक्री करण्याकरिता ट्रेडिंग धोरणाचे हे व्हर्चुअल मॉडेलिंग आहे.
- हे काही रॉकेट सायन्स नाही. तुम्हाला सोप्या पद्धतीने तुमचा कोड लिहून अल्गोरिदममध्ये क्रिया करण्याचा निर्णय ठरवून द्यावा लागतो.
- काही डिजिटल ब्रोकर्स आपल्याला अत्याधुनिक चार्ट तयार करायला मदत करतात. यासाठी हिस्टॉरिक आणि रिअल टाइम डेटाही वापरला जातो.
- सर्वात चांगली गोष्ट म्हणजे, मॅन्युअली खरेदी किंवा विक्री करण्याच्या तुलनेत ट्रेडिंग करताना या पद्धतीद्वारे तुम्हाला प्रीमियम रेट्स मिळतात.
- विकसित अर्थव्यवस्थांमध्ये, एकूण बाजाराच्या मूल्यापैकी ८०% ट्रेड्स अल्गो ट्रेड्स असतात.
- ट्रेडिंग आणि गुंतवणुकीत वाढत्या तंत्रज्ञानाबरोबर हा आकडा अजूनही वाढेल, असा अंदाज आहे.
- भारतात पायथॉन, आर किंवा जावा इत्यादी भाषा अवगत असल्यास तुम्ही यामध्ये अगदी पुढे राहू शकता. अल्गो ट्रेडिंगच्या मार्केटमध्ये उंची गाठू शकता.
- भविष्यातील ट्रेड्सचा बहुतांश भाग याद्वारे व्यापला जाईल, हे निश्चित!
महत्वाचा लेख: तरुणपणीच गुंतवणूक करण्याचे महत्त्व
२०२१ हे आता उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे, त्यामुळे आर्थिक स्वातंत्र्यासह, ज्या गोष्टीची महत्त्वाकांक्षा गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही मनात धरली आहे, त्या गोष्टी पूर्ण करण्याची हीच योग्य वेळ आहे. त्यामुळे नव्या वर्षात आर्थिक स्वातंत्र्याची खऱ्या अर्थाने सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही या संकल्पांनाही प्राधान्य द्या.
नववर्षामधील गुंतवणुकीसाठी हार्दिक शुभेच्छा!
– श्री. अमरजीत मौर्य
एव्हीपी – मिड कॅप
एंजल ब्रोकिंग लिमिटेड
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies
Web search: New Year Resolutions Marathi, financial freedom marathi, New Year Resolutions in Marathi, Investment strategies Marathi, New Year Investment in Marathi