Richard Montanez
‘हॉट चिटो’स्’ या खाद्यपदार्थाच्या ब्रँडचा शोध कोणी लावला (Richard Montanez), हा एक वादाचा विषय मध्यंतरी अमेरिकेत चांगलाच रंगला होता. कागदोपत्री ‘रिचर्ड मोंटेनाझ’ हे जरी या ब्रँडचे मालक असले तरीही आज ज्या परिस्थितीत ‘हॉट चिटो’स्’ आहे त्यामागे पडद्यामागचे कलाकार बरेचजण आहेत, असा खुलासा एका अमेरिकेच्या वर्तमानपत्राने केला होता. काय आहे हे पूर्ण प्रकरण ? जाणून घेऊयात.
हे नक्की वाचा: कर्जबाजारी व्यवसायाला १० वर्षात यशोशिखरावर नेणाऱ्या विजय शर्मा यांची यशोगाथा
रिचर्ड मोंटेनाझ (Richard Montanez)
- जगात प्रसिद्ध असलेल्या ‘हॉट चिटो’स्’ चा ‘रिचर्ड मोंटेनाझ’ हा फक्त रखवालदार होता. तो तर फक्त एक चौथी पास व्यक्ती आहे. फरक इतकाच होता की, त्याच्याकडे एक कल्पना होती ज्यामध्ये, एका छोट्या व्यवसायाला शंभर कोटींच्या वार्षिक उलाढाल करून देण्याची क्षमता होती.
- ‘रिचर्ड मोंटेनाझ’चा जन्म १९६० मध्ये कॅलिफोर्निया मधील गुवास्ती या छोट्या गावात एका शेतकरी कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील हे द्राक्षांची शेती करायचे. त्यांच्या घरात एकूण ११ जण होते.
- परिस्थिती जेमतेम असल्याने हे पूर्ण कुटुंब एका ‘लेबर कॅम्प’ मध्ये रहायचे. मूळचे मेक्सिकोच्या असलेल्या या कृष्णवर्णीय परिवाराला अमेरिकेतील शाळेत शिकणं सुद्धा त्या काळात कठीण झालं होतं.
- आज कोट्याधीश असलेल्या, जगभरात व्याख्यान देणाऱ्या ‘रिचर्ड मोंटेनाझ’ यांना कित्येक वर्ष इंग्रजीत बोलता सुद्धा येत नव्हतं, हे नुकतंच त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं.
- “लहानपणी शाळेत जेव्हा मुलांना ध्येय विचारलं जायचं, तेव्हा माझ्या डोक्यात कोणतंच ध्येय नव्हतं. काही वर्षांनी तर मला ती शाळा सुद्धा सोडावी लागली होती.”असंही त्यांनी आपल्या मुलाखतीत पुढे संगीतलं होतं.
- शाळा सोडल्यानंतर ‘रिचर्ड मोंटेनाझ’ हे लोकांच्या कार पुसून उदरनिर्वाह करायचे. परिस्थिती बदलण्याचे कोणतीही आशा नसतांना त्यांचे शेजारी रहाणारे एक सद्गृहस्थ १९७६ मध्ये रिचर्ड यांच्यासाठी नोकरीची एक संधी घेऊन आले आणि तिथून ‘रिचर्ड मोंटेनाझ’ यांचं आयुष्य बदललं.
विशेष लेख: मासिक पगार रु. ८,००० ते अब्जावधींची संपत्ती -झिरोधाची यशोगाथा !
रिचर्ड मोंटेनाझ: रखवालदार ते मालक – चकित करणारा प्रवास
- ‘फ्रिटो-ले’ या ठिकाणी रँचो कुकमोंगा या शेतकऱ्याला आपल्या शेतीसाठी एक ‘रखवालदार’ हवा होता.
- ४ डॉलर प्रति तास इतका पगार तो रिचर्ड यांना देण्यास तयार झाला होता. ‘रिचर्ड मोंटेनाझ’ यांना मिळणारा हा मोबदला त्यांना त्यांच्या शेतीमध्ये काम करून मिळणारा मोबदल्यापेक्षा कित्येक पटीने अधिक होता.
- वयाच्या १८ व्या वर्षी मिळालेली ही नोकरी करतांना ‘रिचर्ड मोंटेनाझ’ यांना इंग्रजी लिहिता, वाचता सुद्धा येत नव्हतं. त्यांच्या नोकरीचा अर्ज त्यांच्या पत्नीने भरून दिला होता. रिचर्ड तो फॉर्म भरून मॅनेजर कडे गेले आणि त्यांनी ती नोकरी मिळवली होती.
- नोकरी मिळाल्यावर रिचर्डच्या आई वडिलांनी रिचर्डला सांगितलं की, “तू फरशी जरी पुसायचं काम केलंस तरी ते मन लावून कर. मालकांना तुझा अभिमान वाटावा असं काम कर.”
- ‘रिचर्ड मोंटेनाझ’ने आई वडिलांचा हा सल्ला तंतोतंत पाळला आणि कॅलिफोर्निया मधील ‘फ्रिटो-ले-प्लॅन्ट’च्या पायाभरणी पासून तो कंपनीत काम करू लागला.
- आलेल्या प्रत्येक व्यक्तीचं हसून स्वागत करणे, प्लॅन्ट स्वच्छ ठेवणे या रिचर्डच्या कामांमुळे कोणाला तो रखवालदार वाटतच नसे.
- रिचर्डने आपल्या त्याला दिलेल्या कामाव्यतिरिक्त कंपनीचे इतर काम जसे की मशीन ऑपरेशन, गोदाम, चिप्स तयार कसे होतात हेसुद्धा शिकून घेतले.
- १९८० मध्ये ‘फ्रिटो-ले’ यांची प्रकृती बिघडली होती. कंपनीच्या तत्कालीन सीईओ रॉजर एनरिको यांनी कंपनीच्या सर्व कामगारांना आवाहन केलं की, “त्यांनी ‘फ्रिटो-ले’ ही कंपनी स्वतःच्या मालकीची कंपनी असल्यासारखं काम करावं.”
- ‘रिचर्ड मोंटेनाझ’ने हा संदेश अगदी मनापासून ऐकला आणि त्या क्षणापासून कंपनीचा मालक असल्यासारखं वागायला सुरूवात केली.
- दहा वर्ष फक्त फरशी पुसणारा रिचर्ड त्या दिवशीपासून ‘फ्रिटो-ले’ च्या सेल्समन सोबत विक्रेत्यांना भेटायला जाऊ लागला.
- “दुकानात ‘फ्रिटो-ले’ चिप्स योग्य ठिकाणी ठेवले नाहीयेत” असा अभिप्राय तो मॅनेजमेंटला देऊ लागला.
चिटोज् – नवं रूप
- काही दिवसांनी ‘रिचर्ड मोंटेनाझ’ यांनी मेक्सिकोच्या थोड्या तिखट असलेल्या ‘एलोट’ या स्नॅक्सची चव बघितली. त्याच्या लक्षात आलं की, आपल्या कंपनीत तयार होणाऱ्या ‘चिटोज्’ जर थोडं तिखट केलं तर त्याची चव अशीच लागेल. रिचर्डने हा प्रयोग केला आणि ‘चिटोज्’चं नवीन स्वरूप लोकांना प्रचंड आवडलं.
- रिचर्ड मोंटेनाझने ही संकल्पना एका प्रेझेंटेशनच्या स्वरूपात मॅनेजमेंट समोर ठेवली. २ आठवडयात त्याने पत्नीच्या मदतीने ‘तिखट चिटोज्’ कसं मार्केटमध्ये यशस्वी होऊ शकतं, याचा अभ्यास केला.
- प्रेझेंटेशनच्या दिवशी मॅनेजमेंटला रिचर्डने त्याच्या संकल्पनेत असलेले ‘तिखट चिटोज्’ प्रत्यक्ष खायला दिले. मॅनेजमेंटला ते प्रचंड आवडले आणि त्यांनी ‘रिचर्ड मोंटेनाझ’ला “इथून पुढे कधीच फरशी पुसण्याचं काम करायचं नाही. आमच्यासोबत काम करायचं” असं सांगितलं.
- ‘हॉट चिटोज्’ हे या नवीन स्नॅक्सला नाव देण्यात आलं आणि ‘रिचर्ड मोंटेनाझ’ला त्याचं ‘प्रमुख’ म्हणून नेमण्यात आलं.
- आज ‘फ्रिटो-ले’ कंपनीच्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या स्नॅक्सपैकी ‘हॉट चिटोज्’ हे अग्रक्रमी आहे.
- फारशी पुसणारा ‘रिचर्ड मोंटेनाझ’ हा आज ‘फ्रिटो-ले’ कंपनीला आर्थिक पाठबळ पुरवणाऱ्या ‘पेप्सी को अमेरिका’चा वाईस प्रेसिडेंट या पदावर रुजू आहे.
इतर लेख: शून्यापासून विश्व निर्माण करणाऱ्या गौतम अदानी यांच्या यशाचा प्रवास
‘रिचर्ड मोंटेनाझ’ हे आज अमेरिकेतील सर्वात चांगल्या ‘मोटिवेशन स्पीकर्स’ पैकी एक आहेत. त्यांच्या आयुष्यावर ‘फ्लॅमीन हॉट’ हा सिनेमा सुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. ‘रिचर्ड मोंटेनाझ’ हे आजही त्यांच्या मूळगावी ‘रँचो कुकमोंगा’ इथेच राहतात. सामाजिक योगदान म्हणून ते आज एक ‘चॅरिटेबल ट्रस्ट’ सुद्धा चालवतात. ते काही कॉलेजमध्ये एमबीएच्या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंटचं प्रशिक्षण सुद्धा देत असतात. एका विद्यार्थ्याने रिचर्ड यांना हे विचारलं होतं की, “तुम्ही पी.एच.डी. केलेलं नसूनही एमबीएच्या विद्यार्थ्यांना कसं काय शिकवू शकतात ?”
रिचर्डने या प्रश्नावर असं उत्तर दिलं की, “मी पी.एच.डी. केलं आहे, फक्त त्याचा फुल फॉर्म वेगळा आहे. तो असा आहे – पुअर, हंबल अँड डिटरमाईंड.”
‘रिचर्ड मोंटेनाझ’ सारखे व्यक्तिमत्व हे कंपनीचे प्रत्यक्ष मालक नसले तरीही त्यांच्या कर्तृत्वाने त्यांना मालका इतकाच मान मिळत असतो. अमेरिकेतील वृत्त संस्थांनी ‘फ्रिटो-ले’चा मालक कोण ? या वादात ‘रिचर्ड मोंटेनाझ’ला कमी लेखलं असलं तरीही ‘फ्रिटो-ले’ मधील प्रत्येक कामगारांच्या नजरेत तोच कंपनीचा मालक असेल हे निर्विवाद सत्य आहे.
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies
Web search: Richard Montanez in Marathi, Richard Montanez Marathi Mahiti, Richard Montanez Marathi, Who is Richard Montanez Marathi, Success story of Richard Montanez