Continuation chart pattern:  तांत्रिक विश्लेषणामधील कंटिन्युएशन चार्ट पॅटर्न

Reading Time: 4 minutes

Continuation chart pattern

आज आपण कंटिन्युएशन चार्ट पॅटर्न (Continuation chart pattern) या संकल्पनेबद्दल माहिती घेऊया. याच्यामुळे आपणास बाजारातील अप अथवा डाऊन ट्रेन्ड समजतो. कंटिन्युएशन चार्ट पॅटर्न हे असलेल्या ट्रेंड चालू  राहण्याचे संकेत देतात, जर तेजीचा ट्रेंड चालू असेल आणि बुलीश  कंटिन्युएशन चार्ट पॅटर्न तयार झाले, तर शेअरमध्ये तेजीचा संकेत मिळतो.  जर मंदी चालू असेल आणि चार्टमध्ये बेरीश कंटिन्युएशन चार्ट पॅटर्न तयार झाला तर यापुढील काळात शेअरमध्ये मंदी राहील असे दिसते. 

Continuation chart pattern: कंटिन्युएशन चार्ट पॅटर्न –

 1. ट्रँगल
 2. सिमनेट्रिकल ट्रँगल
 3. असेंडिंग ट्रँगल
 4. डेसेंडिंग ट्रँगल
 5. फ्लॅग
 6. रेक्टँगलेस
 7. प्राइज चॅनल
 8. कप अँड हॅण्डल, इत्यादी

 ट्रँगल व प्राईज चॅनेल या पॅटर्नची स्ट्रॅटेजी 

ट्रँगल  (Triangle)

ट्रँगल म्हणजे त्रिकोणासारखे तयार होणारे पॅटर्न. यामध्ये आपणास असेंडिंग व डिसेंडिंग असे परस्परविरोधी पॅटर्न्स दिसतात.  

असेडिंग ट्रँगल

 • असेडिंग हा बुलीश कंटिन्युएशन चार्ट पॅटर्न असून वाढणाऱ्या त्रिकोणाच्या आकरासारखा दिसतो. 
 • या पॅटर्नमध्ये सुरुवातीचा ट्रेंड अपट्रॅन्ड असणे गरजेचे आहे. यात अप ट्रेंडनंतर शेअरची किंमत एक रेसिस्टंट तयार करून पुन्हा खाली येते व एक सपोर्ट बनवते तेव्हा चार्ट मध्ये पहिला सपोर्ट व पहिला रेसिस्टंट तयार होतो. 
 • पुढे ही किंमत वर जाऊन मागील रेसिस्टंटच्या जवळ किंवा थोडी वर खाली जाऊन दुसरा रेसिस्टंट घेते व पुन्हा किंमत खाली येऊन दुसरा सपोर्ट घेते. 
 • हा सपोर्ट पहिल्या सपोर्टपेक्षा उच्च असतो तेव्हा चार्टमध्ये दोन सपोर्ट व दोन रेसिस्टंट तयार होतात. 
 • दोन्ही रेसिस्टंटच्या उच्च किमंतीला जोडणारी रेघ जोडावी, या रेषेला ‘रेसिस्टंट लाईन’ म्हटले जाते. 
 • खाली दोन्ही सपोर्टला जोडणाऱ्या ट्रेंड लाईनना असेंडिंग ट्रेंड लाईन म्हटले जाते. 
 • या पटर्नचा आकार वरवर चढत जाणाऱ्या त्रिकोणासारखा दिसतो. जेव्हा रेसिस्टन्स लाईनवर किंमत ब्रेक होऊन क्लोज होते तेव्हा शेअरमध्ये तेजी येण्याचे संकेत दिसतात. 
 • या पटर्नमध्ये दोन सपोर्ट दोन रेसिस्टंट असणे गरजेचे असते. हा सर्व टाइम फ्रेममध्ये तयार होणारा पॅटर्न आहे.

डिसेडींग ट्रँगल (Descending triangle): 

 • डिसेंडिंग ट्रँगल हा बेरिश कंटिन्युएशन चार्ट पटर्न असून, शेअरमध्ये मंदी राहील असे दर्शवितो. याचा आकार घटत्या त्रिकोनाणंसारखा दिसतो. 
 • हा पॅटर्न जेव्हा शेअर मध्ये मंदीचा ट्रेंड चालू असतो तेव्हा शेअरची किंमत एक सपोर्ट घेऊन पुन्हा वर जाऊन एक रेसिस्टंट तयार करतो तेव्हा चार्ट मध्ये पहिला सपोर्ट व रेसिस्टंट तयार होतो नंतर पुन्हा किंमत खाली येऊन पहिल्या सपोर्ट लेव्हल जवळ दुसरा सपोर्ट तयार करतो, तेथून पुन्हा किंमत वर जाऊन एक रेसिस्टंट बनवतो. 
 • हा रेसिस्टंट मागील रेसिस्टंटच्या खाली असावा लागतो. तेव्हा दोन्ही सपोर्टच्या कमी किंमतीला एक रेष जोडावी. ही त्याची सपोर्ट लाईन असते. 
 • दोन्ही रेसिस्टंटच्या हाय वर एक ट्रेंड लाईन जोडावी. तिला डीसेंडिंग लाईन म्हटले जाते. ह्या पॅटर्नसाठीही किमान दोनपेक्षा जास्त सपोर्ट व रेसिस्टंट असणे अवश्यक असते. 
 • दोन्ही लाईन जोडल्या नंतर याचा आकार ट्रँगलसारखा दिसतो. खाली चार्टमध्ये दाखविल्या प्रमाणे जेव्हा शेअर्सची किंमत सपोर्ट लाईनच्या खाली क्लोज होते तेव्हा आपण शेअर्समध्ये विक्री करू शकतो. यात आपण टार्गेट व स्टोप लॉस लावून काम केले तर आपणास खूप फायदा होऊ शकतो.

प्राईज चॅनेल (Price channel )

प्राईज चॅनेल हा चार्ट पटर्न दोन समांतर रेषांमध्ये बनतो. यात बुलिश कंटिन्युएशन प्राईज चॅनेल पटर्न तेजीदर्शक असून दुसरा बेरीश कंटिन्युएशन प्राईज चॅनल पटर्न हे मंदी दर्शवतो.

बुलिश कॉन्टीनुशन प्राईज चॅनल

 • बुलिश कॉन्टीनुशन प्राईज चॅनल पॅटर्न नंतर जेव्हा चार्ट मध्ये तेजीचा ट्रेड सुरु असतो. या विशिष्ट तेजीनंतर शेअरमध्ये प्राईज एक रेसिस्टंट तयार करून खाली जाते आणि पहिला सपोर्ट तयार करतो. नंतर किंमत वर जाऊन दुसरा रेसिस्टंट तयार करते. पण ही प्राईज पहिल्या रेसिस्टंट पेक्षा खाली असते. 
 • हा दुसरा रेसिस्टंट तयार करून किंमत पुन्हा खाली येऊन पहिल्या सपोर्टच्या खाली दुसरा सपोर्ट तयार करतो. यात अंतर समान असावे. दोन्ही रेसिस्टंटच्या हाय वर ट्रेड लाईन जोडावी  तिला मेन लाईन म्हणतात. 
 • दोन्ही सपोर्टच्या लो प्राईजला जोडणाऱ्या लाईनला चॅनल लाईने म्हंटले जाते. ह्या ट्रेड लाईन एकमेकांपेक्षा समान असतात. 
 • जेव्हा यात ब्रेक आउट होतो तेव्हा आकृतीत दाखवल्या प्रमाणे उलाढाल दिसते.  
 • जेव्हा शेअरच्या चार्ट मध्ये हा पटर्न दिसला की आपण दोन्ही सपोर्टच्या लो प्राईज ला ट्रेड लाईन व दोन्ही रेसिस्टंटच्या हायला दुसरी ट्रेंड लाईन जोडावी. 
 • जेव्हा प्राईस बुलिश चॅनेल च्या वर क्लोजिंग देते तेव्हा आपण खरेदी करू शकतो आणि आपल्या रिस्क रीवार्ड नुसार प्रॉफिट होऊ शकतो.

बेरीश कॉन्टीनुशन प्राईज चॅनल

 • एखाद्या शेअरच्या चार्ट मध्ये मंदी  सुरु असताना, विशिष्ट मंदीनंतर प्राईज सपोर्ट घेऊन वर जाते व पहिला रेसिस्टंट तयार करते व तेथून पुन्हा प्राईज खाली जावून पहिल्या सपोर्टच्या वर दुसरा सपोर्ट तयार करतो व तेथून पुन्हा मागील रेसिस्टंट च्या वर जाऊन दुसरा रेसिस्टंट तयार करतो. 
 • हा रेसिस्टंट मागील पेक्षा उच्च असतो. दोन्ही सपोर्टला जोडणाऱ्या लाईनला मेन ट्रेंड लाईन म्हणतात व दोन्ही रेसिस्टंटला जोडणाऱ्या लाईनला चॅनेल लाईन म्हणतात. 
 • जेव्हा चार्ट मध्ये हा पॅटर्न दिसतो. तेव्हा आपण दोन्ही सपोर्टला एक ट्रेंड लाईन ओढावी  व दोन्ही रेसिस्टंटला एक ट्रेंड लाईन जोडावी खाली चार्ट मध्ये दाखविल्याप्रमाणे जेव्हा शेअरची किंमत सपोर्ट लाईंच्या खाली क्लोज होते, तेव्हा आपण विक्री करू शकतो. 

अशा प्रकारे टेकॅनिकल एनलिसीस मधील अनेक वेगवेगळ्या चार्ट पॅटर्नच्या साहाय्याने आपणास बाजारात अल्पकालावधीसाठी गुंतवणूक निर्णय घेण्यास मदत होते. बाजारभावाची दिशा समजते. शेअर खरेदी -विक्रीची योग्य वेळ समजते आणि तोटा कमी करून बाजारातून बाहेर पडता येत असल्याने तांत्रिक विश्लेषण ही अत्यंत उपयुक्त प्रणाली आहे.

शरद गोडांबे

9657980309

sharadgodambe92@gmail.com

For suggestions queries – Contact us: info@arthasakshar.com 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Leave a Reply

Your email address will not be published.