Vijay Sharma
Reading Time: 2 minutes

Vijay Sharma

“सुट्टे नाहीयेत ? सर, पेटीएम करा ना…” हे वाक्य नित्याचेच झाले आहे. विजय शर्मा (Vijay Sharma) यांच्या पेटीएम कंपनीच्या यशाची घोडदौड ‘फोन पे’, ‘गुगल पे’ सारखे तगडे प्रतिस्पर्धी असतानाही चालूच आहे. सध्या अनेक डिजिटल वॉलेट आपल्या सेवेत उपलब्ध झाले आहेत. आज घराबाहेर पडतांना तुम्ही वॉलेट घेतलं नाही तरी चालतं, फक्त मोबाईल सोबत ठेवा. तुमच्या कोणत्याही आर्थिक व्यवहारात अडथळा येणार नाही. मोबाईलद्वारे पैसे देता येणं म्हणजेच ‘Pay through mobile’ ही संकल्पना भारतात पेटीएमने रुजवली आहे हे मात्र निर्विवाद सत्य आहे. 

हे नक्की वाचा: शून्यापासून विश्व निर्माण करणाऱ्या गौतम अदानी यांच्या यशाचा प्रवास 

पेटीएमचे शिल्पकार विजय शर्मा 

  • विजय शेखर शर्मा या माणसाने  २०१० सुरू केलेल्या पेटीएमने त्यांना २०१७ मध्ये त्यांना १०० कोटी संपत्ती असलेला भारतातील सर्वात तरुण व्यक्ती म्हणून घोषित केलं यातच त्यांचं यश आपल्या लक्षात येईल.
  • विजय शर्मा यांचा जन्म ७ जून १९७८ रोजी उत्तरप्रदेश मधील अलिगढ येथे झाला होता. आपलं शालेय शिक्षण अलिगढ येथून पूर्ण केल्यानंतर त्यांनी दिल्ली कॉलेज ऑफ इंजिनियरिंग मधून ‘इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियरिंग’ ही पदवी घेतली. 
  • शालेय शिक्षण हिंदी माध्यमातून घेतल्याने विजय शर्मा यांना कॉलेजमध्ये इंग्रजीत बोलणं हे सुद्धा एक मोठं आव्हान होतं. पण, विजय यांनी त्या गोष्टीवर खूप काम केलं आणि आपल्या याच कमजोरीला त्यांनी बलस्थान बनवलं. 
  • १९९७ मध्ये कॉलेज मध्ये शिकत असताना विजय यांनी ‘इंडियासाईट डॉट नेट’ ही वेबसाईट सुरू केली. २ वर्ष त्यावर काम केल्यानंतर ही वेबसाईट विजय यांनी १० लाख रुपयांना विकली. 
  • २००१ मध्ये विजय शर्मा यांनी ‘One97 कम्युनिकेशन्स’ या कंपनीची स्थापना केली. सुरुवातीच्या काळात ही कंपनी मोबाईलवर बातम्या, क्रिकेटचा स्कोर, रिंगटोन्स, जोक्स, परीक्षा निकाल असा कंटेंट ग्राहकांना सहज उपलब्ध करून द्यायची. 

विशेष लेख: एलॉन मस्क यांचा यशाचा प्रवास

विजय शर्मा: कर्जबाजारी कंपनी ते सर्वात जास्त किमतीचा आयपीओ 

  • २०१० मध्ये विजय शर्मा यांना पेटीएमची संकल्पना सुचली आणि त्यांनी येणारा स्मार्टफोनच्या क्रांतीच्या काळाचा अंदाज घेत आपलं पूर्ण लक्ष पेटीएम वर केंद्रित केलं. 
  • ८ लाख रुपयांचं कर्ज घेऊन विजय शर्मा यांनी पेटीएमच्या व्यवसायाला सुरुवात केली होती. व्यवसायातून येणाऱ्या अनियमित परताव्यामुळे विजय यांना कर्जाचे हफ्ते चुकवणं सुद्धा एकेकाळी अवघड जात होतं. 
  • कर्जाचे हफ्ते देता यावेत म्हणून विजय शर्मा यांनी विविध कॉलेज मध्ये ‘कम्प्युटर नेटवर्किंग’ या विषयावर ‘गेस्ट लेक्चर’ देण्यास सुरुवात केली आणि त्यांनी ही वित्तीय तूट भरून काढली.
  • २०१८ मध्ये पेटीएमची विजयी घोडदौड बघता वॉरेन बुफे यांची कंपनी ‘बर्कशायर हाथवे’ या कंपनीने पेटीएम मध्ये ३०० मिलियन युएस डॉलर्सची गुंतवणूक केली आणि कंपनीने आपल्या सेवांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली. पेटीएम मॉल, फ्लाईट टिकेट्स सारख्या सोयींमुळे पेटीएमने ग्राहकांची मनं जिंकली. 
  • २०२१ मध्ये विजय शर्मा यांनी लाँच केलेल्या पेटीएमच्या आयपीओमुळे पुन्हा पेटीएम परत एकदा चर्चेत आलं आहे. १६,६०० करोड रुपयांचा हा आयपीओ भारतातील सर्वात जास्त किमतीच्या आयपीओ मध्ये सर्वोच्च स्थानावर आहे. 
  • ऑनलाईन स्टार्टअप या भारतासाठी नवीन असलेल्या व्यवसाय प्रकारात पेटीएमने अल्पावधीतच आपला टर्नओवर १०० कोटीपर्यंत नेऊन ठेवला आहे. 

महत्वाचा लेख: मासिक पगार रु. ८,००० ते अब्जावधींची संपत्ती -झिरोधाची यशोगाथा !  

कार्याचा गौरव: 

  • २०१५ मध्ये विजय शर्मा यांना ‘इंडिया’ज् इंनोव्हेटिव्ह सीईओ’ हा पुरस्कार देण्यात आला होता. ‘पेटीएम’ला याच पुरस्कार सोहळ्यात ‘इनोव्हेटिव्ह स्टार्टअप ऑफ द इयर’ या पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आलं होतं. 
  • २०१७ मध्ये विजय शर्मा यांच्या कार्याची दखल टाईम्स मासिकाने घेतली आणि त्यांचा उल्लेख जगातील १०० प्रभावित करणाऱ्या व्यक्तींमध्ये केला. 

एका मध्यमवर्गीय शिक्षकाचा मुलगा असलेल्या विजय शर्मा यांना एकेकाळी खूप संघर्षमयी आयुष्याला सामोरं जावं लागलं होतं. आपली जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर आज विजय शर्मा यांचं वार्षिक उत्पन्न ४ रुपये इतकं आहे. आजच्या आपल्या नोकरीत किंवा व्यवसायात संघर्ष करणाऱ्या तरुणांसाठी आणि उद्योजकांसाठी विजय शर्मा यांचा हा प्रवास खूप प्रेरणादायी आहे.

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Read – Disclaimer policies 

web search: Vijay Sharma in Marathi, Vijay Sharma Marathi Mahiti, Vijay Sharma in Marathi

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.