मागच्या भागात आपण सुकन्या समृद्धी योजनेची प्राथमिक माहिती घेतली. या भागात आपण या योजनेच्या नियम व वैशिष्ठ्यांची माहिती घेऊया.
खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- मुलीचे जन्म प्रमाणपत्र
- पालकांचे ओळखपत्र आणि निवासी पुरावा
- एकाच वेळी एकाधिक (जुळ्या किंवा तिळ्या) मुलींच्या जन्माच्या पुराव्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र
- पोस्ट ऑफिस किंवा संबंधित बँकांनी सांगितलेले इतर कागदपत्र.
नियम:
- एखाद्या मुलीच्या नावावर सुकन्या समृद्धी खाते उघडायचे असेल तर नैसर्गिक (जैविक) पालक किंवा कायदेशीर पालक यांच्याकडून उघडले जाऊ शकते.
- मुलीच्या जन्मापासून ती दहा वर्षांची होईपर्यंत मुलीच्या नावावर हे खाते उघडता येते.
- हे खाते पोस्ट ऑफिसमध्ये किंवा पीईफ सुविधा पुरवणाऱ्या बँकेत अथवा काही सरकारी बँकेत उघडता येते.
- संबंधित बँकेच्या सर्व शाखांमध्ये हे खाते उघडता येते का? याची एकदा खात्री करा. (स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय), एसबीएच, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, आंध्रा बँक, यूको बँक, इलाहाबाद बँक, कॉर्पोरेशन बँक इ. बँकांच्या शाखामध्ये ही सुविधा आहे). तसेच रिझर्व्ह बँकेच्या निर्णयानुसार आयसीआयसीआय बँक व ऍक्सिस बँक या खाजगी बँकांमध्येही हे खाते उघडता येते.
- पूर्वी खाते उघडण्यासाठी कमीतकमी १०००/- रू. प्रतिमहिना ही रक्कम कमी करून या वर्षी ही आरंभी रक्कम २५०रु. इतकी केली आहे.
- एका आर्थिक वर्षात दीड लाख रुपयांपेक्षा या पेक्षा जास्त रक्कम एका खात्यात जमा केली जाऊ शकत नाही.
- ठरवून दिलेली कमीतकमी रक्कम खात्यात जमा न केल्यास असे खाते अनियमित खाते जाहीर होते. ५०/- रु प्रती वर्ष असा दंड आकारून हे खाते पुन्हा सुरु करता येते.
- या खात्यात तुम्ही रोख किंवा डिमांड ड्राफ्ट किंवा चेकच्या स्वरुपात जमा करू शकता. चेक किंवा डीडी ने रक्कम भरत असल्यास बँकेशी संपर्क साधून योग्य ती पद्धत वापरावी.
- सुकन्या समृद्धि खात्यावरील व्याज दर नुकताच (ऑक्टोबर-डिसेंबर २०१८) ८.१% वरून ८.५% इतका वाढवला आहे. मुलींना २१ वर्ष पूर्ण झाल्यानंतर खात्यातील रकमेवर कोणतेही व्याज मिळत नाही.
- दहा वर्ष पूर्ण झाल्यास मुलगी स्वतःच खाते चालवू शकते. तरीही अश्या खात्यात पालक प्रतिमहिना ठेवी जमा करू शकतात.
मॅच्युरिटी संदर्भातील नियम
- मुलीचे खाते तिच्या विवाहाच्या तारखेपासून बंद केले जाईल.
- जीवघेणा आजार किंवा तत्सम कोणत्याही कारणाने हे खाते पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर बंद करता येते. परंतु यावर सामान्य बचत खात्याचे व्याज मिळेल.
- खातेधारक मुलीचा अकाली मृत्यू झाला आणि तसे प्रमाणपत्राने प्रमाणित झाले तर खाते ताबडतोब बंद केले जाते. खातेधारकाच्या पालकांकडे खात्यात जमा असलेली रक्कम व्याजासह दिली जाईल.
योजनेमुळे कोणते कर लाभ होतात?
- सुकन्या समृद्धि खात्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला कारबचतीचा लाभ मिळतो.
- ज्याप्रमाणे, पीपीएफ, ईक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम आणि विमा योजनांमुळे तुमची करबचत होते तसेच या योजनेमुळेही कर बचतीचा फायदा होऊ शकतो.
- या गुंतवणूकीतून जमा होणारी रक्कम अधिक व्याज अशा एकूण मोबदल्यावर तुम्हाला कोणताही आयकर भरावा लागणार नाही. ही करसुट मिळते.
- कलम ८०सी अंतर्गत, सुकन्या समृद्धि खात्यावर तुम्हाला प्रतिवर्ष दीड लाख रुपयांच्या मर्यादेपर्यंत करकपातीचा लाभ मिळतो.
(चित्रसौजन्य: https://bit.ly/2AQZoW7 )
काय आहे प्रधानमंत्री मुद्रा योजना? , आयुष्मान भारत योजना नक्की आहे तरी काय?
प्रधानमंत्री वय वंदन योजना (PMVVY), सुकन्या समृद्धी योजना – भाग १
आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला [email protected] वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर’ या नावाने सेव्ह करून ह्या नंबरवर ‘Hi’ असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)
Disclaimer: आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/ या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/ | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.