बँक एफडी वि. म्युच्युअल फंड

Reading Time: 4 minutes आपण सर्व जण बँकेच्या एफडीमध्ये नियमित गुंतवणूक करत असतो. बँकेच्या एफडीमधून मिळणारा निश्चित कालावधीसाठी निश्चित परतावा आपल्याला आश्वस्त करतो आणि त्यामुळे आपली ओढ बँकेच्या एफडी कडे अधिक असते.  बँकेच्या एफडी मध्ये गुंतवणूक करीत असताना आपल्याला दोन गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.

Moneycontrol – नव्या रूपातील गुंतवणूकदारांचा मितवा

Reading Time: 4 minutes एक गुंतवणूकदार म्हणून आपल्या गुंतवणुकीवर आपले लक्ष हवे. त्याची अधिकृत माहिती मिळवण्याचे पुस्तके, अहवाल, संकेतस्थळे, मोबाईल अँप यासारखे अनेक मार्ग आहेत. त्यापैकी  Moneycontrol हे सर्व उपयुक्त माहितीचे सर्वसमावेशक अँप आहे. हे अँप म्हणजे गुंतवणूकदारांचा मित्र, तत्वज्ञ, वाटाड्या अशा अर्थाने ‘मितवा’ आहे असे मी म्हणतो. या अँपमध्ये  अनेक उपयोगी गोष्टी असून ते पूर्ण क्षमतेने वापरले तर अन्य कोणत्याही माहितीची गरज पडणार नाही. अनेकांना हे अँप शेअर, म्युच्युअल फंड युनिटचे भाव पाहण्याचे आहे असे वाटते. यापलिकडे त्याचा कसा वापर करावा याची माहितीच नसते. अलीकडेच या अँपने आपला चेहरा मोहरा बदलल्याने थोडा गोंधळ होण्याची शक्यता आहे. तेव्हा थोडक्यात या अँपचा कसा उपयोग होऊ शकतो ते जाणून घेऊयात.

शेअर्स खरेदीचं सूत्र

Reading Time: 4 minutes गुंतवणूकदारांचे विविध प्रकार आपण यापूर्वी पाहिले आहेत यात गुंतवणूक कालावधीनुसार रोजच्या रोज व्यवहार करणारे ते डे ट्रेडर्स, मध्यम कालावधी साठी गुंतवणूक करणारे त्यांना पोझिशनल ट्रेडर्स, तर दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणाऱ्याना लॉन्ग टर्म ट्रेडर्स असे संबोधण्यात येते. आपल्या  जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार  गुंतवणूकदार व्यवहार करीत असतात.

शेअर बाजार : भारतीय गुंतवणूकदारांचे पुढचे पाऊल !

Reading Time: 4 minutes नव्या जगाने संपत्ती निर्मितीचा नवा खेळ तयार केला आणि त्याचे नियमही. तो खेळ आणि त्याचे नियम आपण स्वीकारलेच नसते तर शेअर बाजाराची एवढी चर्चा करण्याची गरजच नव्हती. पण तो खेळ आणि त्याचे नियम ही नव्या जगाची अपरिहार्यता बनली. हा खेळ त्या नियमांनुसार खेळणे, हे नव्या जगात बंधनकारक आहे. त्यामुळे आपल्याला आज शेअर बाजार किंवा भांडवली बाजाराची चर्चा करणे, क्रमप्राप्त झाले आहे.

शेअर्सची साधी बदलती सरासरी

Reading Time: 3 minutes शेअर्सच्या भावासंदर्भात प्रामुख्याने साधी बदलती सरासरी किंमत म्हणजेच सिंपल मुव्हिंग एव्हरेज (SMA) हा शब्दप्रयोग वारंवार बोलण्यात येतो. शेअर्सचा भाव किंवा बाजाराची दिशा दाखवणारी ही सोपी किंमत असून याद्वारे ट्रेडर्स बाजार किंवा विशिष्ठ शेअरच्या भावाचा अंदाज बांधू शकतात.

BSE – शेअर बाजारसाठी बीएसई ॲप

Reading Time: 2 minutes मुंबई शेअर बाजार (BSE) या आशियातील सर्वात जुन्या आणि जगात सर्वाधिक कंपन्यांचे व्यवहार होत असलेला शेअर बाजार असून बाजारातील घडामोडी गुंतवणूकदारांना समजाव्यात म्हणून BSE India या नावाचे अँप गुगल स्टोअरवर उपलब्ध आहे. नाविन्यपूर्ण अनुभव असे देणारे हे अँप असून मार्केट व्यवहाराशी संबंधित सर्वांनी ते आपल्याकडे ठेवणे जरुरीचे आहे.