महिन्याला २-३-५% टक्के हमखास मिळवा योजनांचा भांडा-फोड

Reading Time: 3 minutesमहिन्याला २-३-५% टक्के हमखास मिळवा आणि आपले जीवन आनंदी जगा. आधीच कमाई चे मार्ग कमी आणि खर्च जास्त असलेला मध्यमवर्गीय रिस्क न घेता आपल्या पदरात फायदा कसा पाडून घेता येईल याचा विचार करत असतो आणि मिळणाऱ्या हमखास नफ्याच्या आड बुद्धी गहाण ठेऊन गुंतवणूक करतो. तर, जाणून घेऊया या कंपन्या कशा चालतात आणि पुढे काय होते.

शेअर बाजार अर्थव्यवस्थेच्या पुढे का पळतो आहे?

Reading Time: 4 minutesभारतात वस्तूंची कमी झालेली मागणी आणि त्याच वेळी शेअर बाजाराची आगेकूच हे परस्परविरोधी वाटत असले तरी त्याचा आणि नव्या आर्थिक बदलांचा जवळचा संबंध आहे. काही मोठ्या कंपन्या याच काळात अतिशय चांगला महसूल मिळवीत आहेत तर छोट्या कंपन्या अडचणीत आहेत. या परिस्थितीत एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आपली भूमिका काय असली पाहिजे? 

शेअर मार्केट- लिस्टेड (सुचिबद्ध) कंपनी म्हणजे काय?

Reading Time: 2 minutesसर्व सामान्यपणे किंवा ढोबळ मानाने लिस्टेड कंपनीची व्याख्या, “ज्या कंपनीचे शेअर अधिकृतरित्या शेअर बाजारात विकले जातात, ती कंपनी म्हणजे लिस्टेड कंपनी.” लिस्टेड कंपनी म्हणजे सुचिबद्ध कंपनी! ज्या कंपनी विशिष्ट प्रकारच्या शेअर बाजारात समाविष्ट असतात, व्यापार करतात त्या म्हणजे लिस्टेड कंपनी. 

सध्या शेअर्स खरेदी करावी का?

Reading Time: < 1 minuteकाही विकत घेताय?? मग जरा नव्हे भरपूर सावधगिरी बाळगा. हे वाक्य यापूर्वी मी अनेकदा बोललोय. लोक थोड्याश्या जास्त व्याजाच्या आमिषाने आपले मुद्दलच धोक्यात घालतात

गुंतवणुकीच्या खेळातले सात नियम

Reading Time: 3 minutesसध्या शेअर बाजारातील हवा नरमगरम आहे, आर्थिक मंदीची चर्चा सुरू आहे आणि इक्विटी म्युच्युअल फंडांतील गुंतवणूकदार कपाळाला हात लावून बसले आहेत. “दोन-तीन वर्षे चालू ठेवलेल्या सिपमध्ये (SIP) नुकसान कसे काय दिसतेय?” असा जाबदेखील अनेक जण विचारत आहेत. काहींना आपले नशीब खराब वाटतेय, तर काहींना आपण फसवले तर गेलो नाही ना, याची शंका येतेय. म्युच्युअल फंडांतील गुंतवणूकदारांचा हा सगळा सार्वजनिक गोंधळ उडालेला आहे तो या खेळाचे नियम त्यांनी समजून घेतले नाहीत म्हणून.

शेअर बाजार: ये रिस्क, रिस्क है रिस्क, रिस्क!

Reading Time: 3 minutesशेअर बाजारात गुंतवणूक म्हणजे जास्तीची जोखीम. ही थिअरी आजकाल सर्वांना तोंडपाठ असते. मात्र बहुसंख्य गुंतवणूकदारांमध्ये ही जोखीम उचलायची तयारी फक्त बाजार वर जातानाच असते. बाजारात पडझड सुरु झाली की या लोकांची चुळबुळ सुरु होते. मार्केट पुन्हा कधी वर जाणार, पुन्हा जागतिक मंदी येणार का? अमक्या चॅनेल वर पुढील दोन वर्षे खराब जातील सांगितलं मग गुंतवणूक थांबवूया का? अशा विचारणा सुरु होतात. 

म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांच्या संयमाची कसोटी

Reading Time: 3 minutesइक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना आपला गुंतवणुकीचा कालावधी हा कमीत कमी ५ वर्षे किंवा जास्त असायलाच हवा. अल्पकालीन गुंतवणुकीसाठी इक्विटी फंडाचा विचार करू नये. गुंतवणूक करताना बाजारातील चढ उताराला न घाबरता इक्विटी फंडात दीर्घकालीन गुंतवणूक करावी. 

रिअल ईस्टेट वि.  शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड

Reading Time: 3 minutesभारतीय रिझर्व बँकेच्या २०१७ सालातील एका अहवालानुसार आपल्या देशातील सर्व व्यक्तींकडील वैयक्तिक संपत्तीचा ७६.९% भाग – म्हणजे तीन चतुर्थांशपेक्षा अधिक – हा रिअल इस्टेटमधे गुंतवलेला आहे. त्या खालोखाल ११% सोन्यातील गुंतवणूक आहे आणि अवघी ५% संपत्ती बँकेत किंवा निवृत्तीनिर्वाह निधीत आहे. आपल्याकडे पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या चाकोरीबद्ध गुंतवणुकीच्या सवयींचा हा परिपोष आहे.इथे हे नमूद करणे आवश्यक आहे की स्वतःच्या राहण्यासाठी घेतलेले घर हे वापरण्याच्या (Consumption) दृष्टीने घेतलेले असल्यामुळे तिला आपण ‘शुद्ध आर्थिक गुंतवणूक’ मानत नाही. राहण्यासाठी स्वतःचे घर असावे ही बहुतेकांची भावनिक गरज असते, तसेच कौटुंबिक स्वास्थ्य आणि स्थैर्याच्या दृष्टीने ते आवश्यक असते. त्यामुळे असे आपण राहते घर आणि इतर आर्थिक गुंतवणुकी यांची तुलना करू शकत नाही. या लेखांमधील विचार आर्थिक गुंतवणूक म्हणून घेतलेल्या रिअल इस्टेट किंवा घरांसाठी आहेत.

गुंतवणुकीची उद्दिष्टे, उत्साह अन् उल्हास

Reading Time: 3 minutesप्रत्यक्षात बघायला गेलं तर गुंतवणूक करणं किंवा त्यातून श्रीमंत होणं ही एक संथ आणि त्यामुळे कंटाळवाणी प्रक्रिया आहे. आपण नियोजनाचा प्लान बनवताना, आपली आर्थिक उद्दिष्टे निश्चित करताना कदाचित कोणी स्वप्नं बघू शकेल, आपण काय काय साध्य करू शकतो? याच्या शक्यता कोणाला रोमांचकारी वाटू शकतात. पण श्रीमंत होण्याच्या कल्पना आणि त्यासाठीची प्रक्रिया यात एक मोठा फरक असतो. तो प्लान प्रत्यक्षात उतरवण्याची प्रक्रिया संथ व संयत असते.

शेअर बाजारातील प्राणी

Reading Time: 3 minutesव्यक्ती तितक्या प्रकृती’ असे म्हटले जाते. कोणीही एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसारखी नाही. त्यामुळे त्यांची गुंतवणूक करण्याची सवय आणि गुंतवणुकीकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असणारच. त्यामुळेच त्यांच्या वर्तनावरून ही नावे दिली असावीत. अर्थात हीच नावे का दिली? ते अगदी ठामपणे सांगता येणार नाही. हे प्राणी म्हणजे बाजारात असलेल्या प्रवाहातील विशिष्ट  गटातील लोकांचा समूह आहे. बाजारातील तेजीचा संबध बैलाशी तर मंदीचा संबंध अस्वलाशी जोडल्याने आणि तेजी मंदीचे चक्र सातत्याने चालू असल्याचे या दोन प्राण्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. तेव्हा त्यांच्यासह काही अपरिचित पशु आणि पक्षी या प्रकारांच्या वर्तनांचा गंमत म्हणून मागोवा घेऊयात.