सध्या शेअर्स खरेदी करावी का?

20025825 - closeup image of businessman drawing 3d graphics
0 1,207

Get real time updates directly on you device, subscribe now.

Print Friendly, PDF & Email

रविवार आणि  त्यातच कोजागिरी, एका कौटुंबिक चर्चासत्रात सक्तीने सहभागी व्हावे लागले. शेवटी पडलो एक संसारी माणूस! कधीकधी ईलाज नसतो अशा गोष्टींना.

  • ‘दिवाळीची खरेदी’ या धोकादायक विषयाच्या चर्चेतील अति धोकादायक कलमांवर सर्वशक्तिमान स्री सदस्यांचे विचार मंथन चालू असताना, तेथे उपस्थित २/३ समदुःखी पुरुष मंडळींना बाजूला घेऊन ‘दिवाळखोरीचा कायदा’ या विषयावरील तरतुदी समजावून द्याव्या का? असा विचार माझ्या मनात येऊन गेला.

  • बराच वेळ गेल्यानंतर, धोक्याची पातळी ‘फराळाच्या पदार्थांची ऑर्डर…’ येथपर्यंत खाली आल्याने आणि दोन तासाच्या खेळानंतर ‘टी ब्रेक’ झालाच पाहिजे या नियमाची सवय असल्याने, आम्हा पुरुष मंडळींना रहावले नाही आणि ‘साजूक तुपातील जिलबी की स्पेशल मोतीचुर की अंगुर ..(की तीन्ही?)’  या विषयावरील चर्चेत मी हस्तक्षेप केला.

  • “जिलबी, मोतीचूर, बंगाली मिठाई आणि काही काही यांचे दर बघताच आहात, तर एक ‘रेट’ मी ही सांगूनच टाकतो”, मी नेहमीच्या आगाऊपणाने कडमडलो.

  • “वजन कमी करणे १५००+ रुपये /किलो..”, हे वाक्य ईतके मर्मभेदक असेल, असे मला वाटले नव्हते. या एका वाक्यानेच काही किलो मोतीचूर, जिलेबी आणि त्यापेक्षाही महत्वाचे म्हणजे ७/८ कप चहा यांचा जागेवरच वध केला.

  • विनोदाचा भाग सोडून देऊ मंडळी, काही विकत घेताय?? मग जरा नव्हे भरपूर सावधगिरी बाळगा. हे वाक्य यापूर्वी मी अनेकदा बोललोय. लोक थोड्याश्या जास्त व्याजाच्या आमिषाने आपले मुद्दलच धोक्यात घालतात, किंवा-

  • ९००/१००० रुपयाचा एखादा शेअर १४००/१५०० होण्यापेक्षा २०/३० रुपयांचा शेअर ५० रुपये होणे जास्त सोपे, या (तद्दन चुकीच्या) आशावादामुळे  एखाद्या ब्लु- चीप शेअरपेक्षा एखादा पेनी स्टॉक विकत घेऊन मग पश्चात्ताप करतात.

  • केवळ १० रुपये NAV आहे म्हणुन एखाद्या म्युचुअल फंडाची नवीन योजना (NFO) विकत घेणे, हाही ‘शुद्ध तुपातील मुर्खपणाच’ आहे.

– प्रसाद भागवत 

9850503503.

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.