कर्ज परतफेड -कर्जमाफी नाही, तर सवलत !

Reading Time: 2 minutes रिझर्व बँकेचे अलीकडील ‘अर्थव्यवस्थेस गती देणारे निर्णय व त्याचे परिणाम’ यातील कर्ज परतफेड निर्णयाबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असून याबाबत पत्रकात असलेली असंधिग्ध वाक्यरचना, त्याचे वेगवेगळ्या लोकांनी काढलेले अर्थ आणि समाज माध्यमात प्रसारित होणाऱ्या उलटसुलट बातम्या यामुळे यातील घोळ अजून वाढत असल्याने यासंबंधी योग्य ती माहिती नक्की काय आहे व त्याचा नेमका काय परिमाण होतो ते पाहुयात.

कर्ज घेतलंय? व्याजदर तपासा!

Reading Time: 3 minutes गृहकर्ज घेऊन वर्षानुवर्षे ईएमआय (EMI) भरत असणाऱ्या अनेक ग्राहकांना आपण किती दराने व्याज भरतोय याचाच विसर पडतो. बाजारात किती दर चालु आहे किंवा आपले क्रेडिट रेटिंग अथवा सिबिल (CIBIL) काय आणि त्यानुसार आपल्याला किती कमी दर मिळू शकतो, किंबहुना अशा कमी दरामुळे दीर्घकाळात केवढा फायदा पदरात पडतो, याची माहिती शोधण्याची तसदी फार कमी लोक घेतात.

गृहकर्ज परतफेडीचे विविध पर्याय

Reading Time: 4 minutes आपल्या घरकुलाचे स्वप्न घेऊन अनेक जणांनी गेल्या आठवड्यात ‘बीकेसी’तील स्थावर मालमत्ता प्रदर्शनास भेट दिली. तिथे मुंबई ग्राहक पंचायतीने, ग्राहक जागृती आणि शिक्षणासाठी जे दालन सजवले होते, त्याचा लाभ अनेकांनी घेतला. प्रश्न विचारले समस्या सांगितल्या. मालमत्तेच्या किमती पाहता कर्जाशिवाय मालमत्ता खरेदी करणे जवळपास अशक्यच आहे. असे गृहकर्ज देणाऱ्या कंपन्या, बँका, एकसमान मासिक हप्त्याने कर्ज फेडण्याशिवाय कर्ज परतफेडीचे विविध पर्याय उपलब्ध करून देत आहेत त्यातील फरक आणि बारकावे समजले तर निर्णय घेण्यास मदत होऊ शकते. तेव्हा या पर्यायांचा तुलनात्मक आढावा घेण्याचा हा प्रयत्न.       

कर्जमुक्त कसे व्हावे? – भाग ३

Reading Time: 4 minutes तुमची सगळ्यात जास्त काळजी घरातल्या सख्ख्या लोकांपेक्षा कर्ज देणाऱ्या सावकाराला असते. त्याचबरोबर कर्ज परतफेड करायची चिंता भरपूर कर्ज घेतलेल्यांना सुद्धा असते. आर्थिक स्वातंत्र्य प्राप्तीसाठी लवकरात लवकर कर्जमुक्त होणे आवश्यक आहे.  या कर्जमुक्तीच्या लेखमालेतील हा तिसरा लेख ! मागील भागापर्यंत आपण कर्जमुक्तीसाठी  एकूण ४ कृती बघीतल्या होत्या. आता या भागात कृती क्रमांक ५ व कृती क्रमांक ६ पाहूया.

कर्जमुक्त कसे व्हावे – भाग २

Reading Time: 4 minutes कर्जमुक्तीसाठी नेमके काय करावे? हा प्रश्न नेहेमी सर्वांना पडलेला असतो. त्याचाच वेध घेणाऱ्या लेख मालिकेतील हा दुसरा लेख. खर्च करण्यासाठी किंवा एखादी मालमत्ता विकत घेण्यासाठी आपल्याकडे पुरेसे पैसे नसतील तर बँकांकडून कर्ज घेतले जाते. याबदल्यात मासिक परतफेड मात्र व्याजासहित करावी लागते.“आपल्याला गरज आहे म्हणून कर्ज घ्यायचे की बँक कर्ज देते आहे म्हणून आपल्या अनावश्यक गरजा वाढवायच्या?”  याचा विचार न करता घेतलेले कर्ज तुम्हाला “कर्जबाजारी” बनवते.