म्युच्युअल फंड संबंधित काही रोचक माहिती
Reading Time: 2 minutesआपण अजूनही ठराविक व्याज देणाऱ्या टर्म डिपॉजिट मध्ये गुंतवणूक करता का? मग थांबा हे वाचा, जरा विचार करा आणि म्युच्युअल फंडाच्या योजनांमध्ये दीर्घकाळासाठी गुंतवणूक करा. म्युच्युअल फंड म्हणजे फक्त शेअर बाजार हे चुकीचे आहे. म्युच्युअल फंड मध्ये तब्बल ३६ प्रकारच्या योजना असतात. त्यातील १६ योजना शेयर बाजाराशी अजिबात संबंधित नसतात. आपल्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार योग्य म्युच्युअल फंड योजना निवडा.आपली संपत्ती पुढील ३० वर्षात ३० पट बनवण्यासाठी आपली गुंतवणूक फक्त १२% चक्रवाढ व्याजाने वाढीची आवश्यकता आहे. हे शक्य होऊ शकते म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीतून.