Rakesh Jhunjhunwala: राकेश झुनझुनवाला – भारतीय शेअर बाजारातील बादशाह

Reading Time: 3 minutesघरात मित्रांबरोबर शेअर्स, स्टॉक मार्केट बद्दलच्या गप्पा लहान मुलाच्या कानावर पडतात आणि तो मुलगा आपल्या वडिलांना विचारतो की शेअर्सच्या किमती का बदलतात, त्याच्यावर त्याचे वडील त्याला उत्तर द्यायचे न टाळता सांगतात की, “जा, वर्तमानपत्रामध्ये ग्वालियर-रेयॉन बद्दल काही बातमी आली आहे का बघ आणि असेल तर त्याच्या शेअर्सची किंमत नक्कीच बदलणार!” या एका वाक्यावरून त्या मुलामध्ये शेअर मार्केटबद्दल उत्सुकता निर्माण होते आणि एक दिवस तो याच शेअर मार्केटचा राजा बनतो.अगदी फिल्मी वाटणारी ही खरी गोष्ट आहे, एका सर्वसामान्य भारतीय कुटुंबातील राकेश झुनझुनवाला यांची.

संकटकाळातील आर्थिक नियोजन

Reading Time: 3 minutesवर्षांची सुरुवातच, बहुतेक सर्वच क्षेत्रात कमी झालेल्या मागणीने झाली. यानंतर जे आरोग्य संकट आले त्याचे रूपांतर आर्थिक संकटात कधी झाले ते समजलेच नाही. या संकटकाळातील आर्थिक नियोजन करताना अनेक गोष्टींचा पुनर्विचार आवश्यक आहे. यापुढे नव्याने आर्थिक नियोजन अधिक काळजीपूर्वक करायला हवे, त्याची पूर्वतयारी लगेचच करायला हवी. यात काही चुकी झाल्यास त्याचा आणखी मोठा फटका आपल्याला बसू शकतो.

अमेरिका-चीनमधील तणावाचे बाजारावरील परिणाम

Reading Time: 2 minutesअमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला नुकसान पोहोचवण्यासाठी चीनने ही महामारी पद्धतशीरपणे रुजवल्याचे पुरावे असल्याचे अमेरिकेचे सेक्रेटरी ऑफ स्टेट यांनी स्पष्ट केले. अमेरिका आणि चीन या जगातील दोन सर्वात मोठ्या आर्थिक शक्तींमध्ये तणावातून युद्ध भडकले असताना सोमवारी स्पॉट गोल्डच्या किंमतीत ०.१४ टक्क्यांनी वाढ झाली. आजच्या लेखात आपण अमेरिका-चीनमधील तणावाचे शेअर बाजारावर झालेल्या परिणामांची माहिती घेऊया.

गुंतवणुकीची ८ प्रमुख कारणे

Reading Time: 3 minutesवॉरन बफे यांच्या मते, गुंतवणुकीचे फायदे आज नाही भविष्यात दिसून येतात, म्हणून वेळीच गुंतवणुकीची सुरुवात केल्याने ठराविक आर्थिक शिस्त लागते. भविष्याचं नियोजन करता येतं. सर्व लोक समान पर्यायांचा विचार करीत नाहीत. प्रत्येकाचे विचार, गुंतवणुकीची कारणे आणि उद्दिष्ट्ये वेगळी असतात.  आपण या लेखात गुंतवणुकीची प्रमुख कारणे पाहणार आहोत. 

म्युच्युअल फंड सही कितने?

Reading Time: 3 minutesम्युचुअल फंड गुंतवणूक करताना त्यातील धोके नेहमीच समजून घेणे आवश्यक आहे. गेले काही दिवस मी विविध लेखातून तुलनात्मक दृष्ट्या सुरक्षित, मुदत ठेवीस पर्याय समजले जाणारे, आयकराच्या दृष्टीने करदेयता कमी करणारे असे बहुगुणी ‘डेट फंड’, भविष्यात त्यांनी गुंतवलेल्या कर्जरोख्यातून व्याज, मुद्दल न मिळण्याच्या शक्यतेने अधिक धोकादायक ठरतील असा अंदाज केला होता. 

फ्रॅंकलिन टेम्पल्टन इंडिया – जरा चुकीचे, जरा बरोबर…

Reading Time: 3 minutesशुक्रवारी फ्रॅंकलिन टेम्पल्टन इंडिया म्युच्युअल फंड या आघाडीच्या घराण्याने त्यांच्या रोखे गटातील ६ योजना स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गुंतवणूकदार धास्तावले आहेत. आजवर पतसंस्था, बँका ठेवीदारांचे पैसे देत नाही, हे सर्वसामान्य लोक ऐकून होते. पण सर्वोत्तम तरलता देणारी गुंतवणूक म्हणजे म्युच्युअल फंड अशी बिरुदावली असलेल्या योजना जेव्हा लॉक डाऊन होऊ लागतात तेव्हा सामान्य गुंतवणूकदाराने काय करावे?

पुन्हा एकदा सुरक्षित गुंवतणुकीकडे कल, पिवळ्या धातूची चमक कायम !

Reading Time: 2 minutesकोव्हिड-१९ या आजाराचा विळखा वाढत जातोय, त्यामुळे अशा वातावरणात तीव्र झटका टाळण्यासाठी गुंतवणूकदार कमोडिटीजबाबत आक्रमक खेेळी करणे टाळत आहेत. सर्वच मोठ्या देशांनी अर्थव्यवस्थेत सुधारणा आणण्यासाठी उपाययोजना केली असली तरी सर्व औद्योगिक कामकाज सुरळीत सुरु होण्यासाठी काही कालावधी लागेल, असा विश्वास गुंतवणूकदारांना वाटतोय.

दिवस असे की कोणी माझा नाही….

Reading Time: 4 minutesकोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनसंपदा टिकली पाहिजे याला प्राथमिकता देऊन सरकारने टाळेबंदी लागू केली आहे. परंतु कोरोना नावाचा इंडिकेटर बाजारात गुंतवणूकदारांची धनसंपदा अस्थिर करत आहे. खरंतर समभाग गुंतवणूक म्हणजे अस्थिरता आलीच. अशा परिस्थितीत दीर्घ मुदतीच्या गुंतवणूकदारांनी धास्तावून जाण्याची गरज नाही. परंतु ज्यांनी आपत्कालीन निधीची तरतूद न करता दीर्घ मुदतीची गुंतवणूक सुरु केली असेल, त्यांना दोनच पर्याय उपलब्ध होऊ शकतात. पहिला पैशांची तरलता हवी असल्यास भांडवली तोटा सहन करणे किंवा आहे ती गुंतवणूक थांबवून पैसे न काढणे.

लॉकडाऊन व अर्थव्यवस्थेतील अपरिहार्य बदल

Reading Time: 5 minutesलॉकडाऊन मध्ये अनेकांना नोकरी, व्यवसाय, आर्थिक नियोजन, गुंतवणूक, बचत याची काळजी आणि एकंदरीतच कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे येणाऱ्या नैराश्याने ग्रासलं आहे. अशा परिस्थितीमध्ये प्रसिद्ध बिझनेस कोच आणि मोटिवेशनल स्पीकर “चकोर गांधी” यांनी लॉक डाऊन मध्ये  बदललेल्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेऊन आर्थिक नियोजन व गुंतवणुकी संदर्भात मार्गदर्शन करणारा ऑडिओ आम्ही ऑडिओ आणि लिखित अशा दोन्ही स्वरूपात प्रकाशित करत आहोत. 

गुंतवणूकदारांचा म्युच्युअल फंडावरील प्रगल्भ विश्वास

Reading Time: 3 minutesमार्च महिन्यातल्या कोरोनाच्या आघाताने शेअर बाजार अगदी ३५% कोसळला तरी ही मार्च २०२० मधील समभाग योजनांमध्ये गुंतवणुकीचा ओघ वाढत राहिला. विशेष म्हणजे मार्च महिन्यातील शेवटचे ९ दिवस टाळेबंदी मध्ये गेल्यानंतर ही हा गुंतवणुकीचा ओघ, त्यांचा म्युच्युअल फंड वरील प्रगल्भ विश्वास दर्शवितो. गुंतवणूकदारांनी मार्च महिन्यातील शेवटच्या ९ दिवसात ऑनलाईन गुंतवणूक पद्धती अवलंबून पडत्या बाजारात जास्त युनिट्स मिळवण्यासाठी समभाग योजनांमध्ये गुंतवणूक केली.