Reading Time: 3 minutes

मार्च २०२० आर्थिक वर्ष सरले आणि गुंतवणूक विश्वाचे मागील वर्षाचा आढावा घेणारे अहवाल आता येऊ लागलेत. म्युच्युअल फंड क्षेत्राशी निगडित आकडेवारीचा आपण येथे आढावा घेऊ. 

  • गेल्या ४ वर्षात म्युच्युअल फंड क्षेत्रातील फंड घराणे/ वितरक / असोशिएशन ऑफ म्युच्युअल फंड ह्या सर्वानी गुंतवणूकदारांच्या केलेल्या प्रबोधनामुळे म्युच्युअल फंड सर्वाधिक पसंतीचा गुंतवणूक मालमत्ता वर्ग  ठरला. 
  • प्रबोधनाचे कार्य इतके प्रभावी झाले की शेअर बाजारातील जोखीम कशी कमी करायची / गुंतवणूक अधिक कर प्रभावी होण्यासाठी कोणते गुंतवणूक पर्याय स्वीकारायचे / पडत्या बाजारात गुंतवणूक वाढवून अधिक युनिट्स कसे मिळवायचे याबाबतचे मार्गदर्शन गुंतवणूकदारांना वेळोवेळी झाले.
  • गुंतवणूकदारही आपल्या गुंतवणूक अनुभवातून अधिक प्रगल्भ झाले आहेत. जुन्या काळातील म्युच्युअल फंडाबद्दलची अनास्था आता बऱ्याच अंशी नाहीशी होऊन नवनवीन गुंतवणूकदार आता म्युच्युअल फंडात जोडले जात आहेत. 

कोरोना – अस्थिर शेअर बाजारात आपली एस.आय.पी सशक्त कशी कराल?

  • मार्च महिन्यातल्या कोरोनाच्या आघाताने शेअर बाजार अगदी ३५% कोसळला तरी ही मार्च २०२० मधील समभाग योजनांमध्ये गुंतवणुकीचा ओघ वाढत राहिला. विशेष म्हणजे मार्च महिन्यातील शेवटचे ९ दिवस टाळेबंदी मध्ये गेल्यानंतर ही हा गुंतवणुकीचा ओघ, त्यांचा म्युच्युअल फंड वरील प्रगल्भ विश्वास दर्शवितो. 
  • गुंतवणूकदारांनी मार्च महिन्यातील शेवटच्या ९ दिवसात ऑनलाईन गुंतवणूक पद्धती अवलंबून पडत्या बाजारात जास्त युनिट्स मिळवण्यासाठी समभाग योजनांमध्ये गुंतवणूक केली. 
  • साधारण ५-६ वर्षांपूर्वी ऑनलाईन गुंतवणूक करणाऱ्याचे प्रमाण अगदी नगण्य ०.५% होते ते आता १४% पर्यंत गेले आहे. जोडीला म्युच्युअल फंडाच्या गुंतवणूकदारांची दुपटीने वाढ झाली आहे. येणारा काळ हा सरकारच्या डिजिटल इंडिया स्वप्नपूर्तीसाठी पूरक असेल हे ही यातून अधोरेखित होते. 
  • मार्च २०२० महिन्यात म्युच्युअल फंडाच्या समभाग योजनांमध्ये तब्बल रु ११,४८४ कोटींची निव्वळ वाढ झाली.  
  • एएमएफआय (AMFI) ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार फेब्रुवारी २०२० अखेर म्युच्युअल फंडाची एकूण गंगाजळी रु. २७.२२ लाख करोड होती, मार्च २०२० अखेर ती रु. २२.२६ लाख करोड इतकी होती. 
  • प्रत्येक तिमाहीच्या शेवटी बँका आणि काही संस्थागत गुंतवणूकदार आपली गुंतवणूक काढतात व नवीन तिमाहीच्या सुरवातीला पुन्हा गुंतवणूक करतात. तसेच कोविड -१९ च्या भीतीने जागतिक शेअर बाजार साधारण ३५-४०% खाली आले. म्हणजेच म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचे बाजारमूल्य खाली आले त्यामुळे म्युच्युअल फंडाच्या मार्च अखेरीला गंगाजळीत घट झालेली दिसते. मात्र एकंदर सर्वसामान्य गुंतवणूकदारांचा गुंतवणुकीचा ओघ वाढता राहिला.  
  • समभाग योजनांतील मार्च’२० महिन्यातील गुंतवणुकीचा ओघ हा फेब्रुवारी’२० महिन्यातील गुंतवणुकीपेक्षा ७% जास्त राहिला. सर्वसाधारणपणे दरवर्षी मार्च महिन्यामध्ये म्युच्युअल फंडाच्या ईएलएसएस (ELSS) कॅटेगरी मध्ये कलम ८०C अंतर्गत कर बचतीसाठी मोठी गुंतवणूक होते. 

कोरोना, शेअर बाजार आणि एसडब्लूपी गुंतवणूक

  • मार्च २०१९ मधील ईएलएसएस गुंतवणूक ही साधारण रु. २७४२ करोड इतकी होती, मात्र मार्च २०२० महिन्यातील ईएलएसएस गुंतवणूक रु.१५५१ करोड इतकी राहिली. ताळेबंदीमुळे बऱ्याच जणांना ईएलएसएस गुंतवणूक मार्च महिन्यात करता आली नाही, आता सरकारने ही मुदत वाढवून जुन २०२० पर्यंत केल्याने ईएलएसएस कॅटेगरी मध्ये येणाऱ्या २ महिन्यात गुंतवणूक वाढेल.    
  • गुंतवणूकदारांच्या सर्वाधिक पसंतीच्या एसआयपी सुविधेमार्फत म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांचा आलेख चढता राहिला. 
  • मार्च महिन्यातील शेअर बाजाराच्या आपटीनेही गुंतवणूकदार डगमगले नाहीत, त्यांनी आपल्या प्रगल्भतेचे दर्शन घडवले. नवीन गुंतवणूकदारांनी ही धैर्य दाखवून आपल्या एसआयपी चालू केल्या. 
  • मार्च २०२० मधील फक्त एसआयपी मधून येणारा गुंतवणुकीचा ओघ हा विक्रमी रु. ८६४१ करोड इतका राहिला. 
  • पूर्ण आर्थिक वर्षात फक्त एसआयपी द्वारे म्युच्युअल फंडात रु. १,००,०८४ करोड गुंतवणूक आली. मागील आर्थिक वर्ष २०१८-१९ ( रु. ९२,६९३ करोड) पेक्षा ती साधारण ८% अधिक राहिली. 
  • ह्याच काळात एसआयपी गुतंवणूकदारात साधारण १९% ने वाढ झाली, म्हणजेच नवीन गुंतवणूकदार झपाट्याने म्युच्युअल फंडाकडे जोडले जात आहेत. 
  • मागील इतिहास पहिला तर २०१६-१७ च्या आर्थिक वर्षात एसआयपी मधून आलेली गुंतवणूक रु. ४३,९०० करोड होती, ह्या आर्थिक वर्षाच्या शेवटी ती रु. १ लाख करोड पार झाली. साधारण ३.१२ करोड इतके गुंतवणूकदार दरमहा एसआयपी द्वारे गुंतवणूक करतात. 
  • गेल्या आर्थिक वर्षात सरासरी ९.९५ लाख नवीन गुंतवणूकदार दरमहा म्युच्युअल फंडाच्या एसआयपी मार्फत जोडले गेले  ज्यांची सरासरी एसआयपी रु २७५० ची आहे. सर्वसामान्य गुंतवणूकदार इतक्या मोठ्या संख्येने जोडले जाणे, ही आर्थिक साक्षरतेच्या दृष्टीने खूप महत्वाची बाब आहे.  
  • मार्च २०२० महिन्यातील बाजाराच्या पडझडीत विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी तब्बल रु. ६५,३७१ करोडची गुंतवणूक काढून घेतली, मात्र म्युच्युअल फंडांनी रु. ३२,४४८ करोड ची समभागांमध्ये गुंतवणूक करून बाजार काही प्रमाणात सावरण्यास मदत केली.  
  • म्युच्युअल फंडाची बाजाराच्या खालच्या पातळीवरील गुंतवणूक येणाऱ्या काळात जेव्हा विदेशी गुंतवणूकदार बाजारात परततील तेव्हा म्युच्युअल फंडाच्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळवून देतील. 

कोरोना, कोसळणारा शेअर बाजार आणि सामान्य गुंतवणूकदार !

म्युच्युअल फ़ंडाच्या गुंतवणूकदारांनी दाखवलेला प्रगल्भ विश्वास भारतीय शेअर बाजाराला आणि पर्यायाने त्यांच्या गुंतवणुकीला नक्कीच नवीन उंचीवर घेऊन जाईल. 

आता खऱ्याअर्थाने म्युच्युअल फंड सही है..

(म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजार जोखिमेच्या अधीन असते. योजनेसंबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.)

धन्यवाद !

– निलेश तावडे

(लेखक हे म्युच्युअल फंड मध्ये २० वर्ष  कार्यरत होते , सध्या ते आर्थिक नियोजनकार आहेत.)

९३२४५४३८३२,

[email protected] 

www.nileshtawde.com  

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer:आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/ 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…