कोरोना – लॉकडाऊनच्या काळात या ८ आर्थिक गोष्टी अवश्य करा

Reading Time: 3 minutesकोव्हिड-१९ या जीवघेण्या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने २१ दिवसांच लॉकडाऊन जाहीर केले आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा आणि मृतांचा आकडा लक्षात घेता, हे लॉकडाऊन अजून वाढवण्यात आले आहे. हा वेळ म्हटलं तर सक्तीचा आणि कंटाळवाणा वाटू शकतो आणि म्हटलं तर याचा सदुपयोगही करता येऊ शकतो. वेबसिरीज, सिनेमे यामुळे वेळ छान जातही असेल, पण या काळात काही आर्थिक नियोजन करता येतं का? याकडेही लक्ष देऊ या.  या लॉकडाऊनच्या काळात, कोणत्या आर्थिक बाबी पहायला हव्यात, याबाबत या लेखातून जाणून घेऊ. 

बँक व्यवहारांसाठी २७ महत्वाच्या टिप्स

Reading Time: 3 minutesडिजिटलायझेशनच्या जमान्यात ऑनलाईन बँकिंग वाढत चालले आहे. पेटीएम, गुगल पे, फोन पे आणि एकूणच नेट बँकिंगचा वापर मोठया प्रमाणात होत आहे. पण सायबर क्राईम, फेक कॉल्स यांचेही प्रमाण वाढत चालले आहे. याशिवाय बँकेसंदर्भात ततक्रारींचं प्रमाणही वाढत चाललं आहे. त्यामुळे बँक व्यवहार करताना योग्य ती काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे.

आजची ‘मंदी’ आणि धोरणात्मक बदलांची संधी!

Reading Time: 6 minutesजीवनाचा प्रचंड वाढलेला वेग, कागदी नोटांच्या चलनाच्या आधारे मोजक्या लोकांकडे जमा झालेले राक्षसी भांडवल आणि जागतिकीकरणाच्या रेट्याने संघटीत होणारे उद्योग व्यवसाय ज्या प्रकारचा बदल आज जगात घडवून आणत आहेत, त्याचेच दुसरे नाव मंदी आहे. पण मंदीच्या नावाने खडे फोडण्यापेक्षा हा बदल समजून घेण्यात आणि त्यानुसार आपल्यात बदल करण्यातच शहाणपणा आहे. कारण जगात होऊ घातलेला बदल कोणीच रोखू शकलेले नाही! 

१ सप्टेंबरपासून बदललेले आयकराचे ८ महत्वपूर्ण नियम तुम्हाला माहिती आहेत का?

Reading Time: 2 minutesबँक नियमांपाठोपाठ आता करासंबंधित नवीन नियमांची अंमलबजावणीही सुरु करण्यात आली आहे. जुलै २०१९ च्या अर्थसंकल्पात करासंदर्भात काही नियमांमध्ये बदल करण्यासंदर्भात घोषणा करण्यात आली होती. हे नियम संसदेत प्रस्तावितही करण्यात आले होते. परंतु आता हे बदल याच म्हणजेच सप्टेंबर २०१९  पासून लागू करण्यात आले आहेत.

बँक व्यवहार, परदेशी सहली आणि वीज बिल ठरवणार तुमचा ‘आयटीआर’

Reading Time: 2 minutesकर हा शासनाच्या उत्पन्नाचा सर्वात महत्वाचा मार्ग आहे. आपला कर प्रामाणिकपणे भरणे हे प्रत्येक करदात्याच्या कर्तव्य आहे. अर्थात कायदेशीर मार्गाने करबचत करणाऱ्या गुंतवणूक पर्यायांचा वापर करणे हा गुन्हा नाही तर अधिकार आहे. परंतु बेकायदेशीर मार्गाने काहीतरी जुगाड करून करदायित्व टाळणाऱ्या तमाम ‘करबुडव्यांना’ चाप बसण्यासाठीच्याउपाययोजना करून, त्यांना ताळ्यावर आणण्याच्या दृष्टीने  या अर्थसंकल्पातही तरतूद करण्यात आली आहे.

बँकेच्या वैशिष्टयपूर्ण सवलतींची आपणास माहिती आहे का?

Reading Time: 3 minutesकोणतीही सेवा-सुविधा समाजातील सर्व घटकापर्यंत पोहोचायला हवी, हे सामाजिक न्यायाचे महत्त्वाचे तत्व आहे. यामध्ये आर्थिक व्यवहारांची सुलभता हा ग्राहक म्हणून आपला हक्क आहे. अनेकदा असे होतं की खास ग्राहकांसाठी काय सोई सुविधा आहेत हेच त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. ज्यांनी त्या दिल्या पाहिजेत त्यांना त्यात विशेष स्वारस्य अथवा जबाबदारीची जाणीव नाही. बँकिंग व्यवहार करताना अशा कोणत्या सोई सवलती खास ग्राहकांना उपलब्ध आहेत याची माहिती घेऊयात.