सरकारी अल्प बचत योजनांचे दर १% पेक्षा अधिक खाली

Reading Time: 5 minutesकोविड-१९ आपत्तीचा सामना करण्याकरिता सरकारने आर्थिक उपाय योजना जाहीर केल्या, त्याच बरोबर आरबीआयने रेपो व्याज दर खाली आणून ४.४०% पातळीवर आणले. ह्याचा उद्देश एकच की बँकांना आणि व्यवसायांना आवश्यक निधी स्वस्तात उपलब्ध व्हावा जेणे करून आपत्तीच्या काळात त्यांच्याकडे आवश्यक तरलता राहील. आरबीआयने आपले रेपो व्याज दर कमी केल्यावर आता बँकाही आपले टर्म डिपॉजिटचे दर कमी करतील त्याच बरोबर ज्यांनी गृहकर्ज घेतले असेल त्यांचे व्याज ही कमी होऊन त्यांना दिलासा मिळेल. मात्र जे गुतंवणूकदार आतापर्यंत फक्त जोखीम नसलेल्या बँकेच्या टर्म डिपॉजिट मध्ये गुंतवणूक करीत आले त्यांना आता गुंतवणुकीचे दुसरे पर्याय पाहावे लागतील. 

गुंतवणुकीचे विविध पर्याय – भाग १

Reading Time: 3 minutesगुंतवणूक हा शब्द वरवर जरी खूप सोपा वाटत असला तरी प्रत्येक व्यक्तीला आपल्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार तसेच आपल्या भावी गरजांनुसार योग्य त्या गुंतवणूक पर्यायांचा विचार केला पाहिजे. सामान्य गुंतवणूकदार सहसा योग्य नियोजन न करता काहीवेळा झटपट श्रीमंत होण्याचा हव्यासापोटी फसवणुकीच्या योजनांना बळी पडतात व आपले मुद्दलही गमावून बसतात. गुंतवणूकदारांनी अशा कोणत्याही फसवणुकीला बळी न पडता आपल्यासाठी योग्य गुंतवणूक पर्याय निवडावा ह्या हेतूने आपल्याला उपलब्ध असलेले गुंतवणूक पर्याय पाहूया.