शेअर बाजाराचा आणि देशाच्या विकासाचा काही संबंध आहे?
Reading Time: 4 minutesउत्पादन आणि सेवांमध्ये भारताने आत्मनिर्भर व्हावे, यासाठी व्यापक प्रयत्न सुरु आहेत. स्वस्त भांडवलाच्या उपलब्धतेला त्या प्रयत्नांत अतिशय महत्व आहे. भारतात भांडवल स्वस्त होण्यासाठी भारतीयांच्या गुंतवणुकीच्या सवयीत काही बदल होण्याची गरज आहे. त्या बदलांकडे केवळ जोखीम म्हणून न पाहता विकासासाठीची अपरिहार्यता म्हणून पाहण्याची हीच वेळ आहे.