श्रीमंतीची ‘वही’वाट

Reading Time: 3 minutesआता मुलांच्या शाळा सुरु होणार म्हणजे खर्चांना सुरुवात होणार. खरतर शिक्षणासाठी केलेला खर्च म्हणजे गुंतवणूक असली पाहिजे. परंतु सध्याच्या शैक्षणिक बाजारात ही गुंतवणूक कायम आर्थिक ताळेबंदाच्या तुटीकडे जात असल्यामुळे सगळेच पालक चिंतीत आहेत. आज आपण बचतीच्या सवयी व उत्पन्नाची विभागणी या मुद्द्यांवर चर्चा करू.बचतीच्या सवयी ढोबळपणे ४ प्रकारे नोंदविल्या जाऊ शकतात.

श्रीमंत मी होणार!

Reading Time: 4 minutesगुंतवणुकीच्या माध्यमातून श्रीमंत होणं ही वेळखाऊ आणि कंटाळवाणी प्रक्रिया आहे. त्यात जर आपल्याला काहीतरी थरार किंवा ‘एक्साईटमेन्ट’ची अपेक्षा असेल तर ती योग्य नाही. मात्र लवकर श्रीमंत व्हायची घाई प्रत्येकालाच झालेली असते. कधी एकदा जादूची कांडी फिरतेय आणि मी श्रीमंत होतो असे झालेले असते. मात्र महामार्गांवर जागोजागी लावलेली ‘अति घाई, संकटात नेई’ सूचना इथेही लागू होते. आपल्या आर्थिक उन्नतीच्या स्वप्नाला फुंकर घालून, भुलवून, परताव्याविषयी अवास्तव, फसवी आश्वासने देऊन आपल्याला अजूनच नुकसानीत घालणाऱ्या गुंतवणूक योजनांची या जगात काही कमतरता नाही. मल्टी-लेव्हल मार्केटींग किंवा पिरॅमिड योजना या त्यातल्या प्रमुख योजना.

काटकसरीचे कानमंत्र भाग २

Reading Time: 3 minutesप्रत्येक श्रीमंत व्यक्तीचा काटकसरीच्या मार्गानेच धनोढ्य झाला आहे असे नाही. वेगवेगळ्या अनैतिक मार्गांनीदेखील संपत्ती मिळवता येते, पण ही श्रीमंती क्षणिक असते. ज्या गतीने पैसा येतो त्याच गतीने पैसा जातो देखील. सावकाश येंणारी श्रीमंती मात्र काटकसरीच्या सवयीने येते आणि दीर्घकाळ टिकते. जास्त पैसा असणे म्हणजे जास्त खर्च करणे या पेक्षा जास्त बचत करणे असे समीकरण असेल तर ती श्रीमंती टिकते. नाहीतर पत्त्याचा बंगला कोसळावा तशी सर्व संपती क्षणात नाहीशी होते. आपली श्रीमंती टिकवण्यासाठी श्रीमंत काही सवयी अंगी बाळगतात ज्यांना अंगीकार सगळ्यांनीच करायला काही हरकत नाही.

काटकसरीचे कानमंत्र भाग १

Reading Time: 2 minutesआपण देशतील, जगातील श्रीमंत लोकांकडे पाहतो आणि सहज विचार येतो की, हे श्रीमंत आहेत कारण यांचे पूर्वज श्रीमंत होते किंवा त्यांनी पुढच्या पिढ्या श्रीमंत व्हाव्यात याची सोय खूप पूर्वीच करून ठेवली होती. आपण श्रीमंत नाहीत कारण आपल्या आधीच्या पिढ्यांनी आपल्यासाठी फार कोट्यवधी रुपये कमवून ठेवले नाहीत. पण हे साफ चूक आहे. कित्येक श्रीमंतानी शून्यातून विश्व निर्माण केलं आहे. श्रीमंत होण्यासाठी पूर्वापार संपत्ती किंवा लॉटरीच तिकीट किंवा खजिना सापडावा लागत नाही. गरज आहे ती काही सवयी स्वतः मध्ये रुजवण्याची. मग दहा बाय दहा च्या खोलीत राहणारा आणि महिना १०,००० रुपये कमावणारा माणूस देखील बिलगेट्स, अंबानी, आदानी होऊ शकतो. जाणून घ्या श्रीमंत माणसांचे बचतीचे कानमंत्र.