लॉकडाऊनच्या काळात स्वत:ला शांत व आनंदी कसे ठेवाल?

Reading Time: 2 minutes कोरोना या संसर्गजन्य रोगाने सगळीकडे निराशाजनक वातावरण निर्माण झाले आहे. मानवी आयुष्यात अनिश्चितता आली आहे. जगभरातील सर्व देश या परिस्थितीला तोंड देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे लढत आहेत.सतत त्याच त्याच गोष्टी ऐकून मनाचा गोंधळ होऊ शकतो. आयुष्यात १००℅ सुखी झालात तर मग ते आयुष्य कसलं, नाही का? पण या भयावह परिस्थितीत आपण शांत व आनंदी राहण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू शकतो. यासाठी खालील गोष्टी लक्षात घ्या. 

मानवजातीला केवळ अस्तित्वाच्या पातळीवर आणणारे संकट ! 

Reading Time: 3 minutes कोरोना विषाणू चीनमध्ये कसा उत्पन्न झाला, तो जगात आणखी किती जणांचे बळी घेणार, त्यामुळे जगाची अर्थव्यवस्था उध्वस्त होणार का, या साथीतून जगाची सुटका कशी होणार आणि सर्वात महत्वाचे म्हणजे घनतेचा (दर चौरस किलोमीटरला ४२५ माणसे) विचार करता जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या भारताचे या संकटात काय होणार, या चिंता सध्या प्रत्येकाला सतावत आहेत. मानवजातीला या अभूतपूर्व चिंतेतून दूर करण्यासाठी आणि जगाची चाके पुन्हा फिरण्यासाठी माणूस प्रयत्नशील आहे आणि त्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवून आपला नजीकच्या काही दिवसांचा दिनक्रम ठरविणे, एवढेच आज आपल्या हातात आहे. 

आर्थिक नियोजन – भाग ४

Reading Time: 3 minutes दरवर्षी जगभरात खाद्यपदार्थांच्या ३०,००० जाहिराती फक्त लहान मुलांना आकृष्ट करण्यासाठी बनविल्या जातात. यांत मग रेडी टू इट(फ्रोझन) पासून दुधातून घेण्याच्या सो कॉल्ड हेल्दी ड्रिंक्सपर्यंत या जाहिराती असतात. त्याचे विपरित परिणाम आता सर्वत्र जाणवू लागले आहे. ओबेसिटी (लठ्ठपणा) हा आजार आहे, हे आता जगन्मान्य झाले आहे. १९७५ साली १ कोटी बालकांना असलेला लठ्ठपणा हा विकार आज ११ कोटी बालकांना झाल्यावर त्याचे आजारात रुपांतर झाले आहे. आजच्या लेखात तुम्ही कुठल्या कंपनीचा आरोग्य विमा घ्यावा? यापेक्षा तो असणे आर्थिक नियोजनात किती महत्वाचे आहे, हे सांगणे जास्त उचित आहे असे मला वाटते. 

तुम्हाला कामात दिरंगाई करायची सवय आहे? मग हे वाचा

Reading Time: 3 minutes टीव्ही, मोबाईल याचा बरोबरीने २१ व्या शतकात लागणाऱ्या वाईट सवयींमध्ये अजून एक महत्वाची सवय म्हणजे- ‘चालढकल करणे’. आश्चर्य वाटेल पण ही मोठी समस्या आहे. “कल करे सो आज, आज करे सो अब” हा सुविचार म्हणून बरा वाटतो, पण वास्तवात मात्र आपण “आज करे सो कल करे, कल करे सो परसो” अशीच परिस्थिती आपल्या पैकी काही लोकांची असेल, त्यांना सांगणं गरजेचं आहे की ही एक धोक्याची घंटा आहे. तुमची दिरंगाई करण्याची सवय तुमचं आयुष्य बदलू शकते. त्यामुळे वेळीच सावध व्हा! तुम्हाला जाणून घ्यायचंय की दिरंगाई करणे का संकटाला आमंत्रण देण्यासारखे आहे तर हे नक्की वाचा-

व्यायाम का पैसा? तुम्ही काय निवडाल? 

Reading Time: 2 minutes पैसा आणि व्यायाम या दोन्ही गोष्टी एकमेकांवर काही प्रमाणात अवलंबून आहेत. साधारणतः जर पैसा आणि व्यायाम यापैकी कुठलीही एक गोष्ट निवडण्याचा विकल्प दिल्यास कुणीही पैसा निवडेल, कारण भौतिक गरजा पैशाशिवाय पूर्ण करणे अश्यक्य आहे. असे असले तरी  येल (Yale) आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठ मधील अहवालांमधून एक वेगळा निष्कर्ष समोर आला आहे. या अहवालनुसार पैशाच्या तुलनेत व्यायामामुळे माणूस जास्त आनंदी राहतो, आहे ना आश्चर्यकारक? शास्त्रज्ञांच्या मते, वर्षाला सुमारे १७,५०,००० रुपये कमावणाऱ्या व्यक्तीपेक्षा नियमित व्यायाम करणारी व्यक्ती जास्त आनंदी असते. 

अर्थसाक्षर कथा – संकट दुर्धर आजारांचे

Reading Time: 4 minutes आरोग्य खर्च ही समस्या अनेकांसमोर आवसून उभी असेल. त्यात आरोग्य विमा नसल्यामुळे अजिबातच आर्थिक मदत होत नाही. पण अशा परिस्थितीत घाबरून जाऊ नका.असाध्य किंवा गंभीर आजार, ऑपरेशन/ औषधोपचार करूनही काहीच फायदा न होता बळावत जाणारा आजार आणि त्यावर होणारा वारेमाप खर्च, अशा परिस्थितीत आरोग्य विमा नसल्यामुळे हतबल झालेला रुग्ण आणि रुग्णाचे नातेवाईक यांच्या मदतीला असतात त्या शासनाच्या विविध योजना व सेवादायी संस्था. या संस्था आर्थिक मदत तर करतातच, पण काही संस्था रुग्णाला व त्याच्या कुटुंबियांना पुनर्वसनासाठीही मदत करतात.