Browsing Tag
Income Tax
46 posts
आयकर: नवीन फॉर्म २६ / ए एस
Reading Time: 2 minutesआयकर विवरणपत्र अचूक भरण्याच्या दृष्टीने फॉर्म २६/ ए एस याचे महत्व आपल्याला माहीती आहेच. सन २०२०-२०२१ चा अर्थसंकल्प सादर करीत असताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या फॉर्म मध्ये सुधारणा करून तो वार्षिक कर विषयक पत्र स्वरूपात न राहता त्यात रियल इस्टेट, भांडवल बाजारातील व्यवहाराच्या माहितीचा समावेश असेल असे सांगितले होते.
“करोना” – यातील काही आपण विसरलोय का?
Reading Time: 3 minutesहा लेख प्रकाशित होईल तेव्हा हे आर्थिक वर्ष (Financial Year) संपायला ४/६ दिवस उरले असतील. रिझर्व्ह बँकेने आर्थिक वर्षाची मुदत वाढवली आहे म्हणजेच हे वर्ष जून २०२० ला संपून, पुढील वर्ष हे ९ महिन्यांचे असेल व ते ३१ मार्च २०२१ रोजी संपेल. त्यापुढील आर्थिक वर्ष एप्रिल ते मार्च असेल. हे लक्षात ठेऊन काही गोष्टी सर्वांनी अग्रक्रमाने करणे आवश्यक आहे याला मी ‘करो ना’ म्हणतोय, नाहीतर आर्थिक नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे, त्या कोणत्या ते पाहुयात.
अर्थसंकल्प २०२०-२०२१ एक दृष्टीक्षेप
Reading Time: 3 minutesअर्थसंकल्पातील महत्वाची तरतूद म्हणजे सध्या ऐच्छिक असलेली व पुरेशी स्पष्टता नसलेली त्यामुळेच किचकट झालेली, नवीन करप्रणाली, लाभांशावरील वितरण करकपात रद्द करून तो गुंतवणूकदारांच्या उत्पन्नात मिळवून त्यावर कर भरण्याची टाकलेली जबाबदारी आणि ठेव विमा कवचात केलेली वाढ, यामुळे होणारे परिणाम यावरील २ ते ३ स्वतंत्र लेख यानंतरच्या लागोपाठ येणाऱ्या आठवड्यात वाचूयात.
शेअरबाजार : गावा अर्थसंकल्प आला (२०२०)
Reading Time: 5 minutesकलम 80C ची वजावट गेली, त्यामुळे विमा कंपन्यांचे शेअर्स आपटले, anti Dumping Duty काढुन टाकल्याने रिलायन्स कोसळला. सिगारेटी महाग झाल्याने ITC चे पेकाट मोडले. परदेशी प्रवासावर कर लावला Indigo, Thomas Cook यांच्या विकेट पडल्या. एकुणात पानिपताचे ‘२ मोत्ये गळाली. २७ मोहरा हरवल्या. रुपे-तांब्याची गिनतीच नाही.’ हे वर्णन आठवावे अशी वेळ आली. जवळपास सगळेच सेनापती शिपायांसुद्धा गारद झाले.
शेअरबाजार: घर (कर्ज) पहावं ‘न’ फेडून…
Reading Time: 5 minutes‘काळ बदलला, हे आजकालचे परवलीचे वाक्य बहुतेकदा खरेही असणारे, पण कर्ज या शब्दाला चिकटलेली एकतर्फी नकारात्मक, अपराधी भावना आजही तितकीशी बदललेली नाही. हाच धागा पकडून कर्ज या संकल्पनेबद्दलचे गैरसमज दूर करता आले, तर पहावे या हेतूने हा शब्द्च्छल (आणि वाचकांचा छळ).
इन्कम टॅक्स रिफंड कधी आणि कसा मिळवाल?
Reading Time: 5 minutesआयकर परतावा भरून झाल्यावर आत अनेकजण रिफंडची रक्कम कधी जमा होणार, या विचारात असतील. अनेकदा कॅल्क्युलेशन चुकल्यामुळे किंवा घाईगडबडीत जास्तीचा ॲडव्हान्स टॅक्स भरला गेल्यास अथवा जादा टीडीएस कपात झाली असल्यास, आयकर विवरणपत्र (ITR) दाखल करून ही जास्तीची रक्कम आयकर विभागाकडून करदात्याला परत मिळते.
प्रमाणित वजावटीचे (Standard Deductions) काही नियम
Reading Time: 3 minutesव्यावसायिक लोकांना त्यांच्या व्यवसायाच्या अनुषंगाने कराव्या लागणाऱ्या अनेक प्रकारच्या खर्चांची सूट मिळते. छोट्या व्यापाऱ्यांना उलाढालीच्या ६ ते ८% हे उत्पन्न धरून, सल्लागार म्हणून व्यवसाय करणारे जसे डॉक्टर, वकील यांना ५० लाख रुपयांपर्यंत उलाढाल असल्यास, कोणत्याही प्रकारे हिशोब नोंदी काटेकोरपणे न ठेवता अर्धी रक्कम ही व्यवसायासाठीचा खर्च म्हणून दाखवता येतो.
आधार क्रमांकाच्या सहाय्याने आता मिळवा पॅनकार्ड !
Reading Time: 2 minutesजुलै २०१९ ला जाहीर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये अनेक नवीन नियम प्रस्तावित करण्यात आले होते. करवसुली, करबुडाव्यांना चाप, पारदर्शी व्यवहार ही प्रमुख उद्दिष्ट्ये डोळ्यासमोर ठेवून नियमांची आखणी करण्यात आली होती. आयकर विवरण पत्र म्हणजे आयटीआर (ITR) संदर्भात अनेक नवीन नियमांची भर पडली आहे. तसेच, पॅन आधार जोडणीही बंधनकारक करण्यात आली आहे.नवीन नियमांमुळे नागरिकांनी गोंधळून जायचे काहीच कारण नाही. कारण कोणत्याही परिस्थितीत नागरिकांची गैरसोय होऊ नये याचीही काळजी घेण्यात आली आहे.