Browsing Tag
investment
359 posts
आर्थिक साक्षरता शिबिर: जन निवेश अभियान
Reading Time: 3 minutesआर्थिक साक्षरतेचा प्रसार करण्यासाठी, सीएफए सोसायटी इंडियातर्फे १५ ते २९ नोव्हेंबर या कालावधीत जन-निवेश अभियान उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. यासाठी एकूण १४ दिवसांचा “सायकल” प्रवास दौरा सुरू करण्यात आला आहे. यामध्ये एकूण ५००० स्वयंसेवकांनी भाग घेतला असून, या दौऱ्याची सुरुवात १५ नोव्हेंबर रोजी एकत्रितपणे गुडगाव व मुंबई पासून करण्यात आली आहे. यानंतर दोन्ही भागातील स्वयंसेवक अहमदाबाद येथे भेटतील व इंदोरला या दौऱ्याची आणि अभियानाचीही सांगता करण्यात येईल.
पर्यायी गुंतवणूक निधी (AIF) म्हणजे काय?
Reading Time: 3 minutesबांधकाम क्षेत्रात असलेली मरगळ दूर व्हावी, अर्धवट रखडलेले प्रकल्प पूर्ण व्हावेत या हेतूने १० हजार कोटी रुपयांचा निधी अलीकडेच केंद्र सरकारने उपलब्ध करून दिला आहे. यामध्ये भारतीय स्टेट बँक आणि भारतीय आयुर्विमा महामंडळ १५ हजार कोटी रुपयांची भर घालेल. त्यामुळे या क्षेत्रासाठी २५ हजार कोटी रुपयांचे अतिरिक्त भांडवल उपलब्ध होईल.
मुलांना अर्थसाक्षर कसे बनवाल?
Reading Time: 3 minutesआपल्या शिक्षण पद्धतीमध्ये हा दोष नक्कीच आहे की वैयक्तिक आर्थिक नियोजन किंवा गुंतवणूक विश्वाची साधी तोंडओळख देखील त्यात करून दिली जात नाही. त्यामुळे अगदी कॉमर्स, फायनान्स, इकॉनॉमिक्स अशा ‘आर्थिक’ विषयांमधून पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेली मुलं देखील याविषयी अनभिज्ञ आणि काही प्रमाणात अनुत्सुक देखील दिसतात. इतर विषयाचे शिक्षण घेतलेल्यांची तर बातच सोडा. अर्थातच अशा परिस्थितीमुळे महागड्या घोडचुका होण्याची शक्यता वाढते. पालक म्हणून आपल्यातल्या प्रत्येकालाच असे वाटत असतं की आपल्या मुलांना जगात आपल्या पायांवर उभं राहण्यासाठी सक्षम बनवलं पाहिजे. त्यासाठी त्यांच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी आपण उचलतो. त्याचबरोबर गुंतवणूक विषयाची देखील प्राथमिक प्रशिक्षण त्यांना मिळते आहे ना, हे बघणं गरजेचं आहे.
सोन्याच्या साठाविषयक माफी योजना का आली पाहिजे?
Reading Time: 3 minutesदेशातील निम्म्या संपत्तीची नोंदच नसेल तर देशाचे आर्थिक व्यवस्थापन कसे होईल? आपल्या देशातील प्रचंड सोन्याच्या साठ्याचे तसेच झाले आहे. हा साठा अधिकृत संपत्तीचा भाग व्हावा आणि त्याचा न्याय्य कर सरकारला मिळावा, यासाठी सोन्याच्या रूपातील संपत्ती जाहीर करण्याची माफी योजना लवकरच येणार, याचा सरकारने इन्कार केला असला तरी ती नजीकच्या भविष्यात का आली पाहिजे आणि नागरिकांनी तिचे स्वागत का केले पाहिजे, हे समजून घेतले पाहिजे.
म्युच्युअल फंड क्या है? – भाग ६
Reading Time: 3 minutesम्युच्युअल फंडांची निर्मिती मोठया समूहाच्या विखुरलेल्या छोटया-छोटया रकमेची गुंतवणूक करण्यासठी झाली. काळानुसार त्यात पारदर्शकता आणण्यासाठी बदल होत गेले, होत आहेत आणि होत राहतील. तरीदेखील दोन प्रकारची जोखीम ही कायम असणार आहेच. पहिली अर्थचक्राची आणि दुसरी कंपनीच्या दोषात्मक व्यवस्थापनाची. कारण या दोन्ही गोष्टी सामान्य माणसाच्या बचतीवर परिणाम करू शकतात. हे टाळण्यासाठी तुमची जोखीम क्षमता माहिती असायलाच हवी.
चिट फंड म्हणजे नक्की काय?
Reading Time: 3 minutesचिट म्हणजे वचनचिठ्ठी! असंघटित क्षेत्रातील लोक, ज्यांचा बँकिंग व्यवहाराशी अत्यंत कमी संबंध येतो, अशा समान उत्पन्न असलेल्या गरजू लोकांना आपल्या आर्थिक गरजा ताबडतोब भागवण्यासाठी या फंडाचा उपयोग होतो. भिशीच्या जवळपास जाणारा हा बचतीचा प्रकार असून, त्यास अनेक वर्षांची परंपरा आहे. काही चिट फंड कंपन्या १०० वर्षाहून जुन्या असून अजून व्यवस्थित चालू आहेत.
बँक एफडीच्या जोडीला म्युच्युअल फंडचा “बँकिंग अँड पीएसयू डेट फंड”
Reading Time: 3 minutesसेबीच्या कडक नियंत्रणाखाली असलेल्या म्युच्युअल फंडाची एक कॅटेगरी आहे जी शेअर बाजाराशी अजिबात संबंधित नाही आणि आपली गुंतवणूक ही फक्त चांगल्या बॅंका आणि सरकारी कंपन्यांच्या व्यवसायात कर्जरोखे स्वरूपात गुंतवून आपल्याला त्यातून मिळणारा परतावा देतात. त्या कॅटेगरीचे नाव आहे ” बँकिंग अँड पीएसयू डेट फंड ” (PSU म्हणजेच पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स किंवा सरकारी कंपन्या). गुंतवणूकदारांचे कष्टाचे पैसे हे फक्त नामांकित बँका तसेच, फक्त सरकारी कंपन्या यांच्या कर्जरोखे या मध्ये गुंतविल्यामुळे जोखीम नगण्य होऊन जाते.
थेट इक्विटी की म्युच्युअल फंड?
Reading Time: 3 minutesआम्हाला अनेक लोक विचारत असतात शेअर बाजारात गुंतवणूक करायची आहे, कुठले शेअर्स घेऊ? अनेकदा कोणाच्या तरी सल्ल्याने सुरुवात केलेली असते. बाजारात तेजी असते, सगळेच शेअर्स वर जात असतात तेव्हा हे लोक खुश असतात. पण आपल्याला झालेल्या फायद्यात स्वतःच्या कौशल्याचा भाग किती आणि निव्वळ नशिबाचा भाग किती याचा बहुतेकांनी विचार केलेला नसतो.
फिटे अंधाराचे जाळे….गुंतवणूक विशेष
Reading Time: 3 minutesLPG म्हणजेच Liberalization, Privatization आणि Globalization. दुर्दैवाने या स्थित्यांतराकडे बघण्याचा दृष्टीकोन सामान्य बचतकर्त्याकडे नसतो. त्याचे कारण वर नमूद केले आहेच. परंतु त्याला छोटीशी का होईना गुंतवणूक सुरु करायची असते. ही सुरुवात मात्र इच्छा, आस की ध्येय हे ठरवता येत नाही. मग पदरी अंधारच पडतो.