Job or Business: नोकरी करू की व्यवसाय?
Reading Time: 3 minutesभविष्यातील उद्दिष्टांच्या यादीत ‘व्यवसाय सुरु करण्यासाठी रकमेची तजवीज’ ही एक नोंद असते आणि पंचविशीच्या वयोगटातील लोकांपासून पंचेचाळीशी पार केलेल्या, नोकरीत १८-२० वर्षे अनुभव घेतलेल्या, सर्व वयोगटातील लोकांमध्ये स्वतःचा व्यवसाय किंवा उद्योग सुरु करण्याची मनीषा वाढू लागल्याचं जाणवतंय. एन्टरप्रिन्युअर बनण्याचे वाढते प्रमाण आणि समाजाचा त्याविषयीचा बदलता दृष्टिकोन हे आपल्या देशाला, समाजाला आणि अर्थव्यवस्थेला नक्कीच लाभदायक आहेत.