गुंतवणुकीच्या चुकीच्या कल्पना

Reading Time: 3 minutesसमाज माध्यमं आणि वृत्तपत्र, टीव्ही अशी पारंपरिक माध्यमांमधून गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर अर्थसाक्षरतेचा प्रचार आणि प्रसार झाला आहे. त्यामुळे बहुसंख्य समाजापर्यंत अनेक संकल्पना पोचल्या आहेत. खरेतर या सगळ्या माहितीचा भडीमार सातत्याने सुरु आहे. मात्र या एकमार्गी संभाषणामुळे गुंतवणूकदारांच्या सवयी कितपत बदलत आहेत? तर फारशा नाहीत. याचे एक महत्त्वाचे कारण आपण गेल्या आठवड्यात बघितले – गुंतवणूक क्षेत्रातील ग्राहकाभिमुख असणाऱ्या वितरक, एजन्ट किंवा रिलेशनशिप मॅनेजर अशांच्या गैरप्रथा आणि त्यातून गुंतवणूकदारात निर्माण होणारी अनास्था आणि उदासीनता. त्याचबरोबर दुसरे मला जाणवलेले एक कारण म्हणजे गुंतवणूकदारांच्या मनातल्या अनेक चुकीच्या कल्पना.

भारतीय बँकांची दुरावस्था आणि अनुत्पादक मालमत्ता (NPA)

Reading Time: 3 minutesविशिष्ट मर्यादेबाहेर अनुत्पादक मालमत्ता वाढल्यास बँक आणि पर्यायाने बँकेचे ठेवीदार अडचणीत येतात. सर्व बँकांची शिखर बँक म्हणून  त्यांच्या कामकाजावर लक्ष ठेवणाऱ्या भारतीय रिझर्व बँकेने एखादी मालमत्ता अनुत्पादित कधी होते आणि त्यासाठी कोणत्या तरतुदी कराव्यात यासबंधीत निश्चित असे धोरण ठरवले असून त्याप्रमाणे बँकांना कार्यवाही करावी लागते.

कर्जमुक्त कसे व्हावे – भाग १

Reading Time: 3 minutesआग, कर्ज किंवा शत्रू अगदी थोड्या प्रमाणात जरी शिल्लक असतील तर त्यांना लगेच संपवा कारण ते अस्तित्वात राहिले तर पुन्हा पुन्हा वाढतात.  कर्जामुळे अनेक न संपणाऱ्या अडचणी निर्माण होतात. कर्जमुक्तीसाठी नेमके काय करावे? हा प्रश्न नेहेमी सर्वांना पडलेला असतो. त्याचाच वेध या लेख मालिकेत आपण घेणार आहोत. 

कर्जबाजारीपणाची १४ लक्षणे

Reading Time: 2 minutes‘कर्ज’ हा एक शब्द अनेक भावनांना साद घालतो. प्रत्येक व्यक्तीनुसार या शब्दाभोवती असणाऱ्या भावना बदलत जातात. लहानपणापासून घरात कर्जावरून ताणतणाव बघितलेल्यांना ‘कर्ज’ शब्द ऐकल्यावर एकप्रकारची शिसारी येते. “कर्ज घेणे चांगले की वाईट?” या प्रश्नाचे उत्तर गुंतागुंतीचे तर आहेच त्याचबरोबर ते व्यक्तिसापेक्षही आहे. 

क्रेडिट कार्डमुळे सिबिल स्कोअर खालावतो का?

Reading Time: 2 minutesसिबिल स्कोअर चांगला असणे हे ती व्यक्ती आर्थिक बाबतीत शिस्तप्रिय व जबादार असण्याचं लक्षण आहे. पण प्रत्येक जबाबदार व्यक्तीचा सिबिल स्कोअर चांगलाच असेल असे नाही. आपल्याही कळत-नकळत बऱ्याचदा आपण अशा काही गोष्टी करत असतो ज्यामुळे सिबिल स्कोअर खालावतो याची आपल्याला कल्पनाच नसते.

Mortgage Loan: तारण कर्ज – सुरक्षित कर्जाचा एक प्रकार

Reading Time: 3 minutesतारण कर्ज हे सुरक्षित कर्ज असून ते बँक, बिगर बँकिंग संस्था, सहकारी संस्था, सावकार यांच्याकडून व्यक्ती अथवा संस्था यांना देण्यात येते. सहसा हे कर्ज जमीन , घर खरेदी करण्यासाठी कमी पडणाऱ्या पैशांची पूर्तता करण्यासाठी घेतले जाते. कर्ज घेणाऱ्याची मालमत्ता गहाण ठेवलेली असल्याने ते सुरक्षित असते. कर्जदार कराराने बांधला गेल्याने ठराविक मुदतीत ठरलेली रक्कम मुद्दल व त्यावरील व्याजासह समान मासिक हप्त्यात (Equated monthly installments) देण्याचे बंधन कर्जदारावर असते.

नवीन वर्षात कर्जमुक्त होण्याचे ५ सोपे मार्ग

Reading Time: 2 minutesतुम्ही जर मध्यम/उच्च मध्यमवर्गीय असाल आणि नुकतेच उच्चशिक्षण घेतले असेल किंवा घ्यायचा विचार असेल, लहानमोठ्या शहरात एखादे घर असेल, घरासमोर/खाली पार्किंग मध्ये एखादी गाडी असेल, इतकेच कशाला, अगदी एखादा महागडा लॅपटॉप किंवा इतर काही यांत्रिक उपकरण असेल तर या सगळ्या सुबत्तेच्या गुलाबाला कर्जाचे काटे नक्कीच असणार…प्रत्येक वेळी हातात येणाऱ्या प्रत्येक रुपयात त्या सगळ्या कर्जांची वजाबाकी नक्की होत असणार आणि कधी एकदा या कर्जफेडीच्या दुष्टचक्रातून बाहेर पडेन? या विवंचनेतच आलेला प्रत्येक दिवस जात असणार….तर आज आपण जाणून घेणार आहोत याच तुम्हा आम्हा सर्वांच्या विवंचनेला आटोक्यात आणण्याचे आणि कालांतराने त्यातून लवकरात लवकर बाहेर पडण्याचे काही खात्रीशीर मार्ग :

सिबिल स्कोअर आणि व्याजदर

Reading Time: 2 minutesकर्जाचा विचार मनात येतो तेव्हाच त्याबरोबर तातडीने डोकावणारा दुसरा विचार म्हणजे व्याजदर.…

गृहकर्जाबद्दलचे गैरसमज भाग २

Reading Time: < 1 minuteगृहकर्जाबद्दलचे पहिले पाच गैरसमज आपण मागील भागात वाचले. आता पुढील गैरसमज ह्या…

सिबिल (CIBIL) म्हणजे काय ?

Reading Time: < 1 minuteसिबिल (CIBIL) म्हणजे काय ? सिबिल (CIBIL) म्हणजे क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया…