तुमची आर्थिक उद्दिष्टे कशी ठरवाल?

Reading Time: 4 minutes आपल्या भविष्यासाठी, आपली आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी आर्थिक नियोजन करणं आवश्यक आहे, याबद्दल कोणाचंच दुमत नसेल.  पण आर्थिक नियोजन कसं करायचं? ते करण्याची सुयोग्य पद्धत कोणती? असे अनेक प्रश्न बहुतांश लोकांच्या मनात असतील. या लेखात आपण शास्त्रीय पद्धतीने करण्यात येणाऱ्या आर्थिक नियोजनाची माहिती घेऊ. आर्थिक नियोजनाची सर्वात महत्वाची पायरी म्हणजे ध्येयनिश्चिती किंवा आर्थिक उद्दिष्ट्ये निश्चित करणे. ध्येयनिश्चिती करण्याच्या पाच महत्वाच्या पायऱ्या या लेखात आपण जाणून घेणार आहोत. प्रत्येक पायरीवर जरा थांबून विचार करून, मगच पुढच्या पायरीवर जायचे आहे.

काय आहे निवृत्तीनियोजनाचे गणित?

Reading Time: 4 minutes सध्या तरुणांमध्ये लवकर रिटायर होण्याचं एक स्वप्न फॅशन किंवा फॅड सारखं दिसून यायला लागलंय. वयाच्या ४५-५० वयापर्यंत उत्पन्न, जबाबदाऱ्या वगैरे विवंचनेतून बाहेर पडून पुढचं ‘लाईफ एन्जॉय’ करायचं. मात्र हे व्यवहारात उतरवण्यात एक मोठी समस्या असते. लवकर रिटायरमेंटमुळे एकीकडे कमाईची आणि गुंतवणुकीची वर्षे कमी होतात, तर दुसरीकडे साठवलेली पुंजी जास्त वर्षे पुरवावी लागते. म्हणजेच ४५व्या वर्षी रिटायरमेंट घेणाऱ्याला निधी जमा करायला वीसच वर्षे मिळतात आणि ती पुंजी वयाच्या नव्वदीपर्यंत म्हणजे पुढील ४५ वर्षे पुरवणे गरजेचे ठरते. अर्थातच त्यासाठी कमाईच्या वर्षात बचत किंवा गुंतवणुकींसाठी उत्पन्नाचा फार मोठा भाग बाजूला काढावा लागतो. हे प्रत्येकाला शक्य असतेच असे नाही.

रक्षाबंधन विशेष: “आर्थिक रक्षाबंधन” म्हणजे काय असते रे भाऊ ?

Reading Time: 3 minutes रक्षाबंधन म्हणजे बहीण – भावाच्या पवित्र नात्याचा सण. या दिवशी सर्वानाच आपल्या भावंडांसोबतची लहापणीची गट्टी- बट्टी, धमाल हमखास आठवत असेल. गेल्या काही वर्षात रक्षाबंधनला बहिणीला “सरप्राईज गिफ्ट” देण्याची एक नवीन पद्धत रूढ झाली आहे. बहिणीला काय भेट देऊ? हा अनेक भावांसमोरचा यक्षप्रश्न “आर्थिक रक्षाबंधन”ने चुटकीसरशी सोडवला आहे. 

आर्थिक नियोजनाचे महत्व : आर्थिक नियोजन आणि सक्षम कुटुंब

Reading Time: 3 minutes तुमच्या स्वतःचा पगार आणि इतर उत्पन्नाचे आर्थिक नियोजन तुमच्या डोळ्यासमोर असले पाहिजे. गरज वाटल्यास त्याचा एक लिखित आराखडा तुमच्या जवळ असेल तर उत्तमच. पण निदान तुम्ही कुठे खर्च करू इच्छिता? येत्या काळात कोणते संभाव्य खर्च आहेत? कोणती संभाव्य आवक आहे? अडचणीच्या काळी कुठून खर्च करणार? कर्ज घेणार का? किती घेणार? निवृत्तीनंतर काय? अशा प्रश्नाची उत्तरे खूप सुरवातीपासून तपासत राहावी म्हणजे आपल्याबरोबरच आपल्या परिवाराच्या आनंदाची हमी आपण देऊ शकतो.

जेष्ठ नागरिकांसाठी महागाईवर मात करणारे निवृत्तीवेतन

Reading Time: 3 minutes आताची नवीन पिढी छोट्या कुटुंबात समाधानी राहते. त्यामुळे त्यांचे खर्च कमी होतात. त्यांच्या घराची जबादारी त्यांच्या पालकांनी पार पाडलेली असते. त्यामुळे नवीन पिढी जोखीम घेऊन तरुण वयापासून एसआयपी किंवा स्टॉक मार्केट अशी जास्त परतावा देणारी पण जास्त जोखीम असलेली गुंतवणूक करू शकतात. वर उल्लेख केलेली जी पिढी आहे त्यांचे वयोमान साधारणतः ५४ तो ६६ दरम्यान आहे. त्यांना चांगली मासिक पेन्शन कशी मिळू शकेल? याचा आढावा घेऊ.

चाळीशी पुढील वयोगटासाठी निवृत्ती नियोजन

Reading Time: 2 minutes तरुणांनो यशस्वी नियोजन करून ४० व्या वर्षी निवृत्त व्हा. चाळीशी ओलांडलेल्यांनी पन्नाशीत निवृत्ती घेऊन ती आनंददायी कशी करता येईल? हा विचार करा. या लेखात आपण याबद्दल सविस्तर माहिती घेऊया. चाळीशीतील गुंतवणूकदारांनी जर त्यांच्या करिअरच्या सुरवातीपासून गुंतवणूक केली असेल तर निश्चित त्यांना ५०-५५ वर्षी निवृत्ती घेता येईल. मात्र बऱ्याच जणांच्या बाबतीत दीर्घकालीन गुंतवणूक न होता, आपली नजीकच्या काळातील स्वप्ने पूर्ण करण्यासाठी पैशांची बचत झाली.

Retirement Planning : तरुणांनो वयाच्या ५० व्या वर्षी निवृत्ती घ्यायची आहे? मग हे करा

Reading Time: 4 minutes आजच्या नवीन पिढीचे स्वप्न असते की आयुष्यभर नोकरी न करता शक्यतो पन्नाशी अगोदर निवृत्ती स्वीकारायची आणि त्यानंर आपले छंद, स्वप्ने जोपासायची, वर्ल्ड टूरला जायचे वगैरे. आजच्या तरुण पिढीने जास्त पगाराच्या नोकऱ्या बदलत असताना त्याच्या जोडीला व्यवस्थित आर्थिक नियोजन केले तर नक्कीच ते पन्नाशीला वेळेच्या अगोदर निवृत्ती स्वीकारून आपल्या आयुष्याचा जास्त आनंद घेऊ शकतात.

निवृत्ती नियोजन: निवृत्ती नियोजनाची ११ महत्वाची कारणे

Reading Time: 3 minutes भारतातील ४७% लोक त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर च्या भविष्यासाठी बचत करण्यास सुरुवातच करत नाहीत किंवा केली तरी त्यांना बचत करताना अडचणी येतात. मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारते. सेवानिवृत्ती नंतरच्या भविष्याची काय स्वप्न तुम्ही रंगवता? गोव्यात एका सुंदर पोर्तुगीज शैलीच्या बंगला, ज्याचा अर्धा भाग कॅफे हाउसमध्ये रुपांतरीत केला आहे तिथे पुस्तकांचा संग्रह आहे आणि लज्जतदार पदार्थ तिथे मिळतात? हे माझे निवृत्ती चे स्वप्न आहे. मग तुमचे काय आहे?

Retirement Planning: निवृत्ती नियोजनाची ११ महत्वाची कारणे – भाग १

Reading Time: 3 minutes एचएसबीसी ने केलेल्या विस्तृत जागतिक संशोधनावर मी अभ्यास करत होते, विषय होता, सेवानिवृत्तीचे भविष्य! त्यांनी भारतासह १७ देशांमधील १८,००० हून अधिक लोकांना सेवानिवृत्ती योजनेशी संबंधित माहिती विचारून सर्वेक्षणाचा आढावा घेतला. मिळालेला परिणाम मी स्वतः एक धोक्याची घंटा म्हणून पाहते. बहुतेक लोकांना निवृत्ती नियोजन किती महत्वाचे आहे, हे कळतच नाही. भारतातील ४७% लोक त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर च्या भविष्यासाठी बचत करण्यास सुरुवातच  करत नाहीत किंवा केली तरी त्यांना बचत करताना अडचणी येतात.