Browsing Tag
Saving
41 posts
Saving & Investment: बचत आणि गुंतवणूक यामधील मूलभूत फरक
Reading Time: 3 minutesजेव्हा कधी आर्थिक विषयांवर आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांसोबत चर्चा करतो, त्यातले जवळपास सगळेच आपल्याला असा सल्ला देतात, की महिन्याच्या शेवटी तुमच्यापाशी एक ठराविक रक्कम उरली पाहिजे. जेणेकरून, तुम्हाला तुमची सगळी देणी देऊन व दैनंदिनखर्च भागवून जी रक्कम हातात उरेल रकमेतून एकतर बचत करता येईल, किंवा गुंतवणूक करता येईल. पण मुळात या सगळ्याच गोष्टी बव्हंशी तुमच्या सध्याच्या आर्थिक स्थितीवरही अवलंबून असतात. बऱ्याचशा गुंतवणूकदारांना बचत आणि गुंतवणूक यातला फरक समजत नाही. या दोघांचीही उद्दिष्टेही वेगवेगळी आहेत. त्यामुळे आपल्या आर्थिक प्रवासाची सुरुवात करण्यापूर्वी या दोघांमधला मूलभूत फरक समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
आर्थिक मंदीचा सामना कसा कराल?
Reading Time: 3 minutesपेट्रोलपासून रोजगार क्षेत्रापर्यंत मंदीची झळ बसते आहे. ही घसरण किती काळापर्यंत राहील हे निश्चित सांगता येत नाही पण अशा काळात सामान्यांनी काय करावे म्हणजे मंदीची कमीत कमी झळ व्यक्तीला आणि त्यांच्या कुटुंबाला बसेल ही विचार करण्याची गोष्ट आहे. आर्थिक मंदीला सामोरे जाणे अपरिहार्य आहे पण आता आपली भूमिका की असेल आर्थिक निर्णय घेतला कोणती काळजी घ्यावी याबद्दल थोडे बोलूया.
काय आहे बचतीचा आधुनिक फॉर्म्युला?
Reading Time: 3 minutesकाही महत्त्वाचा, अचानक आलेला खर्च करण्यासाठी आपल्या खात्यात पुरेशी शिल्लक च नसते. कारण महिना संपता संपता अनेक जणांचा पगार सुद्धा अस्सा संपलेला असतो की लक्षातच येत नाही. महिन्याची १ तारीख आणि शेवटची तारीख हसत हसत आनंदाने भेटल्या, असे फार कमी जणांचे होते. मग काही इमर्जन्सी खर्च उद्भवला तर इतरांकडे हात पसरायची वेळ येते. अशी वेळ आपल्यावर येऊ द्यायची नसेल तर त्यासाठी काही ठोस पावले ही उचलायलाच लागतात.
लॉकडाऊन व अर्थव्यवस्थेतील अपरिहार्य बदल
Reading Time: 5 minutesलॉकडाऊन मध्ये अनेकांना नोकरी, व्यवसाय, आर्थिक नियोजन, गुंतवणूक, बचत याची काळजी आणि एकंदरीतच कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे येणाऱ्या नैराश्याने ग्रासलं आहे. अशा परिस्थितीमध्ये प्रसिद्ध बिझनेस कोच आणि मोटिवेशनल स्पीकर “चकोर गांधी” यांनी लॉक डाऊन मध्ये बदललेल्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेऊन आर्थिक नियोजन व गुंतवणुकी संदर्भात मार्गदर्शन करणारा ऑडिओ आम्ही ऑडिओ आणि लिखित अशा दोन्ही स्वरूपात प्रकाशित करत आहोत.
गुढीपाडव्यावर कोरोनाचं सावट – आर्थिक नियोजनाची फरफट?
Reading Time: 3 minutes“दिस जातील, दिस येतील; भोग सरल, सुख येईल…” आजपर्यंत मानव जातीवर अनेक संकटे आली आणि गेली. प्रत्येक परिस्थितीमध्ये जीवित व वित्तहानीही झाली, पण माणसाने प्रत्येक संकटावर मात केली, तशीच या संकटावरही आपण मात करण्यात आपल्याला यश मिळेल. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर हिंदू नववर्षाची सुरवात होते. अनेकजण नवीन वर्षाचे नवीन संकल्प करतात. यावर्षी कोणीही सणवार साजरे करण्याच्या मनस्थितीत नाही. उलट सध्याच्या परिस्थितीत भविष्याची चिंता सतावत आहे. या परिस्थितीमध्ये घाबरून जाऊ नका.
करिअरच्या सुरुवातीला गुंतवणूक करणे का आवश्यक आहे?
Reading Time: 2 minutesपहिल्या नोकरीच्या अनुभावाची तुलना इतर कशाशीही करता येत नाही. नुकतंच कॉलेजमधून बाहेर पडणं आणि स्वत:चा पैसा कमावणं, यापेक्षा मोठा आनंद दुसरा कोणता नाही. अशा उत्साही वातावरणात दीर्घकालीन गुंतवणूक करण्याचा विचार एखाद्याच्या मनात अगदी शेवटी येऊ शकतो. आणि आपल्यापैकी बरेच जण आयुष्याच्या याच टप्प्यावर चूक करतात. त्यामुळे दर महिन्याच्या चेकमुळे चालना मिळणाऱ्या जीवनशैलीचा त्याग करणे आवश्यक आहे.
सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (PPF) – काही महत्वाचे बदल
Reading Time: 4 minutesसार्वजनिक भविष्य निर्वाह निधी या योजनेत महत्त्वाचे बदल झाल्याच्या बातम्या समाज माध्यमांत प्रसारित होत आहेत. त्या वाचल्यावर असे लक्षात आले की हे बदल खूप महत्त्वाचे आहेत असे नाहीत. झालेल्या बदलांमुळे आता ही नवी योजना कशी असेल ते जाणून घेऊयात. यासंबंधीचे बदल १२ डिसेंबर २०१९ च्या शासकीय राजपत्रात प्रकाशित झाले आहेत. त्यामुळे त्याच दिवसापासून हे नवे नियम पूर्वी काढलेल्या खात्यांसह सर्व खात्यांना लागू आहेत.