उत्पन्नानुसार वाढवा गुंतवणूक
Reading Time: 3 minutesबहुसंख्य सामान्य गुंतवणूकदारांना आर्थिक नियोजन, गुंतवणूक योजना, दीर्घकालीन महागाईची गृहितके आणि त्याचे परिणाम, आर्थिक उद्दिष्टे इत्यादी संकल्पना आणि त्यासाठी करावी लागणारी आकडेमोड यांचा मनस्वी तिटकारा किंवा अनामिक भीती (Phobia) असते. त्यामुळेच या सगळ्या गोष्टी आपल्या भविष्यासाठी महत्त्वाच्या आहेत हे समजूनसुद्धा त्याकडे दुर्लक्ष किंवा चालढकल करणे चालू राहते. त्यातून चुकीचे पर्याय गुंतवणूक म्हणून निवडले जातात.