रिअल इस्टेटमधील गुंतवणूक किती लाभदायक? – भाग १

Reading Time: 3 minutesआपण घर जर स्वतः राहण्यासाठी घेत असलो तर त्यातून भविष्यात परतावा काय मिळेल वगैरे गोष्टींचा विचार करायची विशेष गरज नाही. पण जर तुम्ही ‘रिअल इस्टेट नेहेमीच चांगला परतावा मिळवून देते’ अशा विश्वासापोटी केवळ गुंतवणूक म्हणून घर घेत असाल तर दीर्घकाळात सर्व खर्च आणि कर वजा जाता महागाईदरापेक्षा जास्त परतावा त्यातून खरंच मिळू शकेल काय या विषयी विचार केलेला हवा.

विविध कर्जांवर मिळणाऱ्या कर सवलती

Reading Time: 2 minutesविविध प्रकारच्या कर्जांच्या ऑफर्स वेगवेगळ्या बँकांकडून दिल्या जातात. या कर्जांच्या करसवलतीसाठीही काही ऑफर्स दिल्या जातात. गृहकर्ज, शैक्षणिक कर्ज, वैयक्तिक कर्ज या पैकी कोणताही कर्जाचा प्रकार असू शकतो. करसवलत ही मुख्य रकमेवर दिली जात नाही, तर ती व्याजावर दिली जाते. 

हिंदू अविभक्त कुटुंबाला (HUF) मिळणारे करलाभ

Reading Time: 4 minutesहिंदू अविभाज्य कुटुंब हे व्यक्ती पेक्षा वेगळे आहे हे मान्य करण्यात आले. पुढे सन १९६१ मध्ये आलेल्या आयकर कायद्याने त्याचे स्वतंत्र अस्तित्व मान्य करून त्याला व्यक्तिप्रमाणे सोई सवलती देण्याचे ठरवले. याचा फायदा अनेक लोक स्वतःचे हिंदू अविभक्त कुटुंब निर्माण करून आपली एकंदर करदेयता कमी करीत आहेत. यासाठी यातील कर्त्याला स्वताचे आणि ‘एचयुएफ’चे (HUF) असे वेगवेगळे विवरणपत्र (ITR) भरावे लागते.

टर्म इन्शुरन्सबद्दल सारे काही

Reading Time: 3 minutesआर्थिक नियोजनात टर्म इन्शुरन्सला (शुद्ध विमा) खूप महत्त्व आहे. घरातील कमावत्या कर्त्या व्यक्तीचा दुर्दैवाने मृत्यू झाल्यास परिवारास आर्थिक दृष्टीने सुरक्षित करण्यासाठी हा सर्वात सोपा व प्रभावशाली उपाय आहे. सर्व कमावत्या  व्यक्तींचा टर्म इन्शुरन्स असायलाच हवा. कारण कमावती व्यक्ती गेल्यानंतर त्या व्यक्तीवर अवलंबून असलेल्या परिवारातील सदस्यांची जीवनशैली सुरळीत राहण्यासाठी हा विमा महत्वपूर्ण ठरतो.