प्रमाणित वजावटीचे (Standard Deductions) काही नियम

Reading Time: 3 minutes व्यावसायिक लोकांना त्यांच्या व्यवसायाच्या अनुषंगाने कराव्या लागणाऱ्या अनेक प्रकारच्या खर्चांची सूट मिळते. छोट्या व्यापाऱ्यांना उलाढालीच्या ६ ते ८% हे उत्पन्न धरून, सल्लागार म्हणून व्यवसाय करणारे जसे डॉक्टर, वकील यांना ५० लाख रुपयांपर्यंत उलाढाल असल्यास, कोणत्याही प्रकारे हिशोब नोंदी काटेकोरपणे न ठेवता अर्धी रक्कम ही व्यवसायासाठीचा खर्च म्हणून दाखवता येतो. 

आधार क्रमांकाच्या सहाय्याने आता मिळवा पॅनकार्ड !

Reading Time: 2 minutes जुलै २०१९ ला जाहीर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये अनेक नवीन नियम प्रस्तावित करण्यात आले होते. करवसुली,  करबुडाव्यांना चाप, पारदर्शी व्यवहार ही प्रमुख उद्दिष्ट्ये डोळ्यासमोर ठेवून नियमांची आखणी करण्यात आली होती. आयकर विवरण पत्र म्हणजे आयटीआर (ITR) संदर्भात अनेक नवीन नियमांची भर पडली आहे. तसेच, पॅन आधार जोडणीही बंधनकारक करण्यात आली आहे.नवीन नियमांमुळे नागरिकांनी गोंधळून जायचे काहीच कारण नाही. कारण कोणत्याही परिस्थितीत नागरिकांची गैरसोय होऊ नये याचीही काळजी घेण्यात आली आहे. 

निवृत्तीपश्चात सुरक्षित मुद्दल आणि नियमित उत्पन्न देणाऱ्या योजना

Reading Time: 3 minutes गुंतवणुक करताना आपल्यासाठी प्राधान्यक्रम हा मुद्दलाची सुरक्षितता, रोखता आणि नियमित उत्पन्न अशा प्रकारे असतो. त्याशिवाय चलनवाढीला तोंड देण्यासाठी दीर्घकालीन गुंतवणूकदेखील करावी लागते आणि इन्कम टॅक्स देखील कमीत कमी बसेल हे पाहावे लागते. मात्र ‘आखूड शिंगी बहुदुधी’ अशी सर्वगुणसंपन्न गुंतवणूक योजना कुठलीच नसते. विविध प्रकारच्या गुंतवणूक पर्यायांमध्ये वेगवेगळे गुणधर्म असतात आणि त्यांची एकत्र मोट बांधून, पोर्टफोलिओ बनवून आपल्याला मार्ग काढावा लागतो. हे रिटायर्ड लोकांना माहिती असलेच पाहिजेत असे विविध गुंतवणूक पर्याय कुठले आणि त्यांचे गुणधर्म काय, हे आपण आज पाहू. मात्र प्रत्येक पर्यायात किती रक्कम गुंतवावी हा प्रत्येकाच्या परिस्थितीवर अवलंबून असेल.

म्युच्युअल फंड क्या है? – भाग १

Reading Time: 4 minutes शेअर घेऊ की रोखे की कमोडीटी घेऊ याचा गुंतवणूकदाराने विचार करण्यापेक्षा पात्रताधारक फंड व्यवस्थापक गोळा झालेल्या रकमेचे नियोजन करत असतात. वैयक्तिक गुंतवणूकदार म्युच्युअल फंडातील एकरकमी गुंतवणूक किमान १,००० रुपयांपासून तर मासिक गुंतवणूक किमान ५०० रुपयांपासून सुरु करू शकतो. काही फंड घराणी मासिक १०० रुपयांपासून देखील गुंतवणूकीची सुविधा देतात. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक रोकड सुलभ असून गरज पडल्यास विना थांबा तुम्ही काढू शकता. म्युच्युअल फंडा व्यतिरिक्त इतर गुंतवणूक साधनांमधे एकल जोखीम – एकल परतावा असे धोरण दिसून येते.

हिंदू अविभक्त कुटुंबाला (HUF) मिळणारे करलाभ

Reading Time: 4 minutes हिंदू अविभाज्य कुटुंब हे व्यक्ती पेक्षा वेगळे आहे हे मान्य करण्यात आले. पुढे सन १९६१ मध्ये आलेल्या आयकर कायद्याने त्याचे स्वतंत्र अस्तित्व मान्य करून त्याला व्यक्तिप्रमाणे सोई सवलती देण्याचे ठरवले. याचा फायदा अनेक लोक स्वतःचे हिंदू अविभक्त कुटुंब निर्माण करून आपली एकंदर करदेयता कमी करीत आहेत. यासाठी यातील कर्त्याला स्वताचे आणि ‘एचयुएफ’चे (HUF) असे वेगवेगळे विवरणपत्र (ITR) भरावे लागते.

अनुमानीत देयकर योजना

Reading Time: 3 minutes अधिकाधिक लोक प्रत्यक्ष करनिर्धारणाच्या कक्षेत यावेत आणि त्यांनी योग्य प्रमाणात कर भरून देशाच्या प्रगतीस हातभार लावावा, अशी सरकारची इच्छा आहे. विकसित देशांच्या तुलनेत भारतात प्रत्यक्ष कर देणाऱ्याची संख्या खूपच कमी आहे. तसे असण्याची अनेक कारणेही आहेत. 

आयटीआर: मुदतवाढ मिळाली आता तरी आळस झटकून ‘आयटीआर’ भरा 

Reading Time: 2 minutes सन २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी आयटीआर दाखल करण्यासाठी ३१ जुलै ही अंतिम तारीख  होती. मात्र, काही करदात्यांना या मुदतीत आयटीआर फाइल करण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे करदात्यांकडून मुदत वाढवण्याची मागणी सातत्याने होत होती. ही मागणी विचारात घेऊन आयटीआर दाखल करण्यासाठीची मुदत वाढविण्यात आली आहे. 

बँक व्यवहार, परदेशी सहली आणि वीज बिल ठरवणार तुमचा ‘आयटीआर’

Reading Time: 2 minutes कर हा शासनाच्या उत्पन्नाचा सर्वात महत्वाचा मार्ग आहे. आपला कर प्रामाणिकपणे भरणे हे प्रत्येक करदात्याच्या कर्तव्य आहे. अर्थात कायदेशीर मार्गाने करबचत करणाऱ्या गुंतवणूक पर्यायांचा वापर करणे हा गुन्हा नाही तर अधिकार आहे. परंतु बेकायदेशीर मार्गाने काहीतरी जुगाड करून करदायित्व टाळणाऱ्या तमाम ‘करबुडव्यांना’ चाप बसण्यासाठीच्याउपाययोजना करून, त्यांना ताळ्यावर आणण्याच्या दृष्टीने  या अर्थसंकल्पातही तरतूद करण्यात आली आहे.

पगारदारांनो आयकर विवरणपत्र भरताना ही काळजी घ्या

Reading Time: 3 minutes आपल्या मालकाकडून आपणास फॉर्म नंबर १६ मिळाला असेल. यात आपणास मालकाकडून मिळालेले उत्पन्न यातून आपण जाहीर केलेल्या आणि कायद्यानुसार मिळत असलेल्या विविध वजावटींचा विचार करून आपले करपात्र उत्पन्न व कापलेला कर याची तपशीलवार माहिती असते. आयकर कायद्यानुसार सर्व मार्गाने मिळणारे उत्पन्न मग ते करपात्र असो अथवा नसो याची गणना आपल्या निव्वळ उत्पन्नात (gross income) होते. त्यामुळेच आपल्याला मिळत असलेल्या उत्पन्नापैकी काही गोष्टीकडे दुर्लक्ष झाल्याने त्या जमेस घ्यायच्या राहून जातात. त्या कोणत्या याच्यावर एक दृष्टिक्षेप