Common ITR Filing Mistakes: इन्कम टॅक्स रिटर्न भरताना या ८ चुका नक्की टाळा..
Reading Time: 2 minutesआयटीआर भरताना होणाऱ्या काही मूलभूत चुका (Common ITR Filing Mistakes) टाळायला हव्यात अन्यथा आपलं नुकसान होऊ शकतं. ‘विविध कर’ नियमितपणे भरणे ही आपल्या सर्वांचं देशाप्रती असलेलं कर्तव्य आहे. भारत सरकारने नागरिकांची सोय व्हावी म्हणून या प्रक्रियेत मध्यंतरी बरेच बदल केले आहेत. पण, तरीही प्राप्तीकर भरणाऱ्या लोकांचा टक्का फारसा बदललेला नाही. प्राप्तीकर भरण्याची प्रक्रिया माहीत नसण्याने अर्ध्यातून ही प्रक्रिया पूर्ण न करू शकणारे सुद्धा कित्येक लोक असू शकतात. ‘प्राप्तीकर’ भरणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ व्हावी या उद्देशाने आम्ही अशा काही चुकांची यादी देत आहोत ज्या लोकांकडून ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने कर भरत असताना नेहमीच होत असतात. या चुका कोणत्या आहेत, याबद्दल जाणून घेऊयात आणि शेवटच्या तारखेपर्यंत न वाट बघता आजच आपले आयटीआर भरा.