आयकर विवरणपत्र (ITR) – अंतिम मुदतीसह करविषयक सवलती

Reading Time: 3 minutes

आयकर विवरणपत्र – अंतिम मुदतीसह करविषयक सवलती

केंद्रीय प्रत्यक्ष करनियंत्रण  मंडळाने ३५/२०२० या २४ जून २०२० रोजी एक अध्यादेश काढून आयकर विवरणपत्र भरण्याच्या (ITR) अंतिम मुदतीसह अनेक सोईसवलती जाहीर केल्या आहेत.

कोविड-१९ ने पूर्ण अर्थव्यवस्थाच बदलून टाकली असून २५ मार्च रोजी लागू झालेल्या देशव्यापी ताळेबंदीमुळे, तसेच त्यात वाढ होत गेल्याने करदात्यांच्या अडचणीत वाढ होत आहे. अनेक करदात्यांनी त्यांच्या प्रतिनिधींनी मागणी केल्याने तसेच सरकारने पुढाकार घेऊन काही सवलती यापूर्वीच जाहीर केल्या. आता केंद्रीय प्रत्यक्ष करनियंत्रण  मंडळाने ३५/२०२० या २४ जून २०२० रोजी एक अध्यादेश काढून आयकर विवरणपत्र भरण्याच्या (ITR) अंतिम मुदतीसह अनेक सोईसवलती जाहीर केल्या असून त्याची ठळक वैशिष्ठे अशी-

आयटीआर व देयकर लवकरात लवकर भरणे अधिक फायद्याचे !…

  • आर्थिक वर्ष सन २०१८– २०१९ (मूल्यांकन वर्ष सन २०१९-२०२०) चे विवरणपत्र दंडासाहित भरण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०२० होती. यापूर्वीच ताळेबंदी जाहीर झाल्याने असे विवरणपत्र भरण्याची मुदत ३१ जुलै २०२० पर्यंत वाढवली आहे.
  • आर्थिक वर्ष सन २०१९-२०२० (मूल्यांकन वर्ष सन २०२० -२०२१) चे विवरणपत्र भरण्याची मुदत ३१ जुलै २०२० आणि ३१ ऑक्टोबर २०२० (लेखापरीक्षण आवश्यक असलेले करदाते) आता ३० नोहेंबर २०२० पर्यत यापूर्वीच वाढवण्यात आली आहे. यात पुढे लेखापरीक्षण अहवाल (Tax audit report) सादर करण्याची मुदत ३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत वाढवली असल्याचे म्हटले आहे.
  • चालू आर्थिक वर्ष सन २०२०-२०२१ साठी ज्या व्यक्तींना आपली कर देयता विचारात घेऊन अग्रीम कर भरावा लागतो त्यांनी अग्रीम कर नियमानुसार योग्य प्रमाणात भरला नाही तर २३४/ए नुसार  प्रतिमाहिना १% प्रतिमाहिना या दराने  सरळव्याज द्यावे लागते त्यांना ३० नोव्हेंबर २०२० पर्यत असे कोणतेही व्याज द्यावे लागणार नाही. ही सवलत १ लाख वार्षिक कर द्यावा लागतो अशाच करदात्यांना आहे. याहून अधिक करदेयता असल्यास आयकर कायद्यातील तरतुदींनुसार अग्रीम कराचा भरणा करावा लागेल त्यात उशीर झाल्यास दंडव्याज द्यावे लागेल.

आयकर: नवीन फॉर्म २६ / ए एस …

  • आर्थिक वर्ष सन २०१९-२०२० करिता विविध करसवलती मिळवण्यासाठी ८०/सी, ८०/डी, 80/जी चा लाभ घेण्यासाठी गुंतवणूक करण्याची मुदत ३० जून २०२० पर्यंत यापूर्वीच वाढवण्यात आली होती ती अजून एक महिना म्हणजे ३१ जुलै २०२० पर्यंत वाढवण्यात आली असून या काळात केलेली गुंतवणूक करदात्यांच्या सोयीप्रमाणे पूर्णतः अथवा अंशतः आर्थिक वर्ष सन २०१९ -२०२० किंवा सन २०२०-२०२१ मध्ये आपल्या मर्जीनुसार घेता येईल. फक्त असे करत असताना एकाच गुंतवणुकीची सवलत मागील वर्षासाठी आणि या वर्षीही अशी घेता येणार नाही.
  • राहत्या घराची किंवा प्लॉटची विक्री करून होणाऱ्या दीर्घ मुदतीच्या भांडवली लाभावरील करातून (LTCG) सूट मिळवण्यासाठी काही अटींची पूर्तता करून  कलम ५४ ते ५४/जी बी प्रमाणे नवीन मालमत्तेत ( विशिष्ठ कालावधीत नवे घर विकत घेणे, नवीन घर बांधणे, मध्यम लघु उद्योगासाठी मालमत्ता घेणे, भांडवली लाभ रोखे खरेदी करणे यासारखी ) गुंतवणूक करण्याची मुदत ३१ मार्च २०२० रोजी संपत होती त्यांना अशी सूट  ३० सप्टेंबर २०२० पूर्वी गुंतवणूक करून घेता येईल.
  • विशेष निर्यातक्षेत्र म्हणून ३१ मार्च २०२०पर्यंत मंजुरी मिळवणाऱ्या उद्योजकांना १०/ ए ए नुसार मिळणाऱ्या सोई सवलती आता ३० सप्टेंबर २०२० पर्यंत वाढवण्यात आल्या  आहेत.

आयकर रिटर्न भरण्यासाठीची महत्त्वाची १० कागदपत्रे…

  • मुळातून कापलेल्या कराचे पत्रक आणि करकपात केल्याचे पत्र देण्याची मुदत ३१ जुलै २०२० होती ती आता १५ ऑगस्ट २०२० करण्यात आली आहे.
  • आयकर खात्याकडून बेनामी मालमत्ता शोधून त्यावर मागणी करण्यात आलेला कर ज्याची मुदत ३१ डिसेंबर २०२० होती ती वाढवून ३१ मार्च २०२१ करण्यात आली आहे.
  • आधार आणि कायम नोंदणी क्रमांक एकमेकांना जोडण्याची मुदत ३१ मार्च २०२१ पर्यंत वाढवण्यात आली आहे.
  • विविध कर भरण्यास असलेली मुदत संपल्यावर दंडासह तो स्वीकारला जातो हे सध्या कमी केलेले दंड व्याज ९% दराने घेतले जाते. ही सवलत ३० जून पर्यंत देय असलेल्या करासाठीच असून त्यानंतर उशिरा भरणा केलेल्या करावर नियमित दराने दंडव्याज द्यावे लागेल.

आयकर रिटर्न वेळेत दाखल करण्याचे ९ फायदे

या सर्व सवलतीचा फायदा करदात्यांना निश्चितच मिळेल. याचा विस्तृत खुलासा करणारी प्रेस नोट प्रकाशित करण्यात आली असून जिज्ञासूंनी ती पहावी. यातून मला समजलेली माहिती आपल्यापर्यंत पोहचवत असून मूळ माहितीतील एक दोन शब्दप्रयोग असंदिग्ध आहेत. त्याचा खुलासा आपल्या करसल्लागारकडून समजून घेऊन त्यांचे मत अंतिम समजावे.

– उदय पिंगळे

Download Arthasaksharr App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Leave a Reply

Your email address will not be published.