अर्थसाक्षर आयटीआरसाठी महत्वाची कागदपत्रे
Reading Time: 3 minutes

आयकर रिटर्न भरण्यासाठीची महत्त्वाची १० कागदपत्रे

आयटीआर फाईल करण्यासाठी लागणारी कागदपत्रेे जमा करताना अनेकांची त्रेधा तिरपीट उडते. जून जुलैचा सिझन अनेकांसाठी कंटाळवाणा असतो. भरपूर सुट्टीनंतर मुलांची शाळा सुरु होणार असते. भर पावसात वह्या-पुस्तके दप्तर ई शालेय वस्तूंची खरेदी, ॲडमिशन प्रोसेस हे सर्व चालू असत आणि त्यात भरीस भर म्हणून आयकर रिटर्न (ITR) भरण्याचं टेंशन. आयटीआर फाईल करताना लागणारी महत्वाची कागदपत्रे कोणती आहेत याबद्दल माहिती करुन घेतली, तर कठीण वाटणारं कामही एकदम सोप होऊन जाईल. आजच्या लेखात आपण आयकर रिटर्न भरण्यासाठी लागणाऱ्या १० महत्वाच्या कागदपत्रांची माहिती घेऊया.

इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्याचे १० फायदे,

आयटीआर (ITR) फाईल करताना लागणारी १० महत्वाची कागदपत्रे –

आधारकार्ड:

 • सरकारी कामासाठी लागणारी कागदपत्रे म्हटलं की सर्वात आधी डोळ्यासमोर येते ते आधारकार्ड. आजकाल कोणत्याही कामाला लागणारं महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे आधार कार्ड. आयकर कायदा कलम १३९एए (Section 139/AA ) नुसार आयटीआर (ITR) फाईल करताना आधारकार्डची माहिती देणं हे बंधनकारक आहे.
 • जर तुम्हाला तुमचे आधारकार्ड मिळाले नसेल आणि  तुम्ही त्यासाठी अर्ज केलेला असेल तर सदर अर्जाचा एनरॉलमेंट नंबर देणं आवश्यक आहे.

२. सॅलरी स्लिप:

 • यामध्ये तुमच्या पगाराचा संपूर्ण तपशील असतो. घरभाडे भत्ता (HRA), प्रवासी भत्ता (TA), इ. भत्त्यांचा तपशीलही यामध्ये नमूद केलेला असतो.
 • काही भत्ते हे संपूर्णत: करपात्र असतात तर काही भत्ते अंशतः करपात्र असतात.
 • प्रत्येक भत्त्यांसाठीचे नियम व मर्यादा वेगवेगळ्या आहेत. 

‘आयटीआर (ITR)’ कसा भरावा?- पहिल्यांदाच रिटर्न भरणाऱ्यांसाठी मार्गदर्शन

. फॉर्म १६:

 • प्रत्येक नोकरदार वर्गासाठी (सॅलरीड पर्सन) सगळ्यात महत्वाचा असा हा फॉर्म आहे. फॉर्म १६ म्हणजे एंप्लॉयरने जारी केलेलं प्रमाणपत्र आहे. यामध्ये तुम्हाला मिळालेला पगार आणि त्यातून कपात केलेला TDS याची नोंद केलेली असते.
 • जर तुमच्या एंप्लॉयरने तुमच्या पगारातून TDS कपात केलेला असेल तर एंप्लॉयरने फॉर्म १६ जारी करणे बंधनकारक आहे.
 • आयटीआर १ (ITR 1) मध्ये तुमच्या पगाराचा तपशील (सॅलरी ब्रेकअप) द्यावा लागतो यासाठी फॉर्म १६ खूपच उपयुक्त ठरतो.
 • फॉर्म १६ दोन पार्ट्समध्ये असतो; पार्ट  आणि पार्ट .
  • पार्ट  मध्ये एंप्लॉयर कडून वजावट केलेला टॅक्स,  पॅन (PAN) डीटेल्स, एंप्लॉयरचे पॅन आणि टॅन (TAN) डिटेल्स ई. माहिती समाविष्ट असते.
  • पार्ट B मध्ये ग्रॉस पगाराचा तपशील,  वजावटीचे डिटेल्स, भत्ते व लाभ (Allowance & Prerequisite) ई. माहिती समाविष्ट असते.
 • फॉर्म १६ मिळाल्यानंतर त्यावर नमूद केलेला पॅन नंबर तुमचा स्वतःचाच असल्याची खात्री करुन घेणे आवश्यक आहे. जर त्यामध्ये काही चूक आढळल्यास तुमचा एंप्लॉयर फॉर्म १६ मधील चुका दुरुस्त करु शकतो.

४. फॉर्म २६ AS:

 • फॉर्म २६ A म्हणजे तुमच्या टॅक्सचा वार्षिक अहवाल (ॲन्यूअल टॅक्स स्टेटमेन्ट) असतो. यामध्ये तुम्ही जमा केलेल्या सर्व टॅक्सची माहिती उपलब्ध असते. यामध्ये प्रामुख्याने-
  1. एम्प्लॉयरकडून वजावट केला गेलेला TDS
  2. बॅंकेने वजावट केलेला TDS
  3. संस्थेने वजावट केलेला TDS
  4. जमा (डिपॉझीट) केलेला आगाऊ(ॲडव्हान्स) टॅक्स
  5. भरलेला सेल्फ असेसमेंट टॅक्स

ही सारी माहिती यामध्ये सामाविष्ट केलेलीअसते. सदर फॉर्म इन्कम टॅक्सच्या वेबसाईटवरुन डाउनलोड करुन घेता येतो.

आयकर रिटर्न वेळेत दाखल करण्याचे ९ फायदे

५. फॉर्म १६अफॉर्म १६ब / फॉर्म १६क:

 • फॉर्म १६अ: गुंतवणूकीवर मिळणाऱ्या व्याजातून (उदा. बँक एफडी )व्याज जर १०,०००/- पेक्षा जास्त असेल, तर त्या व्याजातून टी.डी.एस.द्वारे कपात होते. TDS संदर्भातील सर्व माहिती फॉर्म १६अ मध्ये भरायची आहे.
 • फॉर्म १६ ब: जर तुम्ही एखाद्या मालमत्तेची विक्री केली असेल तर खरेदीदार (बायर) विक्री रकमेवरील टी.डी.एस. कपात फॉर्म १६ ब मध्ये नमूद करतो.
 • फॉर्म १६ क: जर तुम्ही घरमालक असाल तर भाडेकरुने तुम्हाला दिलेल्या भाड्याच्या रक्कमेवरील टी.डी.एस. कपात फॉर्म १६ क मध्ये भाडेकरुने नमूद करावा लागतो.

इंटरेस्ट सर्टिफिकेट:

 • बॅंक, पोस्ट ऑफिस ई. कडून मिळणाऱ्या व्याजातून जर टी.डी.एस.द्वारे कपात झाली नसेल, तर सदर व्याज हे करपात्र असते. यामध्ये प्रामुख्याने बचत खात्यावरील व्याज (इन्टरेस्ट ऑन सेव्हिंग अकाऊंट) एफ.डी, आर.डी, ई.चा समावेश होतो.
 • या ठेवींसाठीची इंटरेस्ट सर्टिफिकेट्स ही आवश्यक कागदपत्रे आहेत. जर इंटरेस्ट सर्टिफिकेट नसेल तर अपडेटेड बॅक पासबुक तुम्ही सादर करु शकता.

७. करबचत गुंतवणूक दाखला ( टॅक्स सेव्हिंग इन्वेस्टमेंट प्रूफ):

 • कलम ८०सी, ८०सीसी आणि ८०सीसीडी नुसार करबचत करणाऱ्या गुंतवणूकींची कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे. त्यासाठी वरील कलमांअंतर्गत रु.१,५०,०००/- लाखापर्यंत वजावट मिळू शकते.
 • कलम ८०सी अंतर्गत वजावटीस पात्र असणाऱ्या महत्वपूर्ण गुंतवणूक म्हणजे – ईपीएफ, पीएफ, ईलसीएस, एल.आय.सी., एन.पी.एस. इत्यादी. 
 • काही खर्चांसाठीही कलम ८०सी खाली करबचत करता येते. यामध्ये प्रामुख्याने गृहकर्ज मुद्दल परतावा (होम लोन- प्रिन्सीपल रिपेमेंट), ट्यूशन फी (मुलांच्या शालेय फी मधील ट्यूशन फी ची रक्कम) हे खर्च समाविष्ट आहेत.

८.कलम ८०ड  आणि ८०ई:

 • कलम ८०डी नुसार व्यक्ती, नवरा/ बायको आणि अवलंबून असणाऱ्या आरोग्य विम्याअंतर्गत (हेल्थ इन्शूरंस) रु. १५०००/- पर्यंत वजावट मिळते. तसेच अवलंबून असणाऱ्या पालकांसाठी (डिपेंडट पेरेंट्स) भरलेल्या आरोग्य विमा रकमेवर अतिरिक्त रु. १५०००/- पर्यंतची (ज्येष्ठ नागरीक असल्यास रु. २०,०००/-  पर्यंत) वजावट मिळते. यासंदर्भातील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
 • शैक्षणिक कर्जाच्या हप्त्यावरील व्याजासाठी सेक्शन ८०ई नुसार वजावट मिळते यासाठी कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही.

९. गृहकर्ज दाखला (होमलोन स्टेटमेंट):

 • जर तुम्ही बॅंकेकडून अथवा फायनान्शियल इंस्टीट्यूशन कडून गृहकर्ज घेतल असेल तर त्यांच्याकडून त्याचे स्टेटमेंट घेणे आवश्यक आहे. सेक्शन २४ नुसार गृहकर्ज व्याजावर रु. २,००,०००/- पर्यंत वजावट मिळते.

१०. भांडवली नफा

 • जर तुम्ही तुमची एखादी मालमत्ता किंवा म्युच्युअल फंड्सची विक्री केली असेल तर त्याची माहिती इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला देणे आवश्यक आहे.
 • सदर व्यवहारातून नफा झालेला आहे का नाही, हे जाणून घेण्यासाठी मालमत्तेचे खरेदीखत (purchase deed) आणि विक्री करार (Sale deed) अशी दोन्हीही कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. (म्युच्युअल फंड्सच्या आणि / किंवा शेअर्सच्या बाबतीत संबधीत गुंतवणुकीचे अधिकृत स्टेटमेंट सादर करण आवश्यक आहे.)

Disclaimer:  https://arthasakshar.com/disclaimer/ 

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

TDS: टीडीएस म्हणजे नक्की काय?

Reading Time: 2 minutes अनेक खर्च एखाद्या देशाच्या सरकारला देशासाठी करायचे असतात. त्यासाठी सरकारच्या तिजोरीत काही पैसे प्रत्यक्ष जमा व्हावे लागतात. त्यासाठी सरकार नागरिकांकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर (Direct-Indirect Taxes) गोळा करत असते. सरकारसाठी/ सरकारच्या अर्थ खात्यासाठी हे कर गोळा करण्याचे काम आयकर खाते (Income Tax Department) करते. टीडीएस (TDS) ही आयकर खात्याने यासाठीच सुरू केलेली एक प्रणाली आहे. हिच्यामुळे सरकारच्या तिजोरीत वेळच्या वेळी कर जमा होतो.  या प्रणालीमुळे प्रत्यक्ष कर गोळा करणे सरकारला सोपे जाते.

आयकर खात्याच्या मदतीने आयटीआर फॉर्म भरणे होईल सुलभ

Reading Time: 2 minutes कर भरणाऱ्याला जो आयटीआर फॉर्म लागू होतो त्याची निवड करणे हे फॉर्म…

ज्येष्ठ नागरिकांसाठी असणाऱ्या विविध करसवलती

Reading Time: 2 minutes प्राप्तीकर विवरणपत्र भरण्याची प्रक्रिया आता अधिक गुंतागुंतीची व त्रासमुक्त करण्यात झाली आहे.…

आयकर विभागाची नोटीस आली आहे? घाबरू नका, आधी हे वाचा

Reading Time: 4 minutes टॅक्स, टॅक्स रिटर्न हे शब्द जरी ऐकले तरी करदाता काहीसा नाराज होतो. त्यात जर का आयकर विभागाकडून कुठली नोटीस आली तर ही नाराजी भीतीमध्ये बदलते. आयकर विभागाकडून आलेल्या कोणत्याही नोटीसमुळे अथवा पत्रामुळे करदाते घाबरून जातात. तथापि, कलम १४३(१) सूचना म्हणजे काळजी करण्याची गरज नाही. या लेखात आम्ही कलम १४३(१) च्या अंतर्गत पाठविलेल्या सूचनांबद्दल तपशीलवार चर्चा करणार आहोत जेणेकरून करदात्यांना याबद्दलची संपूर्ण माहिती मिळेल.